वरुण चक्रवर्तीने गाजवले मैदान (फोटो- सोशल मिडिया)
Cricket News: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या सामना सुरु आहे. या सामन्यांमध्ये भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने ९ विकेट्स गमावून टीम इंडियासमोर १७२ धावांचे लक्ष्य उभे केले आहे. या सामन्यात बेन डंकेट याने संघासाठी ५१ धावांची खेळी केली. तर जोस बटलरने संघासाठी २४ धावांची खेळी खेळली. यामध्ये भारताचा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने संघासाठी राजकोट मैदानावर कमाल करून दाखवली आहे. दुसऱ्या विकेट्ससाठी इंग्लंडने भारताच्या गोलंदाजांना घाम फोडला होता. पण आता त्याची परतफेड वरुण चक्रवर्तीने केली आहे.
भारत विरूद्ध इंग्लड यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात इंग्लडच्या संघाने 10 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावल्या आहेत. यामध्ये हार्दिक पांड्याने फिल्ल सॅाल्ट आणि लिविंगस्टन या दोघांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे, तर वरुण चक्रवर्तीने पुन्हा एकदा सामन्यामध्ये फिरकीची कमाल करून दाखवली आहे. इंग्लडचा कर्णधार जोस बटलर, जेमी स्मिथ, ब्रायडॉन कार्से, जोफ्रा आर्चर आणि जेमी ओव्हरटन याला बाहेरचा रस्ता दाखवला. बेन डकेटला अक्षर पटेलने पव्हेलियनचा रस्ता दाखवण्यात यशस्वी झाले आहेत.
इंग्लडच्या संघाने पहिला विकेट ७ धावांवर गमावला होता. तर दुसऱ्या विकेट्सची भागीदारी ७६ धावांची पार्टनरशिप जोस बटलर आणि बेन डंकेट या दोघांनी केली. त्यानंतर मैदानामध्ये इंग्लंडच्या संघासाठी लायम लिविंगस्टन याने संघासाठी महत्वाच्या ४३ धावा केल्या आहेत. दुसऱ्या विकेटनंतर वरुण चक्रवर्तीने आणि इतर भारताच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांची गाडी रुळावरून ढकलली आणि पुन्हा इंग्लंडच्या संघाला कमबॅक करण्यात अपयश आले.
भारताच्या संघाने या मालिकेमध्ये झालेल्या मागील दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. यामध्ये पहिल्या सामन्यात भारताचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा याने कमालीची फलंदाजी आणि वरुण चक्रवर्ती त्याच्या गोलंदाजीने भारताच्या संघाला पहिल्या सामन्यात विजय मिळवून देण्यात महत्वाचे योगदान दिल होते. तर दुसऱ्या सामन्यांमध्ये टीम इंडियाचा फलंदाज तिलक वर्माने शतक झळकावून भारताच्या संघाला विजय मिळवून दिला होता. दुसऱ्या सामन्यांमध्ये भारताच्या संघाला इंग्लंड कडवी टक्कर दिली होती.
हेही वाचा: IND vs ENG : राजकोटमध्ये जोस बटलर इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर! या खेळाडूला सोडणार मागे
जोस बटलरने रचला इतिहास
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने भारतीय भूमीवर T२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. हा विक्रम सध्याया आधी अफगाणिस्तानचा अनुभवी खेळाडू मोहम्मद नबीच्या नावावर होता. ज्याने २५ टी-२० सामन्यांमध्ये २५.२७ च्या सरासरीने आणि १६४.४९ च्या स्ट्राईक रेटने ५५६ धावा केल्या होत्या. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे आणि या कालावधीत त्याची सर्वोच्च धावसंख्या ८९ धावा आहेत. भारताविरुद्धच्या सध्याच्या मालिकेत बटलर उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, जिथे त्याने दोन सामन्यांमध्ये ५६.५० च्या सरासरीने ११३ धावा केल्या आहेत. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या पहिल्या सामन्यात त्याने ६८ धावा केल्या होत्या.