Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ: विराट कोहलीचे पदक ड्रेसिंग रूममधून गायब; खेळाडूंची केली कसून तपासणी, अखेर मिळालं; पाहा व्हिडिओ.. 

क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाकडून विराट कोहलीला उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी सर्वोत्तम क्षेत्ररक्षक पदक जाहीर करण्यात आले. परंतु, पदक देण्यापूर्वीच खेळाडूंनी ते पदक गायब केले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 03, 2025 | 07:56 PM
IND vs NZ: Virat Kohli's medal missing from dressing room; Player's Kelly Kasun Investigation, Akher Milaalan; Look video...

IND vs NZ: Virat Kohli's medal missing from dressing room; Player's Kelly Kasun Investigation, Akher Milaalan; Look video...

Follow Us
Close
Follow Us:

IND vs NZ: चॅम्पियन्स ट्रॉफीमधील साखळी फेरीचे सामने संपले आहेत. शेवटच्या साखळी फेरीच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव करत विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार ठरला तों म्हणजे वरुण चक्रवर्ती. त्याने पाच विकेट घेत किवींचा अर्धा संघ गारद केला.  सामन्यानंतर बीसीसीआयच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाकडून विराट कोहलीला उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी सर्वोत्तम क्षेत्ररक्षक पदक जाहीर करण्यात आले. परंतु,  पदक देण्यापूर्वीच खेळाडूंकडून ते पदक गायब करण्यात आले.

दुबईत खेळवल्या गेलेल्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा धुव्वा उडला. या सामन्यात भारतीय संघाने दमदार   क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले. भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी विराट कोहलीला त्याच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी त्याला हा पुरस्कार दिला जात असल्याचे सांगितले, तेव्हा मात्र ते पदकच गायब होते. त्यानंतर सर्व खेळाडूंनी मिळून त्या पदकाचा शोध सुरू केला. तसेच खेळाडूंचीही तपासणी करण्यात आली. पदकाचा शोध बराच काळ सुरूच राहिला. शेवटी पदक सापडलं आणि त्यानंतर  विराट कोहलीच्या गळ्यात ते घालण्यात आलं. हे पदक थ्रोडाउन स्पेशालिस्ट नुवान सेनेविरत्ने यांच्याकडून विराट कोहलीला प्रदान करण्यात आले. या सर्व प्रकाराच व्हिडिओही आता समोर आला आहे.

हेही वाचा : इंग्लंडचे कर्णधारपद सोडल्यानंतर जोस बटलर भावुक, इंस्टाग्रामवर शेअर केली पोस्ट

🏅 A missing 𝗳𝗶𝗲𝗹𝗱𝗶𝗻𝗴 𝗺𝗲𝗱𝗮𝗹 finds its way to the right hands! A special team member presents the honor to #𝗩𝗶𝗿𝗮𝘁𝗞𝗼𝗵𝗹𝗶, making for a fun and memorable moment after the #INDvsNZ clash! 🤝🏻😄 WATCH 🎥✨ 🔽 #TeamIndia | #ChampionsTrophy pic.twitter.com/poJWAkOVMa — Indian Cricket Team (@incricketteam) March 3, 2025

बीसीसीआयकडून गेल्या एकदिवसीय विश्वचषकापासून टीम इंडियामध्ये नवीन परंपरा सुरू करण्यात आली आहे. भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप सामन्यात उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला हे पदक देत असतात. टी दिलीपने या सामन्यात तीन खेळाडूंना नामांकन दिले होते. नामांकित खेळाडूंमध्ये अक्षर पटेल, श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांचा समावेश होता. यामध्ये  विराट कोहलीला विजेता घोषित करण्यात आले. त्यानंतर खेळाडूंनी पदक गायब केले आणि नंतर तपास सुरू करण्यात आला.

कोहलीकडून पदकाची शोधाशोध…

कोहलीला पदक बहाल करण्यापूर्वीच ड्रेसिंग रूममध्ये नाट्य सुरू झाले. कोहलीला देण्यात येणारे पदक मात्र गायब होते. केएल राहुलपासून अक्षर पटेल आणि विराट कोहलीही पदकाच्या शोधाला लागले होते. व्हिडिओमध्ये कोहली पदक गायब झाल्याचे सांगत असल्याचे दिसत आहे. संघाचे सपोर्ट स्टाफ देखील पदकाच्या शोधात व्यस्त होते. त्यांनंतर खेळाडूंची देखील तपासणी करण्यात आली. शमीपासून सुरुवात करून सर्व खेळाडूंचा शोध घेण्यात आला. यामध्ये कर्णधार रोहित शर्माही हसताना दिसत आहे. शेवटी सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचे पदक अक्षर पटेलकडे दिसून आलं.

हेही वाचा : IND vs AUS: सेमी फायनलमध्ये केएल राहुलला खेळवण्यास संभ्रम? ऋषभ पंतला मिळणार संधी, नेमकं कारण काय?

भारतीय संघाचा उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश..

भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी सामन्यात दबदबा राखत तिन्ही सामने जिंकले आणि दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. भारताने प्रथम बांगलादेशला 6 विकेटने, नंतर पाकिस्तानला 6 विकेट्सने आणि तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला 44 धावांनी पराभूत केल. या विजयायांमुळे भारताने ‘अ’ गटातील गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप मारली.  या विजयासह आता उपांत्य फेरीत भारताचा सामना 4 मार्चला  ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

 

Web Title: Virat kohlis medal missing from dressing room

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2025 | 05:11 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • Medal
  • virat kohali

संबंधित बातम्या

विराट-रोहित नाही, श्रेयस अय्यरही बाहेर; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा!
1

विराट-रोहित नाही, श्रेयस अय्यरही बाहेर; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा!

T20 आशिया कपमध्ये कोण आहे सर्वोत्तम सरासरीचा किंग! जाणून घ्या ‘या’ 6 फलंदाजांची आकडेवारी
2

T20 आशिया कपमध्ये कोण आहे सर्वोत्तम सरासरीचा किंग! जाणून घ्या ‘या’ 6 फलंदाजांची आकडेवारी

Asia Cup 2025: आशिया कपमधील हे ५ मोठे विक्रम मोडणे अशक्य; यादीत ३ भारतीय खेळाडूंचा दबदबा
3

Asia Cup 2025: आशिया कपमधील हे ५ मोठे विक्रम मोडणे अशक्य; यादीत ३ भारतीय खेळाडूंचा दबदबा

‘भारतीय संघासाठी त्याची गरज नाही..’, माजी खेळाडूचा विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेट निवृत्तीबाबत खळबळजनक खुलासा
4

‘भारतीय संघासाठी त्याची गरज नाही..’, माजी खेळाडूचा विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेट निवृत्तीबाबत खळबळजनक खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.