फोटो सौजन्य - JioHotstar
Ishan Kishan’s wicket : काल आयपीएलच्या ४१ व्या सामन्यामध्ये मुंबईच्या संघाने विजय मिळवला. मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना पार पडला या सामन्यांमध्ये मुंबईने या स्पर्धेत हैदराबादला दुसऱ्यांदा पराभूत केले. कालच्या सामन्यांमध्ये पुन्हा एकदा हैदराबादचा फलंदाजांची निराशाजनक कामगिरी राहिली. सध्या या सामन्यातला एक किस्सा सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत तो म्हणजेच ईशान किशनचा विकेट. कालच्या सामन्यांमध्ये ईशान किशन आऊट नसतानाही तो सामना सोडायला तयार झाला. हे पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. सनरायझर्स हैदराबादचा संघ फलंदाजी करत असताना ईशान किशन दुसऱ्या विकेटसाठी फलंदाजीला आला होता.
यावेळी अशी घटना घडली आणि हे पाहून सर्वच जण चकित झाले होते. दीपक सहर पहिला चेंडू टाकत असताना ईशान किशन खेळण्याचा प्रयत्न केला पण तो चेंडू दादा चुकला आणि मुंबई इंडियन्सच्या ना विकेटकीपर ना गोलंदाज ना मुंबईने कोणत्याही खेळाडूने अपील केले होते पण ईशान किशनने यावेळी स्वतः मैदान सोडले. हे पाहून मैदानावर उभे असलेले पंचही कन्फ्युज झाले आणि द्वित्व मनस्थिती सापडले त्यानंतर शेवटी पंचांनी त्याला आऊट घोषित केले होते. त्यानंतर या विकेटचा रिप्लाय चालवण्यात आला आणि ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. यावेळी चेंडू हाय जान किशन चा बॅटला किंवा त्याच्या घातलेल्या ग्लॅवजला देखील लागला नव्हता.
या विकेटनंतर भारताचे माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांनी त्यांचे मत मांडले आहेत आणि हे पाहून ते अजिबात खुश दिसत नव्हते. यावेळी ईशान किशनला त्यांनी चालू सामन्यावेळी फटकारताना दिसत आहेत.
वीरेंद्र सहवाग याने क्रिकबजशी बोलताना म्हटले की अनेकदा असे म्हटले जाते की तुमचे मन काम करत नाही माझ्या मते यावेळी ईशान किसनचे मन देखील काम करत नव्हते. यावेळी ते म्हणाले की, पंच जोपर्यंत तुम्हाला आऊट देत नाही तोपर्यंत तुम्ही उभे राहायला हवे होते. कारण पंचदेखील तेवढेच पैसे घेत आहेत. जर पंच मोफत उभे असते तिथे तर त्या गरीब माणसासाठी आपण म्हणजेच तू मदत करणे हे समजूतदारीचे ते काम होते पण त्याला चांगली मॅच मिळत आहे. त्यामुळे त्याला त्याचे काम करू द्या आणि तुम्ही तुमचे काम करा असे खडतर शब्दात वीरेंद्र सेहवागने ईशान किशनला सांगितले आहे.
एवढेच नव्हे तर क्रिकबज शोमध्ये वीरेंद्र सेहवागने रिकी पॉंटिंगचे उदाहरण देत म्हणाला की, रिकी पॉंटिंग सर्वात चांगली गोष्ट सांगतो की मी इकडे फलंदाजी करण्यासाठी आलो आहे त्यामुळे मी माझे काम करत आहे आणि समोर उभा असलेला पंच निर्णय देण्यासाठी आहे त्यामुळे तो जोपर्यंत त्याचा निर्णय देत नाही तोपर्यंत मी इथून निघणार नाही. मी आऊट असलो किंवा नसलो तरी.