फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : एडन मार्कराम आणि सूर्यकुमार यादव हे दोन्ही देशाचे कर्णधार आज आमनेसामने असणार आहेत. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आजपासून T२० मालिकेचा शुभारंभ होणार आहे. टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीमध्ये आज मैदानात उतरणार आहे. आता भारताचा संघ कशाप्रकारे कामगिरी करेल यावर क्रिकेट प्रेमींची नजर असणार आहे. भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०२४ मध्ये झालेला T२० विश्वचषकच्या अंतिम सामन्यात लढत झाली होती यामध्ये भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून जेतेपद नावावर केले होते. यावेळी भारताचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत होता. विश्वचषकानंतर रोहित शर्माने T२० फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आता भारताचा संघ T२० फॉरमॅटमध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळत आहे. बांग्लादेशविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताच्या संघाने कमालीची कामगिरी करत ३-० ने मालिका नावावर केली होती. आता भारताच्या संघासमोर उपविजेत्या संघाचे मोठे आव्हान असणार आहे. याचसंदर्भात आता भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्याची लाईव्ह कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारतीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T20 सामना शुक्रवार, ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. भारतीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T20 सामना किंग्समीड, डर्बन येथे खेळवला जाणार आहे. भारतीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T20 सामना स्पोर्ट्स 18 चॅनेलवर पाहता येणार आहे. त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावरही पाहता येईल.
हेदेखील वाचा – IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग 11!
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आतापर्यत २७ सामने खेळले गेले आहेत. यामधील १५ सामने भारताच्या संघाने जिंकले आहेत. तर ११ सामने दक्षिण आफ्रिकेच्या संघाने जिंकले आहेत. यामध्ये एक सामना अनिर्णयीत राहिला आहे. त्यामुळे भारताच्या संघाचे पारडे जड दिसत आहे.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार विष्णोई, अविनाश खान, विजयकुमार खान. , यश दयाल.
एडन मार्कराम (कर्णधार), ओटनीएल बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मॅपोंगवाना, न्काबा पीटर, रायन रिकेल्टन, एंडिले सिमेलाब्स, अँडिले सिमेलाब्स, न्काबा पीटर.