Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Sharma Test retirement : रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त  होणार? चाहत्यांच्या प्रश्नांचा पाऊस अन्.. वाच सविस्तर.. 

भारताचा कर्णधार रोहित शर्माने ७ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. या घोषणेने त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी दिसत आहे. चाहत्यांना आता प्रश्न पडला आहे की रोहित एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होईल का?

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 09, 2025 | 09:29 AM
Rohit Sharma Test retirement: Will Rohit Sharma retire from ODI cricket? Fans' questions rain down and.. Read in detail..

Rohit Sharma Test retirement: Will Rohit Sharma retire from ODI cricket? Fans' questions rain down and.. Read in detail..

Follow Us
Close
Follow Us:

Rohit Sharma Test retirement  : भारताचा दिग्गज कर्णधार रोहित शर्माने ७ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. या घोषणेने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या निर्णयामुळे त्याचे चाहते खूप निराश झाल्याचे दिसत आहे. कारण सर्वांना वाटत होते की तो इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत भाग घेईल परंतु या मालिकेपूर्वी त्याने आपली निवृत्ती जाहीर करून सर्वांना धक्का दिला. यावेळी रोहित शर्माने केवळ कसोटी कर्णधारपद सोडले नसून संपूर्ण कसोटी क्रिकेटलाच अलविदा म्हटले आहे.  सध्या हा महान भारतीय क्रिकेटपटू कसोटी क्रिकेटपासून दूर गेला आहे. या बातमीनंतर चाहत्यांना वाटत आहे की, रोहित शर्मा लवकरच एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Bharat pak war : भारतीय ड्रोन हल्ल्यात Rawalpindi Cricket Stadium नेस्तनाबूत! PSL खेळाडूचा जीव टांगणीला..

रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार?

रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार का असे प्रश्न चाहत्यांना पडत आहेत. याबाबत रोहित शर्माचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी चाहत्यांच्या या प्रश्नांना उत्तर दिले आहे. त्यांनी सांगितले की, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकायचा आहे. एक उल्लेखनीय आहे की, भारतीय संघाने गेल्या वर्षी २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वचषक जिंकला होता. यानंतर, २०२५ च्या सुरुवातीला, टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी देखील आपल्या नावे केली आहे. आता, रोहितच्या बालपणीच्या प्रशिक्षकांनी असा दावा केला आहे की, २०२७ मध्येही रोहित शर्मा विजयी कर्णधार असणार आहे.

हेही वाचा : Rohit Sharma : ‘रोहितचे ध्येय २०२७ चे वर्ल्डकप..’, कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर बालपणीचे प्रशिक्षक Dinesh lad यांचे विधान चर्चेत.

रोहितचे प्रशिक्षक लाड यांना पुढे असे देखील विचारण्यात आले की, रोहित शर्मा या वर्षी होणाऱ्या इंग्लंड मालिकेसाठी आत्मविश्वासू आहे की नाही?  याला उत्तर देत असताना ते म्हणाले की, या निर्णयाचा इंग्लंडसोबतच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेशी काही देखील संबंध नाही. रोहित शर्मा हा पुढच्या पिढीला संधी देऊ इच्छित आहे. गेल्या वर्षीच्या टी-२० विश्वचषकानंतर त्याने तसे सांगितले होते.

बीसीसीआयकडून हिटमॅनला शुभेच्छा

बीसीसीआयकडून एक व्हिडिओ जारी केला आहे.  या व्हिडिओमध्ये रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीतील काही डाव दाखवण्यात आले आहेत. यामध्ये रोहित म्हणत आहे की, तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणे ही स्वतःच अभिमानाची अशी  गोष्ट आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी देखील इंस्टाग्रामवर पोस्ट करून रोहितचे निवृत्तीबद्दल अभिनंदन केले आहे. याशिवाय बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी राजीव शुक्ला यांनी देखील हिटमॅनला शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Will rohit sharma retire from odi cricket fans questions rain down

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 09:29 AM

Topics:  

  • bcci
  • one day cricket
  • Rohit Sharma
  • Test cricket

संबंधित बातम्या

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन
1

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित
2

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा
3

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा

IND vs WI 1st Test Day 2 Stumps: भारताचे वेस्ट इंडिजवर वर्चस्व! राहुल-जुरेल-जडेजाची शतके, टीम इंडियाकडे २८६ धावांची मोठी आघाडी
4

IND vs WI 1st Test Day 2 Stumps: भारताचे वेस्ट इंडिजवर वर्चस्व! राहुल-जुरेल-जडेजाची शतके, टीम इंडियाकडे २८६ धावांची मोठी आघाडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.