Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

The Making of a Cricketer: गल्ली क्रिकेट ते थेट वर्ल्ड कप! Nandini Sharma ने घडवला इतिहास, वाचा संघर्षाची कहाणी

नंदनी शर्माचा प्रवास थक्क करणारा आहे. तिची भारतीय संघात निवड झाल्याने संपूर्ण चंदीगडसह देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 'डब्ल्यूपीएल २०२६' मुळे नंदिनी शर्मा खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 16, 2026 | 05:53 PM
The Making of a Cricketer: गल्ली क्रिकेट ते थेट वर्ल्ड कप! Nandini Sharma ने घडवला इतिहास, वाचा संघर्षाची कहाणी

The Making of a Cricketer: गल्ली क्रिकेट ते थेट वर्ल्ड कप! Nandini Sharma ने घडवला इतिहास, वाचा संघर्षाची कहाणी

Follow Us
Follow Us:
  • नंदनी शर्माची भारतीय महिला संघात निवड 
  • महिला प्रीमियर लीगमध्ये केलेले शानदार प्रदर्शन
  •  लहानपणी मुलांसोबत गिरवले क्रिकेटचे धडे
Nandini Sharma/तेजस भागवत: आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप २०२६ चा थरार सुरू झाला असून बीसीसीआयने जाहीर केलेल्या भारतीय संघात एका नावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ते नाव म्हणजे वेगवान गोलंदाज नंदिनी शर्मा गल्ली क्रिकेटपासून सुरू झालेला तिची ही कहाणी आणि थेट टीम इंडियाच्या जर्सीपर्यंतचा तिचा हा थक्क करणारा प्रवास नेमका कसा होता? त्याबाबत जाणून घेऊयात.

नंदिनी शर्मा महिला प्रीमियर लीगमुळे खऱ्या अर्थाने चर्चेत आली. २४ वर्षीय नंदिनीचा जन्म चंदीगडमध्ये झाला. २४ वर्षीय या खेळाडूचा समावेश बीसीसीआयने थेट भारतीय महिला क्रिकेट संघात टी २० वर्ल्ड कपसाठी केला आहे. त्यामुळे अनकॅप्ड खेळाडूला बीसीसीआयने संधी दिल्याने संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले आहे.

नंदनी शर्माचा प्रवास थक्क करणारा आहे. तिची भारतीय संघात निवड झाल्याने संपूर्ण चंदीगडसह देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘डब्ल्यूपीएल २०२६’ मुळे नंदिनी शर्मा खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने लिलावादरम्यान २० लाख रुपयांच्या मूल किंमतीमध्ये संघात सामील करून घेतले होते. त्या संधीचे तिने सोने करून दाखवले. यामुळेच तिची भारतीय संघात निवड झाल्याचे दिसून येत आहे.

दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना नंदिनीने अत्यंत शानदार खेळी केली. तिने १० सामन्यांमध्ये एकूण १७ विकेट्स घेत सर्वांना चकित करून टाकले. गुजरातविरुद्ध एकाच सामन्यात तिने तब्बल ५ विकेट्स पटकावल्या होत्या. तसेच  दिल्ली कॅपिटल्सच्या इतिहासात एकाच सामन्यात ५ विकेट्स आणि ‘हॅट्ट्रिक’ घेणारी ती पहिली भारतीय गोलंदाज ठरली आहे.

नंदिनी शर्माचा जन्म चंदीगडमध्ये २० सप्टेंबर २००१ मध्ये झाला. लहानपणापासूनच तिला क्रिकेट खेळण्याची आवड होती. चंडीगडच्या गल्लीबोळात मुलांसोबत क्रिकेट खेळत क्रिकेटचे धडे गिरवले. चंडीगडच्या वरिष्ठ महिला संघाचे नेतृत्वही तिने केले आहे. २०२५ मध्ये महिला प्रीमियर लीगमध्ये तिने आरसीबीकडून नेट बॉलर म्हणून काम केले. तसेच फेब्रुवारी महिन्यात बँकॉक येथे झालेल्या ‘वुमेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स’ स्पर्धेत तिने ‘इंडिया ए’ संघाचे प्रतिनिधित्व करत निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

कसा होता नंदिनी शर्माचा प्रवास? 

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झालेल्या नंदिनीला लहानपणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड होती. तिने तिच्या क्रिकेट प्रवासाची सुरुवात चंडीगडच्या गल्लीबोळात मुलांसोबत खेळून केली. गल्ली क्रिकेट खेळता खेळता तिच्यातील वेगवान गोलंदाजीची अचूकता तिच्या भावाने आणि प्रशिक्षकांनी ओळखली आणि तिला व्यावसायिक क्रिकेटचे धडे देण्यास सुरुवात केली.

घरची परिस्थिती बेटाची असताना देखील कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर तिने क्रिकेटमध्ये आपली स्वतःची ओळख निर्माण केली. तिने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाब आणि चंदीगड संघाकडून उत्तम कामगिरी केली. तिच्या जबरदस्त फॉर्ममुळे चंडीगडच्या वरिष्ठ महिला संघाचे उपकर्णधार आणि कर्णधारपदही भूषवले आहे.

टर्निंग पॉईंट

नंदिनी शर्मा या  अनकॅप्ड वेगवान गोलंदाजाला बीसीसीआयने भारतीय संघात स्थान दिले आहे. डब्ल्यूपीएल आणि आशिया कपमधील याच वादळी कामगिरीच्या जोरावर तिने हे स्थान मिळवले आहे. गल्लीबोळातून सुरू झालेला तिचा हा प्रवास आज देशातील लाखो मुलींसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.

Web Title: Who is nandani sharma young star earns direct entry into indian womens t20 world cup squad the making of a cricketer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • bcci
  • ICC Women's T20 World Cup
  • Indian Women Cricket Team
  • The Making of A Cricketer

संबंधित बातम्या

Breaking: क्रिकेट विश्वात खळबळ उडणार! अजित आगरकरांचा पत्ता कट? ‘हा’ खेळाडू नवा चीफ सिलेक्टर?
1

Breaking: क्रिकेट विश्वात खळबळ उडणार! अजित आगरकरांचा पत्ता कट? ‘हा’ खेळाडू नवा चीफ सिलेक्टर?

Asian Games 2026: सेमीफायनलसाठी ‘हे’ 4 संघ सज्ज; पदकासाठी ‘आरपार’ची लढाई!  कोण कोणाशी भिडणार?
2

Asian Games 2026: सेमीफायनलसाठी ‘हे’ 4 संघ सज्ज; पदकासाठी ‘आरपार’ची लढाई! कोण कोणाशी भिडणार?

IND W vs JPN W: जपान ५७ धावांत गारद, शफालीने उडवला धुरळा; टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये दिमाखात एन्ट्री
3

IND W vs JPN W: जपान ५७ धावांत गारद, शफालीने उडवला धुरळा; टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये दिमाखात एन्ट्री

Asian Games 2026: एशियन गेम्समध्ये भारत अन् जपान भिडणार; कधी आणि कुठे पहाल सामना?
4

Asian Games 2026: एशियन गेम्समध्ये भारत अन् जपान भिडणार; कधी आणि कुठे पहाल सामना?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.