अंकुश भारद्वाज(फोटो-सोशल मीडिया)
Ankush Bhardwaj accused of sexual assault : राष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक अंकुश भारद्वाजला राष्ट्रीय रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने निलंबित करण्यात आले आहे. अंकुश भारद्वाजवर १७ वर्षीय महिला नेमबाजावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोप आहे. त्यामुळे त्याच्यावर राष्ट्रीय रायफल असोसिएशन ऑफ इंडियाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.त्यामुळे आता सर्वांना अंकुश भारद्वाज कोण आहे? असा प्रश्न पडला आहे. अंकुश हा एक माजी राष्ट्रीय नेमबाजपटू आहे. त्यांच्या पत्नीचे नाव अंजुम मुदगिल असून ती एक प्रसिद्ध माजी ऑलिंपिक नेमबाज देखील राहिलेली आहे.
अंकुश भारद्वाजला शूटिंग असोसिएशन ऑफ इंडियाकडून तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्याच्यावर कायदेशीर कारवाई देखील सुरू करण्यात आली आहे. अंकुश वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नसून २०१० मध्ये देखील जर्मनीमध्ये झालेल्या ज्युनियर स्पर्धेत बीटा ब्लॉकर्ससाठी पॉझिटिव्ह चाचणी आल्यानंतर, साईने त्याच्यावर डोपिंग उल्लंघनासाठी बंदी घातली होती.
मूळचा हरियाणाचा असलेल्या अंकुश भारद्वाजने २००५ मध्ये एनसीसी कॅम्पमध्ये नेमबाजी सुरू केली होती. त्यानंतर त्याने देहरादून येथील जसपाल राणा इन्स्टिट्यूट ऑफ शूटिंग अँड स्पोर्ट्स येथे पुढील प्रशिक्षण घेण्यात आले होते.
हेही वाचा : ‘बुमराहच्या प्रोत्साहनामुळे दुखापतीतून…’, भारताच्या अष्टपैलू श्रेयंका पाटीलने केला मोठा खुलासा
अंकुश भारद्वाजने २००७ मध्ये जीव्ही मावळंकर नेमबाजी स्पर्धेत अपवादात्मक कामगिरीचा नजारा पेश करून तीन सुवर्णपदके जिंकण्याची किमया साधली होती. त्यानंतर त्याने २००८ च्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत ५० मीटर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई केली होती. त्याचा प्रवास तिथेच संपला नाही तर त्याने देशासाठी अनेक पदके जिंकली आहेत.
बांगलादेशमध्ये अलिकडेच एका हिंदू महिलेवर अत्याचार करण्यात आला आहे. तसेच तिच्यावर सामूहिक बलात्कार देखील करण्यात आला होता आणि त्यानंतर तिला झाडाला बांधण्यात आले आणि तिचे केस कापण्यात आले. या घटनेने देशातील कायदा आणि सुव्यवस्थेचा अभाव आणि अल्पसंख्यांकांवरील वाढता अत्याचाराचा प्रश्न गंभीर झाला आहे. दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांवर आपली तीव्र चिंता व्यक्त केली आहे. शिखर धवनने या घटनेवर ट्विट करून दुःख करत पीडितेला न्याय आणि पाठिंबा मिळावा अशी प्रार्थना देखील केली आहे.






