इंग्लंडचा भारतावर 26 धावांनी विजय (ट्विटर )
IND vs ENG: भारत आणि इंग्लंड संघामध्ये सध्या पाच टी-20 सामन्यांची मालिका सुरू आहे. त्यातील आज तिसरा सामना हा गुजरातच्या राजकोट मैदानावर पार पडला. पडला. या सामन्यात इंग्लंडने भारताचा 26 धावांनी पराभव केला आहे. या विजयाने इंग्लंडने या सिरिजमध्ये आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. आजचा सामना इंग्लंडने गमावला असता तर त्यांचे आव्हान संपल्यातच जमा होते. मात्र तिसरा सामना जिंकून इंग्लंडच्या संघाने जोरदार कमबॅक केल आहे.
Even from 127/8, we never take a backward step 👊
What a win in Rajkot! 🙌
Match Centre: https://t.co/nhxqiQ1kiY pic.twitter.com/aGjQnimEG2
— England Cricket (@englandcricket) January 28, 2025
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने इंग्लंडला 171 धावांवर रोखले. 172 धावांचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला खरा मात्र त्यांना सामना जिंकता आला नाही. पाठोपाठ चार गडी बाद झाल्याचे भारताचा संघ अडचणीत सापडला. त्यानंतर मैदणात आलेल्या हार्दिक पंड्याने सर्वांना आशेचा किरण दाखवला. मात्र तो देखील 40 धावांवर बाद झाला. त्यानंतर हा सामना इंग्लंडच्या बाजूने फिरला.
पाच सामन्यांच्या सिरीजमध्ये भारताने 2 तर इंग्लंडने 1 सामना जिंकला आहे. त्यामुळे अजूनही या सिरिजमधील पकड भारताकडे आहे. पुढील दोन पैकी एक सामना जरी जिंकला तरी भारत ही मालिका आपल्या खिशात घालणार आहे. भारताकडून संजू सॅमसन केवळ 3 धावा करून बाद झाला. अभिषेक शर्माने वादळी खेळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव देखील चांगली खेळी करू शकले नाहीत. 68 वर 4 बाद अशी स्थिती निर्माण झाली. त्यानंतर हार्दिक पंड्याकडे सर्वांच्या आशा लागल्या होत्या. मात्र तो 40 धावा करून बाद झाला आणि हा सामना इंग्लंडकडे फिरला.
वरुण चक्रवर्तीच्या फिरकीने केली इंग्लंडची धुलाई
भारताचा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने संघासाठी राजकोट मैदानावर कमाल करून दाखवली आहे. दुसऱ्या विकेट्ससाठी इंग्लंडने भारताच्या गोलंदाजांना घाम फोडला होता. पण आता त्याची परतफेड वरुण चक्रवर्तीने केली आहे. वरुण चक्रवर्तीने पुन्हा एकदा सामन्यामध्ये फिरकीची कमाल करून दाखवली आहे. इंग्लडचा कर्णधार जोस बटलर, जेमी स्मिथ, ब्रायडॉन कार्से, जोफ्रा आर्चर आणि जेमी ओव्हरटन याला बाहेरचा रस्ता दाखवला.
जोस बटलरने रचला इतिहास
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने भारतीय भूमीवर T२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. हा विक्रम सध्याया आधी अफगाणिस्तानचा अनुभवी खेळाडू मोहम्मद नबीच्या नावावर होता. ज्याने २५ टी-२० सामन्यांमध्ये २५.२७ च्या सरासरीने आणि १६४.४९ च्या स्ट्राईक रेटने ५५६ धावा केल्या होत्या. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे आणि या कालावधीत त्याची सर्वोच्च धावसंख्या ८९ धावा आहेत. भारताविरुद्धच्या सध्याच्या मालिकेत बटलर उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, जिथे त्याने दोन सामन्यांमध्ये ५६.५० च्या सरासरीने ११३ धावा केल्या आहेत. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या पहिल्या सामन्यात त्याने ६८ धावा केल्या होत्या.