Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 Final: RCB पुन्हा बनणार चॅम्पियन? फायनलमधील ‘हा’ अजेय योद्धा आहे विजयाची 100% गॅरंटी!

RCB vs GT Final: IPL 2026 चा फायनल सामना आज RCB आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. आरसीबीचा स्टार गोलंदाज जोश हेझलवूडचा अजेय फायनल रेकॉर्ड आरसीबीला सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनवणार का?

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 31, 2026 | 04:11 PM
RCB (Photo Credit- X)

RCB (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • RCB पुन्हा बनणार चॅम्पियन?
  • फायनलमधील ‘हा’ अजेय योद्धा आहे विजयाची गॅरंटी
  • आजवर कधीही हरला नाही खिताबी मुकाबला
अहमदाबाद: क्रिकेट जगतातील सर्वात मोठी लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग 2026 चा (IPL 2026) महाअंतिम सामना आज, रविवार 31 मे रोजी अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’वर खेळवला जाणार आहे. या खिताबी लढतीत गतविजेता रॉयल चैलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) हे दोन तगडे संघ आमनेसामने येणार आहेत. आरसीबीने क्वालिफायर-1 च्या सामन्यात गुजरात टायटन्सचा 92 धावांनी धुव्वा उडवत थेट फायनलमध्ये धडक मारली होती. तर दुसरीकडे, गुजरातने क्वालिफायर-2 मध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या महामुकाबल्यात आरसीबी सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी उंचावण्यासाठी सज्ज आहे, तर गुजरात 2022 नंतर आपले दुसरे जेतेपद पटकावण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

आरसीबीचा ‘हा’ मॅचविनर खेळाडू ठरतोय ‘लकी चार्म’

या हाय-व्होल्टेज सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे पारडे जड मानले जात आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे आरसीबीच्या ताफ्यात असा एक अजेय योद्धा आहे, ज्याने क्रिकेट इतिहासात आजवर एकही व्हाईट-बॉल (मर्यादित षटकांचा) फायनल सामना गमावलेला नाही. हा खेळाडू दुसरा कोणी नसून ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड (Josh Hazlewood) आहे. हेझलवूडचा फायनल सामन्यांमधील वैयक्तिक रेकॉर्ड अत्यंत थक्क करणारा आहे. त्याने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत जितके टी-20 आणि आंतरराष्ट्रीय मर्यादित षटकांचे अंतिम सामने खेळले आहेत, त्या सर्व सामन्यांमध्ये त्याचा संघ चॅम्पियन ठरला आहे. आयपीएल 2025 मध्ये आरसीबीला पहिले ऐतिहासिक विजेतेपद मिळवून देण्यातही त्याचा मोठा वाटा होता.

आयपीएल 2025 मध्येही आरसीबीला बनवले होते चॅम्पियन

जोश हेझलवूडच्या या अनोख्या आणि अजेय रेकॉर्डची सुरुवात 2010 मधील अंडर-19 वर्ल्ड कपपासून झाली होती. पाकिस्तानविरुद्धच्या त्या अंतिम सामन्यात हेझलवूडने 4 बळी घेत ऑस्ट्रेलियाला विश्वविजेते बनवले. त्यानंतर त्याने 2012 च्या चॅम्पियन्स लीग टी-20 मध्ये सिडनी सिक्सर्सला जेतेपद मिळवून दिले. 2021 च्या टी-20 वर्ल्ड कप आणि आयपीएल 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्जला (CSK) चॅम्पियन बनवण्यातही त्याचा महत्त्वाचा वाटा होता. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी म्हणजेच आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्सविरुद्धच्या खिताबी लढतीत आरसीबीला पहिले जेतेपद मिळवून देण्यात त्याने मोठी भूमिका बजावली होती.

GT च्या ‘त्या’ दुखण्यावर RCB करणार वार; IPL 2026 Final मध्ये ‘रजत’ सेना इतिहास घडवणार?

जोश हेझलवूडचा ‘अजेय’ फायनल रेकॉर्ड (2010 ते 2025)

वर्ष स्पर्धा / अंतिम सामना संघ गोलंदाजी कामगिरी निकाल
2010 अंडर-19 वर्ल्ड कप फायनल (वि. पाकिस्तान) ऑस्ट्रेलिया 8.4 षटके, 30 धावा, 4 बळी चॅम्पियन
2012 चॅम्पियन्स लीग टी-20 फायनल सिडनी सिक्सर्स 4 षटके, 22 धावा, 3 बळी चॅम्पियन
2015 ओडीआय वर्ल्ड कप फायनल (वि. न्यूझीलंड) ऑस्ट्रेलिया विजेत्या संघाचा प्रमुख भाग चॅम्पियन
2019-20 बिग बॅश लीग फायनल (वि. मेलबर्न स्टार्स) सिडनी सिक्सर्स 3 षटके, 18 धावा, 1 बळी चॅम्पियन
2021 टी20 वर्ल्ड कप फायनल (वि. न्यूझीलंड) ऑस्ट्रेलिया 4 षटके, 16 धावा, 3 बळी चॅम्पियन
2021 आयपीएल फायनल (वि. केकेआर) चेन्नई सुपर किंग्स 4 षटके, 29 धावा, 2 बळी चॅम्पियन
2023 ओडीआय वर्ल्ड कप फायनल (वि. भारत) ऑस्ट्रेलिया 10 षटके, 60 धावा, 2 बळी चॅम्पियन
2025 आयपीएल फायनल (वि. पंजाब किंग्स) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 4 षटके, 54 धावा, 1 बळी चॅम्पियन

गुजरातविरुद्ध शंभर टक्के रेकॉर्ड राखण्याचे आव्हान

हेझलवूडने आतापर्यंत 5 प्रमुख टी-20 फायनल खेळल्या असून सर्वच्या सर्व सामन्यांत विजय मिळवला आहे. आज अहमदाबादच्या मैदानावर गुजरात टायटन्सविरुद्ध खेळताना तो आपला हा 100% विनिंग रेकॉर्ड कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल. हेझलवूडची ही ‘विजयाची गॅरंटी’ आरसीबीला सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकून देणार का, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

RCB vs GT Final पूर्वीच गुजरातला वादळाचा तडाखा; प्रवासाला विलंब; अवघे काही तास आधी टायटन्स अहमदाबादमध्ये दाखल

Web Title: Will rcb become champions again this unbeatable warrior in the final is a 100 guarantee of victory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 04:09 PM

Topics:  

  • Final
  • IPL 2026
  • Josh Hazlewood
  • RCB vs GT
  • Sports News

संबंधित बातम्या

IPL Final 2026: IPL फायनलचा थरार!  विजेत्यावर होणार ‘इतक्या’ कोटींचा वर्षाव; उपविजेताही होणार मालामाल; जाणून घ्या प्राइज मनी
1

IPL Final 2026: IPL फायनलचा थरार! विजेत्यावर होणार ‘इतक्या’ कोटींचा वर्षाव; उपविजेताही होणार मालामाल; जाणून घ्या प्राइज मनी

GT च्या ‘त्या’ दुखण्यावर RCB करणार वार; IPL 2026 Final मध्ये ‘रजत’ सेना इतिहास घडवणार?
2

GT च्या ‘त्या’ दुखण्यावर RCB करणार वार; IPL 2026 Final मध्ये ‘रजत’ सेना इतिहास घडवणार?

RCB vs GT Final पूर्वीच गुजरातला वादळाचा तडाखा; प्रवासाला विलंब; अवघे काही तास आधी टायटन्स अहमदाबादमध्ये दाखल
3

RCB vs GT Final पूर्वीच गुजरातला वादळाचा तडाखा; प्रवासाला विलंब; अवघे काही तास आधी टायटन्स अहमदाबादमध्ये दाखल

‘RCB जिंकली तर टक्कल…’; IPL Final च्या आधी मजेशीर Video Viral;  गुजरातविरुद्ध होणार रोमांचक सामना
4

‘RCB जिंकली तर टक्कल…’; IPL Final च्या आधी मजेशीर Video Viral; गुजरातविरुद्ध होणार रोमांचक सामना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.