Rohit Sharma: 'Underestimates his captaincy...': What did Virender Sehwag say about Rohit Sharma? Statement in discussion..
Rohit Sharma : भारताने न्यूझीलंडला 4 विकेट्सने पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यापासून भारतीय संघाचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. तसेच संघाचा कर्णधार रोहित शर्माचेही जगभरातून कौतुक होत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याआधी रोहित शर्माच्या फिटनेस आणि कर्णधारपदावर अनेकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र कर्णधाराने ही ट्रॉफी जिंकून सर्वांचीच बोलती बंद केली आहे. अशातच आता भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने नऊ महिन्यांत दोन आयसीसी ट्रॉफी आपल्या नावे केल्या आहेत. त्यानंतर भारताच्या यशस्वी कर्णधारांच्या यादीत रोहितचे नाव घेतले जाऊ लागले आहे. तसेच त्याचे जगभरातून त्याचे कौतुक होताना दिसस्ता आहे. त्यानंतर आता वीरेंद्र सेहवागनेही रोहित शर्माचे कौतुक केले असून त्याच्या कर्णधारपदाचे खास वर्णन केले आहे.
रोहित शर्माच्या कर्णधारपदाबद्दल मीडियाशी संवाद साधताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, “आम्ही त्याच्या कर्णधारपदाला कमी लेखतो, पण या दोन ट्रॉफींनंतर, तो एमएस धोनीनंतरचा दुसरा भारतीय कर्णधार बनला आहे, ज्याने एकापेक्षा जास्त आयसीसी किताब जिंकले आहेत. कर्णधाराने आपल्या गोलंदाजांचा ज्या पद्धतीने वापर केला आहे, त्याने संघाला ज्या प्रकारे हाताळले, तसेच त्याने संघाला ज्या प्रकारे मार्गदर्शन केले आहे आणि तो जे काही संवाद साधतो ते अगदी स्पष्टपणे असतात’ असे सेहवाग म्हणाला.
हेही वाचा : Virat kohli : विराटची विकेट जाताच तरुणीने घेतला अखेरचा श्वास; वडिलांकडून धक्कादायक माहिती समोर…
तसेच सेहवाग पुढे म्हणाला की, अर्षदीप सिंगच्या जागी हर्षित राणाला खेळवणे असो किंवा हर्षितच्या जागी वरुण चक्रवर्तीला परत आणणे असो, त्याने आपल्या खेळाडूंशी चांगला संवाद साधला आणि ते जास्त महत्त्वाचे होते. त्यामुळे रोहित शर्मा एक चांगला कर्णधार आहे.
आपला मुद्दा पुढे नेत सेहवाग म्हणाला, “रोहित शर्मा स्वत:बद्दल कमी आणि संघ आणि सहकाऱ्यांबद्दल जास्त विचार करतो. तो त्यांना आरामदायी वाटतो. जर एखादा खेळाडू असुरक्षित असेल तर त्याची कामगिरी चांगली होणार नाही हे रोहितला माहीत आहे. त्यामुळेच तो त्या संघातील कोणालाही असुरक्षित वाटू देत नाही. तो सर्वांना सोबत घेऊन जातो. चांगल्या कर्णधाराची आणि कर्णधाराची हीच गरज असते. आणि रोहित शर्मा हे खूप चांगले करत आहे.”
हेही वाचा : भारतीय क्रिकेट जगतात शोककळा; पदार्पणातच धमाका उडवणाऱ्या माजी अष्टपैलू क्रिकेटपटूचे निधन…
भारतीय संघाने न्यूझीलंडचा 4 विकेटने पराभव करून 12 वर्षांतर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. भारताने 9 महिन्यांत सलग दुसऱ्यांदा ICC ट्रॉफी जिंकली आहे. भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धचा अंतिम सामना जिंकून ट्रॉफी आपल्या नावे केली. या संपूर्ण स्पर्धेत भारत अजिंक्य राहीला असून त्याने या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. शेवटच्या सामन्यात भारताने सर्वोच्च कामगिरी करत विजयी ट्रॉफी उंचावली आहे. तर न्यूझीलंडला उपविजेतपदावर समाधान मानावे लागले.