Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Who Is Praful Hinge: SRH Vs RR मध्ये पदार्पणातच उडवली राजस्थान रॉयलची झोप, कोण आहे मराठमोळा प्रफुल हिंगे?

२०२६ च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून पदार्पण करणाऱ्या वेगवान गोलंदाज प्रफुल्ल हिंगेने आपल्या पहिल्याच षटकात तीन बळी घेत खळबळ उडवून दिली. कोण आहे मराठमोळा प्रफुल हिंगे?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 13, 2026 | 10:58 PM
कोण आहे प्रफुल हिंगे, पदार्पणातच रचला इतिहास (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

कोण आहे प्रफुल हिंगे, पदार्पणातच रचला इतिहास (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • राजस्थान रॉयल्सच्या ३ खेळाडूंना एकामागोमाग एक पाठवले चंबूत परत 
  • कोण आहे SRH चा मराठमोळा खेळाडू प्रफुल हिंगे 
  • पहिल्याच षटकात ३ विकेट्स घेत पदार्पण 
गेल्या 4 सामन्यात सलग विजय मिळविणाऱ्या राजस्थान रॉयलचा पगडा आजच्या मॅचमध्ये जड होता. हैदराबादने बॅटिंगला सुरूवात करताना पहिलीच विकेट गमावली होती. मात्र 217 चा चांगला धावांचा डोंगर त्यांनी उभा केला. मात्र हा धावांचा डोंगर वैभव सूर्यवंशी नक्कीच पूर्ण करू शकेल असा विश्वास असताना राजस्थान रॉयलचा अर्धा संघ काही धावांमध्येच गारद झाला आणि हा पराक्रम केलाय सनरायझर्स हैदराबादमधून पदार्पण करणाऱ्या मराठमोळ्या युवकाने. 

सनरायझर्स हैदराबादकडून IPL 2026 मध्ये पदार्पण करणाऱ्या २४ वर्षीय वेगवान गोलंदाज प्रफुल्ल हिंगेने आपल्या पहिल्याच षटकात राजस्थान रॉयल्सला गुडघे टेकायला लावले. प्रफुल्लच्या भेदक गोलंदाजीने सर्वप्रथम वैभव सूर्यवंशीला बाद केले. राजस्थान सावरण्यापूर्वीच प्रफुल्लने ध्रुव जुरेललाही बाद केले. आपल्या पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर प्रफुल्लने ड्वेन प्रिटोरियसला बाद करून इतिहास रचला.

प्रफुल्लने रचला इतिहास 

प्रफुल्ल आयपीएलच्या इतिहासात पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्याच षटकात तीन बळी घेणारा पहिला खेळाडू ठरला आहे. प्रफुल्लने आपल्या पहिल्या षटकात बाद केलेले तिन्ही फलंदाज आपले खाते उघडण्यात अपयशी ठरले. वैभव सूर्यवंशीचा पहिलाच बळी घेत प्रफुल्लने आपल्या नावाची चर्चा करायला सर्वांनाच भाग पाडले आहे. विदर्भातील हा मराठमोळा खेळाडू पहिल्याच मॅचमध्ये प्रचंड प्रसिद्ध झालाय. चला तर मग जाणून घेऊया, सनरायझर्सचा हा भेदक पदार्पण करणारा खेळाडू कोण आहे.

SRH Vs RR: हैदराबादमध्ये Ishan Kishan ची रॉयल ‘धुलाई’; राजस्थानला 5 व्या विजयासाठी 217 रन्सची गरज

२४ वर्षीय वेगवान गोलंदाज प्रफुल्ल हिंगे कोण आहे?

२४ वर्षीय प्रफुल्ल हिंगे देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ संघाकडून खेळतो. प्रफुल्लने २०१४ मध्ये विदर्भकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. गेल्या रणजी ट्रॉफी हंगामात प्रफुल्लने आपल्या भेदक गोलंदाजीने खळबळ उडवून दिली. परिणामी, सनरायझर्सच्या स्काउटिंग टीमने त्याला केवळ ३० लाख रुपयांच्या मूळ किमतीत आपल्या संघात घेतले. प्रफुल्ल हिंगेला या हंगामातील पहिल्या चार सामन्यांमध्ये संधी मिळाली नाही, परंतु त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात सनरायझर्ससाठी आपली छाप पाडली.

प्रफुल्लच्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने विदर्भकडून एकूण १० प्रथम श्रेणी आणि ६ लिस्ट ए सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रफुल्लने विदर्भसाठी एकूण २७ बळी घेतले आहेत, तर ६ लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने ५ बळी घेतले आहेत. विशेष म्हणजे, आयपीएल पदार्पणापूर्वी प्रफुल्लने फक्त एक टी-२० सामना खेळला होता, ज्यात त्याने २४ धावांत १ बळी घेतला होता.

SRH Vs RR Live: रियान परागने टॉस जिंकला; एसआरएच विरुद्ध घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Web Title: Who is praful hinge dismissed 4 players from rajasthan royals vaibhav sooryavanshi dhruv jurel on duck in ipl 2026 debut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 10:58 PM

Topics:  

  • IPL 2026
  • SRH vs RR
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

“…त्यांच्यासाठी तो मोठी डोकेदुखी ठरणार”; Vaibhav Suryavanshi बाबत शुभमन गिलचे मोठे विधान
1

“…त्यांच्यासाठी तो मोठी डोकेदुखी ठरणार”; Vaibhav Suryavanshi बाबत शुभमन गिलचे मोठे विधान

RCB vs GT Final मध्ये पावसाचा खोळंबा ? सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार IPL ट्रॉफी? वाचा ‘हे’ नियम
2

RCB vs GT Final मध्ये पावसाचा खोळंबा ? सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार IPL ट्रॉफी? वाचा ‘हे’ नियम

Mumbai Indians: हार्दिक पांड्याची जागा घेऊ शकतात ‘हे’ 4 खेळाडू, कोण ठरणार पुढचा कॅप्टन? Rohit Sharma पुन्हा घेणार जागा?
3

Mumbai Indians: हार्दिक पांड्याची जागा घेऊ शकतात ‘हे’ 4 खेळाडू, कोण ठरणार पुढचा कॅप्टन? Rohit Sharma पुन्हा घेणार जागा?

RCB vs GT Final: ऑरेंज-पर्पल कॅपसाठी महाथरार! भुवीला मोठा झटका; गिल-सुदर्शन आमनेसामने, कोणाच्या डोक्यावर सजणार ताज?
4

RCB vs GT Final: ऑरेंज-पर्पल कॅपसाठी महाथरार! भुवीला मोठा झटका; गिल-सुदर्शन आमनेसामने, कोणाच्या डोक्यावर सजणार ताज?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.