Virat kohli : विराटची विकेट जाताच तरुणीने घेतला अखेरचा श्वास; वडिलांकडून धक्कादायक माहिती समोर... (फोटो-सोशल मीडिया)
Virat kohli : भारताने नुकतीच कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे. भारताने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव करून तब्बल 12 वर्षांनंतर चॅम्पियन ट्रॉफीचे विजेतेपद आपल्या नावे केले आहे. या सामन्यात रोहित शर्माने चांगली खेळी केली होती. तसेच या सामन्यात किंग विराट कोहली चांगला खेळेल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र तो स्वस्तात बाद झाला. पण कोहलीचे लवकर आऊट होणे एका तरुणीच्या जीवाशी बेतले आहे. विराट कोहली 20 व्या षटकात पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याला केवळ 2 चेंडूत 1 धाव करता आली. विराट आऊट विकेट जाताच एका तरुणीला हार्टअटॅक आल्याची बातमी समोर आली आहे. याबाबत तिच्या वडिलांकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशच्या देवरियामधून एक एक दुःखद घटना समोर आली आहे. विराट कोहली एका धावेवर आऊट होताच एका तरुणीला धक्काच बसला. धक्क्यात त्या तरुणीचा मृत्यू झाला. प्रियांशी पांडे असे मृत मुलीचे नावे आहे. विराट आऊट होताच प्रियांशीला धक्का बसून ती बेशुद्ध पडली. तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
मृत तरुणीच्या वडिलांनी यासंदर्भात एका वृत्तवाहिनीशी संवाद साधाला. तेव्हा त्यांनी याबाबत खुलासा केला. चॅम्पियन ट्रॉफीच्या पहिल्या डावातील सामना पाहिल्यानंतर वडील अजय पांडे बाजारात गेले होते. दुसरा डाव सुरू झाला आणि त्यांची मुलगीही सामना पाहायला लागली. सामाना पाहताना क्षणात ती बेशुद्ध पडली. त्यावेळी कुटूंबियांना काही कळलं नाही म्हणून त्यांनी तिच्या वडिलांना तात्काळ बोलवण्यात आले. वडील आल्यानंतर तरुणीला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. त्यानंतर मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टम न करता घरी आणण्यात आला आणि तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आपल्या मुलीच्या मृत्यूचा आणि विराट कोहली आऊट होण्याचा काहीही एक संबंध नाही. अशाप्रकारे आऊट होऊन धक्का बसू शकत नाही. जेव्हा ही घटना घडली, तेव्हापर्यंत भारताची एकही विकेट पडलेली नव्हती. तोपर्यंत विराट कोहली क्रीजवरही आलेला नव्हता. अशी माहिती मृत तरुणीचे वडील अजय पांडे यांनी म्हटलं आहे.
मृत तरुणीच्या शेजारी राहणारे अमिच चंद्रा नावाच्या गृहस्थांनी हा सर्व प्रकार स्वत:च्या बघितला आहे. प्रियांशीला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा टीम इंडिया चांगल्या स्थितिमध्ये होती. मुलीला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला हा केवळ योगायोग आहे. त्यामुळे प्रियांशीच्या मृत्यूचा आणि विराटच्या विकेटचा काहीही संबंध नाही, अशी माहिती त्यांनी दिली.