संजू सॅमसन आणि रजत पाटीदार(फोटो-सोशल मीडिया)
RR vs RCB : आयपीएल २०२५ चा १८ वा हंगाम सुरू असून आतापर्यंत ४१ सामने खेळवण्यात आले आहेत. गुणतालिकेत देखील आता मोठे उलटफेर बघायला मिळत आहेत. आजच्या ४२ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने असणार आहे. हा सामना आज २४ एप्रिल रोजी संध्याकाळी ७.३० वाजता बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघ शेवटच्या वेळी आमनेसामने अआले होते तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सामना जिंकला होता. आता राजस्थान रॉयल्स या सामन्यात आपल्या पराभवाचा बदला काढण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. आपल्या घरच्या मैदानावर आरसीबीचा रेकॉर्ड आतापर्यंत काही चांगला राहिलेला नाही. त्यामुळे चांगली कामगिरी करण्यास आरसीबी सज्ज असणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ८ सामन्यांमध्ये ५ सामन्यात विजय मिळवत पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर विराजमान आहे. त्याच वेळी, राजस्थान रॉयल्सचा संघ मात्र ८ सामन्यांमध्ये २ विजयांसह आठव्या स्थानावर तळाशी आहे. प्लेऑफमध्ये राहण्यासाठी राजस्थान रॉयल्सला हा सामना जिंकावा लागणार आहे. त्याच वेळी, आरसीबी या विजयासह प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आपला दावा अधिक मजबूत करू शकते.
हेही वाचा : PSL 2025 : आधी निष्काळजीपणा, नंतर आरडाओरड, PSL चा सामना क्षणामध्ये राड्यात बदलला; VIDEO VIRAL
चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी नेहमीच फलंदाजांसाठी फायदेशीर ठरली आहे. ही खेळपट्टी सपाट आहे आणि मैदानाच्या सीमा देखील लहान आहेत, ज्यामुळे मोठे शॉट्स सहज खेळताना दिसतात. या हंगामात आतापर्यंत येथे खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांमध्ये, गोलंदाज संघाला सुरुवातीला काही स्विंग मिळते, परंतु सामना जसजसा पुढे सरकतो तसतसे गोलंदाजांना बचाव करणे अधिक कठीण होते. तथापि, या हंगामात चिन्नास्वामी खेळपट्टी वेगळी दिसत आहे. येथे गोलंदाजांना मदत मिळत असल्याचे दिसत आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २५ एप्रिलपर्यंत बेंगळुरू आणि दक्षिण कर्नाटकच्या इतर भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या काळात शहरात हलका ते मध्यम पाऊस आणि गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार, बेंगळुरूमध्ये कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत एकूण ३० सामने खेळवण्यात आले आहेत. आरसीबीने १६ सामने जिंकले आहेत. तर राजस्थानने १४ सामने आपल्या नावे केले आहेत. आज राजस्थान रॉयल्स हा सामना जिंकून पराभवाचे अंतर कमी करू शकते.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फिल साल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रोमारियो शेफर्ड, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवुड.
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (क), नितीश राणा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना/क्वेना मफाका, संदीप शर्मा, तुषार दे.