Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CWG 2026: वडिलांचे स्वप्न, मुलाचा पराक्रम! शेवटच्या थ्रोने जिंकले कांस्यपदक; कोण आहे भारताचा नवा स्टार Yashvir Singh?

who is Yashvir Singh Won Bronze medal in CWG 2026 Glasgow: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भालाफेक प्रकारात भारताने दोन पदके जिंकली. ज्यात नीरज चोप्राने रौप्य पदक आणि २४ वर्षीय यशवीर सिंगने कांस्य पदक पटकावले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 01, 2026 | 01:56 PM
CWG 2026: वडिलांचे स्वप्न, मुलाचा पराक्रम! शेवटच्या थ्रोने जिंकले कांस्यपदक; कोण आहे भारताचा नवा स्टार Yashvir Singh?
Follow Us
Follow Us:
  • कोण आहे भारताचा नवा स्टार यशवीर सिंग?
  • यशवीर सिंगने अंतिम फेरीत बाजी पलटवली
  • यशवीरने वडिलांचा वारसा पुढे नेला
राष्ट्रकुल क्रीडा २०२६ च्या ( Commonwealth Games 2026) स्पर्धेतील पुरुषांच्या भालाफेक पदक स्पर्धेत, भारताच्या नीरज चोप्रा आणि यशवीर सिंगने रौप्य आणि कास्ंय पदकावर आपले नाव कोरले. एकीकडे सर्वांच्या नजरा भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रावर होत्या. परंतु, यशवीर सिंगने अप्रतिम कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. २४ वर्षीय खेळाडू यशवीर सिंगने पदक स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपल्या शेवटच्या प्रयत्नात ८५.४१ मीटर भाला फेकून कांस्य पदक जिंकले. ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी देखील आहे. यशवीर सिंगने आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पहिल्यांदाच पदक जिंकण्यात यश मिळवले.

CWG 2026: अवघ्या 1 किलोने सुवर्ण हुकले! Lovepreet Singh ने विक्रमी वजन उचलत जिंकले रौप्यपदक

यशवीर सिंगने अंतिम फेरीत बाजी पलटवली

राष्ट्रकुल खेळांचा अंतिम सामना सोपा नव्हता. एका बाजूला भारताचा नीरज चोप्रा होता, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचा ऑलिम्पिक चॅम्पियन अर्शद नदीम, ग्रेनेडाचा विश्वविजेता अँडरसन पीटर्स आणि श्रीलंकेचा रुमेश थरंगा पाथिराजे यांसारखे प्रमुख खेळाडू होते. सुरुवातीला, श्रीलंकेच्या थरंगाने ८९.७५ मीटरच्या शानदार थ्रोसह आघाडी घेतली. नीरज चोप्रा ८५.८३ मीटरसह दुसऱ्या स्थानावर होता. यशवीर पदकाच्या शर्यतीत होता, पण अँडरसन पीटर्स त्याच्या पुढे होता.

भालाफेकीच्या अंतिम फेरीत यशवीर सिंगची सुरुवात खराब झाली. पहिल्या प्रयत्नात फाऊल झाल्यामुळे त्याने दुसऱ्या प्रयत्नात ७८.५५ मीटर भाला फेकला. तिसऱ्या फेरीत, यशवीर सिंगने ८१.३३ मीटर भाला फेकून आपल्या कामगिरीत सुधारणा केली आणि अंतिम आठमध्ये आपले स्थान निश्चित केले. चौथ्या फेरीत, पाचव्या प्रयत्नात ७६.९५ मीटर भाला फेकल्यानंतर यशवीर सिंगने पुन्हा फाऊल केल्यामुळे तो सहाव्या स्थानावर राहिला. अंतिम फेरीत, जेव्हा सर्वांना वाटले की भारताला फक्त एकाच पदकावर नाव कोरेल, तेव्हा यशवीर सिंगने भाला फेकला, काही क्षणासाठी संपूर्ण स्टेडियम शांत झाला. या ८५.४१ मीटर फेकीने सर्वांना आश्चर्यचकित केले. यशवीरने शेवटच्या फेरीत बाजी पलटवली आणि तिसरे स्थान पटकावत कांस्य पदक जिंकले

कोण आहे यशवीर सिंग ?

२२ ऑक्टोबर २००१ रोजी हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यातील देवसर गावात जन्मलेल्या यशवीर सिंगसाठी भालाफेक हा खेळ नवीन नव्हता. यशवीरचे वडील, राय सिंग राष्ट्रीय स्तरावरील भालाफेकपटू खेळाडू होते. त्यांनी रेल्वेकडून खेळताना अनेक किताब जिंकले आणि नंतर ते प्रशिक्षक बनले.

यशवीरने वडिलांचा वारसा पुढे नेला

२०१५ मध्ये, जेव्हा यशवीर फक्त १४ वर्षांचा होता, तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला स्वतः भालाफेक शिकवायला सुरुवात केली. त्यांनी यशवीरकडून प्रत्येक रन- अप, पाऊल, रिलीज आणि प्रत्येक टेकनिकवर तासनतास कठोर मेहनत घेतली. आपल्या करिअरमध्ये त्यांनी ज्या चुका केल्या त्या चुका आपल्या मुलाने पुन्हा करू नये, अशी त्यांची इच्छा होती.

नीरज चोप्राचा रेकॉर्ड मोडला

ज्युनियर स्तरावर चॅम्पियन असलेल्या यशवीरने अंडर-१८ राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये सलग दोन सुवर्णपदके जिंकली. त्यानंतर त्याने ज्युनियर नॅशनल्समध्ये रौप्यपदक जिंकले. पण जेव्हा त्याने इंडियन अंडर-२० फेडरेशन कपमध्ये नीरज चोप्राचा पूर्वीचा स्पर्धेतील विक्रम मोडला तेव्हा त्याला खरी ओळख मिळाली. कोणत्याही तरुण भारतीय भालाफेकपटूसाठी ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी होती.

८०-मीटर क्लबमध्ये प्रवेश आणि आंतरराष्ट्रीय ओळख

२०२२ मध्ये, यशवीरने प्रथमच ८०-मीटरचा टप्पा यशस्वीपणे पार केला. २०२५ मध्ये, त्याने आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ८२.५७ मीटरच्या थ्रोसह पाचवे स्थान पटकावले. त्याने उझबेकिस्तानमधील जी. अर्झुमानोव्ह मेमोरियल मीटमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि त्यानंतर जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. जून २०२६ मध्ये, त्याने ८३.७२ मीटरच्या थ्रोसह राष्ट्रकुल खेळांमधील आपले स्थान जवळपास निश्चित केले होते.

‘तू तुझ्या नावाप्रमाणेच अजिंक्य’…Ajinkya Rahane च्या निवृत्तीवर पत्नी राधिकाची भावनिक पोस्ट

Web Title: Who is yash vir singh won bronze medal in javelin throw cwg 2026 glasgow neeraj won silver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • Bronze Medal
  • commonwealth games 2026
  • javelin throw
  • Neeraj Chopra

संबंधित बातम्या

हे काय बोलून गेला Neeraj Chopra? ‘मी नसलो तरी भारताकडे पदक…’; PM Modi यांनी शेअर केली खास पोस्ट
1

हे काय बोलून गेला Neeraj Chopra? ‘मी नसलो तरी भारताकडे पदक…’; PM Modi यांनी शेअर केली खास पोस्ट

Commonwealth Games 2026: नीरज चोप्रा आणि यश सिंहने Javelin मध्ये केली कमाल! सिल्व्हर-ब्राँझ आणले भारतात
2

Commonwealth Games 2026: नीरज चोप्रा आणि यश सिंहने Javelin मध्ये केली कमाल! सिल्व्हर-ब्राँझ आणले भारतात

Commonwealth Games 2026: अस्मिता डे ने रचला इतिहास, Judo मध्ये कमावले पहिले Gold Medal; भारताची मान उंचावली
3

Commonwealth Games 2026: अस्मिता डे ने रचला इतिहास, Judo मध्ये कमावले पहिले Gold Medal; भारताची मान उंचावली

Commonwealth Games 2026: भारताचे २ मेडल्स झाले पक्के! प्रिती पवार आणि अंकुश पांघलने Boxing मध्ये मिळवली जागा
4

Commonwealth Games 2026: भारताचे २ मेडल्स झाले पक्के! प्रिती पवार आणि अंकुश पांघलने Boxing मध्ये मिळवली जागा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.