IND vs AUS: सेमी फायनलमध्ये केएल राहुलला खेळवण्यास संभ्रम? (फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
IND vs AUS : नुकतेच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या साखळी सामन्यांचा शेवट झाला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा शेवटचा साखळी सामना खेळवण्यात आला आहे. यामध्ये भारताने बाजी मारत सेमीफायनलचे तिकीट पक्के केलं आहे. सेमी फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या सामन्यात दोन्ही संघ सर्वोत्तम प्रदर्शन करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न करतील. यासाठी संघांमध्ये काही बदलही होण्याची शक्यता आहे. अशात केएल राहुलला उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघातून वागळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याच्या जागी ऋषभ पंतची संघात वर्णी लागण्याची शक्यता आहे. अशी चर्चा आहे.
वास्तविक पाहता केएल राहुलने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ‘फिल्डर ऑफ द मॅच’ पदक जिंकले होते. मात्र त्याला फलंदाजीत फारशी कमाल करता आलेली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलने अनेक चुका केल्याचे दिसून आले. केएल राहुलच्या चुकांमुळे कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापना समोरील अडचणीत वाढ झालीचे दिसते. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेसाठी केएल राहुलला यष्टीरक्षक म्हणून पहिली पसंती म्हणून निवड करण्यात आली होती. तर ऋषभ पंतला बॅकअप खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा : Rohit Sharma ला जाड म्हणण्यावरून वाद पेटला: भाजप नेत्याची टीका; म्हणाले, “राहुल गांधींच्या नेतृत्वात 90…”
त्यामुळे आता केएल राहुलची कामगिरी पाहता भारतीय संघ व्यवस्थापन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत केएल राहुलला मैदानात उतरवणार की ऋषभ पंतकडे यष्टीरक्षकाची जाबबदारी सोपवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलने प्रथम केन विल्यमसनचा झेल सोडला. त्यावेळी केन विल्यमसन हा केवळ 1 धावांवर खेळत होता. यानंतर मात्र केन विल्यमसनने भारतासाठी डोकेदुखी ठरला आणि त्याने 81 धावा केल्या, तो 81 धावांवर असताना अक्षर पटेलने त्याला बाद केले.
हेही वाचा : IPL 2025 : कोलकाता नाईट रायडर्सची नवी जर्सी, तीन स्टार्सचा अर्थ काय? पाहा Video
त्यांतर न्यूझीलंडच्या डावाच्या २६व्या षटकात मात्र केएल राहुलकडून पुन्हा एक मोठी चूक झाली. फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या चेंडूवर टॉम लॅथमच्या बॅटची कळ लागली, मात्र केएल राहुल हा झेल टिपण्यात अपयशी ठरला. केएल राहुलने टॉम लॅथमचा झेल सोडला तेव्हा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. रोहित शर्मा खूपच नाराज दिसून आला.
भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव केला असला तरी भारतीय संघाने या चुकांमधून सावरायला हव. अन्यथा उपांत्य फेरीत अडचणी वाढण्याची शक्यता आहे. असे म्हटले जाते की, सध्या भारतीय सपोर्ट स्टाफ आणि कर्णधार रोहित शर्माला केएल राहुलवर विश्वास आहे. परंतु असे असतानाही देखील ऋषभ पंतसारखा चांगला पर्याय बेंचवर बसून असल्यावर त्याचा देखील विचार करण्यात येऊ शकतो.
माहितीसाठी, दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या साखळी फेरीतील शेवटचा सामाना भारताने आपल्या नावे केला. भारताने न्यूझीलंडचा 44 धावांनी दणदणीत पराभव केला आहे. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या साखळी सामन्यात आपला दबदबा कायम राखत भारताने सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. न्यूझीलंडला 205 धावांवपर्यंत मजल मारता आली. केन विल्यम्सनची एकाकी झुंज अपयशी ठरली. श्रेयस अय्यर, वरुण चक्रवर्ती हे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. श्रेयसने 79 धावा करत भारताला 250 पर्यंत पोहचवले तर वरुणने आपल्या फिरकीच्या जोरावर अर्धा न्यूझीलंड संघ गारद केला. त्याने 42 धावांच्या बदल्यात 5 फलंदाज बाद केले. आता उपांत्य फेरीत भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल. ४ मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरू होईल.