GT vs PBKS: Bowlers' pace or batsmen's fight? What exactly is the Ahmedabad pitch like? Find out...
GT vs PBKS : आयपीएल 2025 चा 5 वा सामना आज 25 मार्च रोजी गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याने दोन्ही संघ 18 व्या हंगामातील आपल्या मोहिमेची सुरुवात विजयी करण्यास प्रयत्नशील असणार आहेत. गुजरातची कमान धुरा युवा शुबमन गिलच्या खांद्यावर असेल तर पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर सांभाळणार आहे.
एका हिशोबानुसार हे दोन्ही खेळाडू भविष्यात टीम इंडियाचे कर्णधार असतील, असे मानले जात आहे. अशा स्थितीत दोघांमधील हे युद्ध खूपच रंजक असणार असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे श्रेयस अय्यर पंजाब किंग्जची जबाबदारी सांभाळणार आहे, तर दुसरीकडे शुबमन गिल गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे. हे दोन्ही कर्णधार यंदाच्या हंगामात विजयी सुरवात करण्याचा प्रयत्न करतील.
शुभमन गिल यावर्षी दुसऱ्यांदा गुजरात टायटन्सचे कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. तर दुसरीकडे, आयपीएल 2025 च्या सर्वात महागड्या कर्णधारांच्या यादीत ऋषभ पंतनंतर श्रेयस अय्यर दुसऱ्या स्थानावर जाऊन बसला आहे. यापूर्वी अय्यर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार होता. गेल्या वर्षी 2024 मध्ये कोलकाता संघाने अय्यरच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2024 चे विजेतेपद आपल्या नावे केले होते. अशा स्थितीत पंजाब किंग्ज संघाला या मोसमात देखील अय्यरकडून खूप अपेक्षा असणार आहेत.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीचा इतिहास दाखवतो की येथे फलंदाजी करणे थोडे सोपे आहे. यामागचे कारण म्हणजे चेंडू योग्य पद्धतीने बॅटवर येणे. या मैदानावर उत्कृष्ट उसळी आहे. मात्र, वेगवान गोलंदाजांनाही येथे थोडी मदत मिळते. पण हे मैदान फिरकीपटूंसाठी तेवढे आश्वासक मानले जात नाही.
आजच्या सामन्यात दोघांमध्ये जोरदार संघर्ष रंगणार आहे. इथे सामना म्हणजे सामन्याचा थरार रंगणार आहे. दोन्ही संघांमध्ये एकापेक्षा एक सरस खेळाडू आहेत, ज्यांच्याकडे सामना कधीही बदलण्याची क्षमता आहे. पण या सामन्यात जो संघ नंतर फलंदाजी करेल त्याला विजयाची संधी जास्त असणार आहे.
गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 5 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये गुजरात संघाने 3 वेळा तर पंजाब संघाने 2 वेळा विजय प्राप्त केला आहे. पण गेल्या वर्षी पंजाबच्या संघाने गुजरातमध्येच जीटी संघाचा पराभव केला होता. परंतु सर्वार्थाने आकडेवारी पाहता गुजरातचा संघ पंजाबपेक्षा वरचढ असल्याचे दिसून येते.
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, साई सुदर्शन, शाहरुख खान, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, रशीद खान, कागिसो रबाडा, प्रसीद कृष्णा, मोहम्मद सिराज.
पंजाब किंग्स : प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, नेहल बधेरा, मार्को जॅनसेन, लॉकी फर्ग्युसन, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.