Virat Kohli: King Kohli's 'Virat' rant against BCCI; Rules for players are wrong, will raise voice..
Virat Kohli : चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारताचा महान फलंदाज विराट कोहलीने आता आयपीएल 20225 च्या तयारीकडे लक्ष द्यायला सुरवात केली आहे. 22 मार्च पासून आयपीएलच्या 18 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी विराट कोहली आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या शिबिरात सामील झाला आहे. याच दरम्यान विराट कोहली बीसीसीआयच्या विरोधात असल्याची बातमी समोर आली आहे.
आयपीएल सुरू होण्यापूर्वीच बीसीसीआयकडून खेळाडूंसाठी कठोर नियम लावण्यात आले आहेत. बीसीसीआयने घातलेले निर्बंध खेळाडूंच्या पसंतीस उतरले नसल्याचे दिसत आहेत. या नियमांनुसार, आता कोणत्याही खेळाडूच्या कुटुंबातील सदस्यांना आयपीएल 2025 दरम्यान ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश करता येणार नाही. खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्यांना सराव किंवा सामना पाहायचा असेल तर ते हॉस्पिटॅलिटी बॉक्समध्ये बसू शकतात.
दरम्यान विराट कोहलीने बीसीसीआयच्या या नियमांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने नियमांना चुकीचे ठरवले आहे. बीसीसीआयच्या या कठोर नियमाविरोधात बोलताना त्याने म्हटले आहे की, बाहेरच्या कठीण परिस्थितीतून गेल्यानंतर संघातील खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर किती चांगले वाटते हे लोकांना समजणे अवघड आहे.
हेही वाचा : MS Dhoni : आता गोलंदाजांची खैर नाही! तो आलाय, आयपीएलपूर्वीच ‘थाला’ चा स्फोटक अंदाज समोर..; पहा Video
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या मते, विराट कोहली म्हणाला की, ‘जेव्हा तुम्हाला काही गंभीर समस्या असेल तेव्हा कुटुंबाकडे जाणे किती चांगले वाटते हे लोकांना समजावून सांगणे अवघड आहे. मला वाटत नाही की हे खूप गरजेचे आहे. हे लोकांना समजले आहे. मी या नियमाने खूप निराश आहे.’
विराट पुढे म्हणाला की, जर एखाद्या खेळाडूला दौऱ्यावर चांगली कामगिरी करता येत नसेल, तर त्याला नक्कीच कोणीतरी हवे असते, ज्याच्यासोबत त्याला आपले विचार शेअर करता येतील. ते म्हणाले की प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या समस्येशी झुंजत असतो, परंतु त्याच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळाल्यानंतर इतर सर्व तणाव दूर करण्यात मदत होते. विराट पुढे म्हणतो की, त्याला बाहेर कितीही समस्यांचा सामना करावा लागला, पण मात्र घरी आल्यानंतर सर्व काही सामान्य वाटू लागते.
हेही वाचा : IPL 2025 च्या सामान्यांच्या तिकिटांसह बसमध्ये करू शकाल मोफत प्रवास, वाचा सविस्तर, हा आहे संपूर्ण प्लान
इतकेच नाही तर विराटने असेही म्हटले आहे की, ‘मी अशी कोणतीही संधी सोडणार नाही जिथे मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.’ त्यामुळे कोहली बीसीसीआयचे नियम पाळण्याच्या विरोधात असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये किती तथ्य आहे, हे मात्र हे सध्या कोणालाच माहीत नाही.
विराट कोहली सध्या आरसीबी कॅम्पमध्ये सहभागी झाला असून तो प्रशिक्षण घेत आहे. या आयपीएल हंगामामध्ये चाहत्यांना विराटकडून खूप अपेक्षा आहेत. आरसीबीचा पहिला सामना 22 मार्च रोजी केकेआर विरुद्ध खेळवला जाणार आहे.