फोटो सौजन्य - IndianPremierLeague
आयपीएल 2025 : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे देशात नावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच कारणामुळे कालचा सामना म्हणजेच 8 एप्रिल रोजी सुरू असलेल्या सामना थांबवण्यात आला आणि स्पर्धा देखील काही वेळासाठी स्थगित करण्यात आली आहे. बीसीसीआयने आयपीएल 2025 चा हा 18 वा सीजन भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील तणावाच्या वातावरणामुळे एक आठवड्यासाठी स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. बीसीसीआय सांगितले आहे की या तणावाच्या वातावरणानंतर ज्याप्रकारे हालत असेल त्याचे निरीक्षण केले जाईल त्यानंतरच स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.
बीसीसीआयने असेही सांगितले आहे की क्रिकेट चाहत्यांनी आधीच तिकीट बुक केलेले होते त्या टिकीटांचे पैसे प्रेक्षकांना परत करण्यात येणार आहेत. त्या संदर्भात अनेक आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यासंदर्भात पहिला प्रश्न असा की एक आठवड्यानंतर आयपीएल सुरू झाले तर विदेशी खेळाडू भारतामध्ये थांबणार आहेत की ते स्वतःच्या देशामध्ये जाणार आहेत. एवढेच नव्हे तर क्रिकेट प्रेक्षक हे ही जाणण्यासाठी उत्सुक आहेत की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरू असलेल्या लढाई च्या येताना वाचा वातावरणावर विदेशी खेळाडूंची प्रतिक्रिया काय आहे.
परदेशी खेळाडू आता आयपीएलमधून त्यांच्या देशात परततील. आयपीएलशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की लष्करी संघर्षामुळे परदेशी खेळाडूंमध्ये बरीच चिंता निर्माण झाली आहे. आयपीएल संघाच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, खेळाडू ठीक आहेत, परंतु जे घडत आहे त्याबद्दल चिंता आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जचे खेळाडू सध्या धर्मशाळेहून रस्त्याने राष्ट्रीय राजधानीत येत आहेत. गेल्या वर्षी झालेल्या मेगा लिलावात १० फ्रँचायझींनी ६२ परदेशी खेळाडूंना करारबद्ध केले होते.
दरम्यान, परदेशी क्रिकेट मंडळांकडूनही प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सिडनीमध्ये सांगितले की ते भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. न्यूझीलंड क्रिकेटर्स असोसिएशननेही भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या सुरक्षा परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड व्यतिरिक्त, इतर काही देशांचे खेळाडू देखील आयपीएलमध्ये सहभागी होत आहेत.