रावळपिंडी स्टेडियम(फोटो-सोशल मिडिया)
Bharat pakistan war : भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आहेत. दोन्ही देशांमधील तणाव वाढतच जात आहे. काल भारताकडून पाकिस्तानवर हवाई हल्ला करण्यात आला आहे. ज्यामध्ये भारताने पाकिस्तानच्या ९ दहशतवादी तळांवर केला आहे. त्यानंतर आता रावळपिंडी स्टेडियमभोवती देखील भारताने ड्रोन हल्ला केला आहे.
पाकिस्तानातील रावळपिंडीमध्ये ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला क्रिकेट स्टेडियमजवळ झालाया आहे. काल रात्री या स्टेडियमवर पाकिस्तान सुपर लीगचा सामना खेळवला जाणार होता, त्याआधीच तिथे हवाई हल्ला करण्यात आला आहे. रावळपिंडीतील या ड्रोन हल्ल्यानंतर सर्वत्र गोंधळ उडल्याचे दिसून आले आहे.
काल ८ मे रोजी कराची किंग्ज आणि पेशावर झल्मी यांच्यात रावळपिंडी स्टेडियमवर सामना रंगणार होता. कराची किंग्जचे नेतृत्व डेव्हिड वॉर्नरकडे असून पेशावरचे नेतृत्व बाबर आझम करत आहे. पण या सामन्यापूर्वी भारताकडून स्टेडियमवर ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात स्टेडियम उद्ध्वस्त झाले आहे. तथापि, हा सामना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आला आहे.
कराची किंग्ज आणि पेशावर झल्मीच्या संघात अनेक परदेशी खेळाडूंचा भरणा आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नर व्यतिरिक्त कराची किंग्जकडे मोहम्मद नबी, जेम्स विन्स, टिम सेफर्ट या खेळाडूंचा समावेश आहे. तर पेशावर झल्मी संघात कोहलर कॅडमोर, ल्यूक वूड, अल्झारी जोसेफ, मॅक्स ब्रायंट हे खेळाडू आहेत. आता या खेळाडूंच्या जिवाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. ही परिस्थिती पाहता, इंग्लंडच्या खेळाडूंनी त्यांच्या देशाला आणि क्रिकेट बोर्डाला लवकरात लवकर पाकिस्तानातून बाहेर काढण्याची विनंती करण्यात आली आहे.
हेही वाचा : PBKS vs DC : ब्लॅकआउट दरम्यान आयपीएल अध्यक्ष उतरले मैदानावर, प्रेक्षकांना स्टेडियम सोडण्याचे केले आवाहन
पीएसएलमधील अनेक परदेशी खेळाडू पाकिस्तान सोडू इच्छितात अशा बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. मुलतान सुल्तान्सचे डेव्हिड विली आणि ख्रिस जॉर्डन यांच्याकडून त्यांच्या फ्रँचायझीला सांगण्यात आले आहे की, त्यांना आता घरी परत जायचे आहे. मुलतान सुल्तान्स संघ आधीच प्लेऑफमधून बाहेर फेकला गेला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड आणि प्रोफेशनल क्रिकेटर्स असोसिएशन खेळाडूंच्या सतत संपर्कात आहेत. त्यांनी अद्याप खेळाडूंना पाकिस्तान सोडण्याचे निर्देश दिलेले नाहीत, परंतु यूके सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती समोर येत आहे.