Champion Trophy 2025: Team India's worries increase even before the Champions Trophy final; 'This' big player gets injured during practice..
Champion Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार अंतिम टप्प्यात आला असून अंतिम सामना 9 मार्च रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमने सामने उभे ठाकणार आहेत. त्यापूर्वीच भारताच्या चिंतेत भर टाकणारी बातमी समोर आली आहे. भारताचा रनमशीन विराट कोहलीला सरावादरम्यान दु:खापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अंतिम सामन्यापूर्वी भारताची चिंता वाढली आहे.
भारतीय संघ अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून तीन बदले घेणार असल्याचे इराद्याने मैदानात उतरणार आहे. बाद फेरीत न्यूझीलंड संघाने नेहमीच भारतावर वर्चस्व राखले आहे. यावेळी मात्र 9 मार्चला होणाऱ्या महामुकाबल्यात भारताची विजयी लय पाहता भारताचे पारडे जड मानले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेटमध्ये सराव करत असताना वेगवान गोलंदाज गोलंदाजी करत होता. त्यावेळी कोहलीच्या गुडघ्याजवळ दुखापत झाली, ज्यामुळे त्याला मधेच सराव थांबवावा लागला आहे. भारतीय फिजिओ कर्मचाऱ्यांनी दुखापत झालेल्या ठिकाणी तत्काळ स्प्रे मारला तसेच त्या भागाला पट्टी बांधली.
थोडी वेदना होत असून देखील, कोहली मैदानावरच राहिला आणि उर्वरित सराव सत्र त्याने पूर्ण केले. संघातील खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला त्याच्या प्रकृतीबद्दल आश्वस्त केले. भारतीय प्रशिक्षक कर्मचाऱ्यांनी नंतर स्पष्ट केले की दुखापत गंभीर नाही आणि कोहली अंतिम सामना खेळण्यासाठी उपलब्ध असणार आहे.
हेही वाचा : Birthday Special : Harmanpreet Kaur ने क्रिकेटसाठी केला होता ‘हा’ त्याग; वडिलांनी धरला तीन महिने अबोला अन्..
बाद फेरीत न्यूझीलंड नेहमीच भारतावर भारी पडला आहे. कारण, आयसीसीच्या सर्व स्पर्धांमध्ये न्यूझीलंडने भारतावर 10-6 अशी आघाडी घेतली आहे. आयसीसीच्या बाद फेरीत न्यूझीलंडने भारतावर 3-1 असा विजय मिळवला आहे. त्यामुळे न्यूझीलंड संघाचे भारतासाठी मोठे आव्हान असल्याचे मानले जाता आहे.
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 1975 मध्ये खेळवण्यात आला होता. आतापर्यंत या दोन संघांमध्ये 119 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत, टीम इंडियाने चांगली कामगिरी करत 61 सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंड संघाने 50 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच 7 सामन्यांमध्ये 1 सामना बरोबरीत सुटला तर एकाचा निकाल लागला नाही.
गेल्या 10 सामन्यांच्या आकडेवारीकडे नजर फिरवली तर टीम इंडिया खूप पुढे असल्याचे दिसून येते. गेल्या 10 सामन्यांमध्ये टीम इंडियाने 6 वेळा आणि न्यूझीलंडने 3 वेळा विजय नोंदवला आहे. त्यापैकी एक अनिर्णीत राहिला आहे.
भारतीय संघाची प्लेइंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, मोहम्मद शामी, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा
न्यूझीलंड संघाची प्लेइंग 11
विल यंग, डेरेल मिचेल, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, टॉम लॅथम (विकेटकिपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन आणि विल्यम ओ’रोर्क