Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wimbledon 2026: लिंडा नोस्कोवा ठरली चॅम्पियन! पहिल्याच ग्रँड स्लॅम विजेतेपदावर कोरले नाव

linda Noskova won women's singles Wimbledon 2026: विम्बल्डन २०२६ च्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात लिंडा नोस्कोव्हाने कॅरोलिना मुचोव्हाचा ६-२, ५-७, ६-३ असा पराभव करून आपले पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 12, 2026 | 03:04 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • लिंडा नोस्कोवा ठरली चॅम्पियन
  • मुचोव्हाचा पराभव करत जिंकले महिला एकेरीचे विजेतेपद
  • कारकिर्दीतील पहिला ग्रँड स्लॅमवर कोरले नाव
विम्बल्डन २०२६ ( Wimbledon 2026) चा महिला एकेरीचा अंतिम सामना ११ जुलै रोजी दोन चेक टेनिसपटू, लिंडा नोस्कोवा आणि कॅरोलिना मुचोव्हा यांच्यात खेळला गेला. हा सामना ऑल इंग्लंड क्लबच्या सेंटर कोर्टवर खेळवण्यात आला. या अंतिम सामन्यात, २१ वर्षीय लिंडाने कॅरोलिना मुचोव्हाचा ६-२, ५-७, ६-३ असा पराभव करून प्रतिष्ठित ‘व्हीनस रोझवॉटर डिश’ जिंकली. यासह चेक टेनिस स्टार लिंडा नोस्कोव्हाने विम्बल्डन २०२६ महिला एकेरीचे विजेतेपद पटकावून आपल्या कारकिर्दीतील पहिला ग्रँड स्लॅम मिळवला. लिंडाने सामन्याचा पहिला सेट जिंकला असला तरी, मुचोव्हाने दुसऱ्या सेटमध्ये शानदार पुनरागमन करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये लिंडाने जबरदस्त पुनरागमन करत विम्बल्डन २०२६ चे महिला एकेरीचे विजेतेपद पटाकवले.

IND W vs ENG W Test: लॉर्ड्सवर क्रांती गौडने रचला इतिहास! अशी कामगिरी करणारी जगातील पहिली महिला क्रिकेटपटू

लिंडा- मुचोव्हामध्ये विजेतेपदाची लढत

लिंडा नोस्कोव्हाचा सामना कॅरोलिना मुचोव्हा यांच्यात विम्बल्डन २०२६ महिला एकेरीचा अंतिम सामना खेळला गेला. लिंडाने सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये उत्कृष्ट खेळ करत अवघ्या ३२ मिनिटांत ६-२ अशा फरकाने पहिला सेट जिंकून सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर कॅरोलिना मुचोव्हाने दुसऱ्या सेटमध्ये नोस्कोव्हाला कडवी झुंज दिली, पुनरागमन करत दुसरा सेट ७-५ अशा फरकाने जिंकला आणि सामना १-१ असा बरोबरीत आणला. लिंडाने दुसरा सेट गमावल्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये आक्रमक खेळ करत शानदार पुनरागमन केले. त्कृष्ट सर्व्हिस आणि शक्तिशाली ग्राऊंडस्ट्रोक्सच्या जोरावर तो सेट ६-३ ने जिंकून सामना आपल्या नावावर केला. लिंडाला बक्षीस म्हणून अंदाजे ३८.५ कोटी रुपये मिळाले.

विशेष म्हणजे, लिंडा नोस्कोवा आणि कॅरोलिना मुचोव्हा यांनी यापूर्वी २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमधील महिला दुहेरी स्पर्धेत एकत्र भाग घेतला होता. तेव्हा ही जोडी चौथ्या स्थानावर राहिली होती. यावेळी, मात्र या दोघी आमनेसामने होत्या.

Linda’s moment ✨#Wimbledon pic.twitter.com/IXk0WdmAOo — Wimbledon (@Wimbledon) July 11, 2026

लिंडा नोस्कोव्हा चार वर्षांत विम्बल्डन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावणारी तिसरी चेक रिपब्लिकन महिला ठरली. यापूर्वी, मार्केटा वोंद्रोसोव्हा हिने २०२३ मध्ये आणि बार्बोरा क्रेजकोव्हा हिने २०२४ मध्ये हे प्रतिष्ठित विजेतेपद पटकावले होते. या विजयाने चेक महिला टेनिसचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

जॅनिक सिनर विरुद्ध अलेक्झांडर झ्वेरेव्ह

आता सर्वांच्या नजरा विम्बल्डन २०२६ च्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यावर आहेत , ज्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला खेळाडू जॅनिक सिनरचा सामना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या खेळाडू अलेक्झांडर झ्वेरेव्हशी होईल. हा विजेतेपदाचा सामना १२ जुलै रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ८:३० वाजता सुरू होईल.

IND vs ENG: भारताला दुहेरी धक्का! इंग्लंडने टीम इंडियाचा ४-० ने उडवला धुव्वा; हिसकावले टी-२०चे अव्वल स्थान

Web Title: Wimbledon 2026 linda noskova wins womens singles title beats karolina muchova

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • International Tennis Tournament
  • Tennis
  • Wimbledon

संबंधित बातम्या

वाशिम जिल्हा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात; ‘जे. डी.’ त रंगल्या चुरशीच्या लढती
1

वाशिम जिल्हा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात; ‘जे. डी.’ त रंगल्या चुरशीच्या लढती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.