Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WI vs AUS 2nd Test : दुसऱ्या दिवशी 12 विकेट्स, वेस्ट इंडिज पहिल्या डावात 253 धावांवर गडगडला; ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात

ग्रेनाडातील सेंट जॉर्जेस येथील नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २ विकेट गमावल्यानंतर १२ धावा केल्या आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 05, 2025 | 11:28 AM
फोटो सौजन्य – X (ICC)

फोटो सौजन्य – X (ICC)

Follow Us
Close
Follow Us:

ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज सामन्याचा अहवाल : ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये तीन सामन्याची कसोटी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेचा दुसरा सामना सध्या सुरु आहे. या सामन्याचे दोन दिवस पार पडले आहेत. पहिल्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजय मिळवल्यानंतर आता कागांरुचा संघ हा दुसऱ्या सामन्यात गडगडला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. ग्रेनाडातील सेंट जॉर्जेस येथील नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २ विकेट गमावल्यानंतर १२ धावा केल्या आहेत. कांगारू संघाकडे ४५ धावांची आघाडी आहे.

पहिल्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २८६ धावांवर संपला. दुसऱ्या दिवसाची सुरुवात वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावाने झाली. ब्रँडन किंगच्या अर्धशतकामुळे वेस्ट इंडिजच्या संघाने पहिल्या डावात २५३ धावा केल्या. त्याच्याशिवाय इतर कोणताही फलंदाज काही खास करू शकला नाही. अर्धशतक पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर असताना जॉन कॅम्पबेल झेलबाद झाला. त्याने ५२ चेंडूत ४० धावा केल्या.

‘I believe in myself & Jassie Bhai’ बुमराहच्या अनुपस्थितीबद्दल काय म्हणाला सिराज? आकाशदीपचे केले कौतुक

वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली आणि संघाला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. जोश हेझलवूडने क्रेग ब्रॅथवेटला झेलबाद केले. क्रेग ब्रॅथवेटने ८ चेंडू खेळले आणि त्याला खातेही उघडता आले नाही. केसी कार्टीने ६, कर्णधार रोस्टन चेसने १६, शाई होपने २१, जस्टिन ग्रीव्हजने १, अल्झारी जोसेफने २७ आणि अँडरसन फिलिपने १० धावा केल्या.

The end of an enthralling day’s play. More of the same tomorrow 💪🏾 #WIvAUS | #FullAhEnergy pic.twitter.com/IHKEUKNrXk — Windies Cricket (@windiescricket) July 4, 2025

जेडेन सील्स ७ धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नाथन लायनने ३ बळी घेतले. त्याच्याशिवाय कर्णधार पॅट कमिन्स आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने प्रत्येकी २-२ बळी घेतले. मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर आणि ट्रॅव्हिस हेड यांना १-१ यश मिळाले. पहिल्या डावाच्या आधारे ऑस्ट्रेलियाला ३३ धावांची आघाडी मिळाली.

तथापि, दुसऱ्या डावात कांगारूंची सुरुवात खराब झाली. संघाने ४ धावांच्या आत २ विकेट गमावल्या. पहिल्याच षटकात जेडेन सील्सने सॅम कॉन्स्टासला बाद केले. पहिल्या डावात २५ धावा करणाऱ्या सॅम कॉन्स्टासला दुसऱ्या डावात खातेही उघडता आले नाही. तिसऱ्या षटकात उस्मान ख्वाजा (२) सील्सने एलबीडब्ल्यू केला. खेळ थांबला तेव्हा कॅमेरॉन ग्रीन ६ आणि नाथन लायन २ धावांवर नाबाद आहेत.

Web Title: Wi vs aus 2nd test 12 wickets on the second day west indies bowled out for 253 in the first innings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 11:28 AM

Topics:  

  • Aus vs WI
  • cricket
  • Sports

संबंधित बातम्या

प्रसिद्ध युट्यूबर MrBeast ला Virat Kohli सोबत बनवायचा आहे एक व्हिडिओ, सोशल मिडियावर पोस्ट शेअर करुन केली विनंती
1

प्रसिद्ध युट्यूबर MrBeast ला Virat Kohli सोबत बनवायचा आहे एक व्हिडिओ, सोशल मिडियावर पोस्ट शेअर करुन केली विनंती

दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेत्याचा मोठा निर्णय! नीरज चोप्राने JSW Sports शी तोडले संबंध
2

दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेत्याचा मोठा निर्णय! नीरज चोप्राने JSW Sports शी तोडले संबंध

AUS vs ENG : स्टीव्ह स्मिथ बनला अ‍ॅशेसचा शतकवीर,  इंग्लिश दिग्गजाचा मोडला विक्रम! डॉन ब्रॅडमन अजूनही आघाडीवर
3

AUS vs ENG : स्टीव्ह स्मिथ बनला अ‍ॅशेसचा शतकवीर, इंग्लिश दिग्गजाचा मोडला विक्रम! डॉन ब्रॅडमन अजूनही आघाडीवर

13 षटकार, 12 चौकार… राजस्थान राॅयल्सचं नशीब चमकलं! IPL 2026 आधी 21 वर्षीय खेळाडूने झळकावले द्विशतक
4

13 षटकार, 12 चौकार… राजस्थान राॅयल्सचं नशीब चमकलं! IPL 2026 आधी 21 वर्षीय खेळाडूने झळकावले द्विशतक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.