Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाषेची सक्ती इंग्रजीतून बोलल्यामुळे डोंबिवलीत महिलेला मारहाण, मराठी-उत्तर भारतीय वाद

डोंबिवली, जुनी डोंबिवली पश्चिममध्ये इंग्रजी शब्दावरून मराठी-उत्तर भारतीय वादाला चिघळण्याची घटना समोर आली आहे. 'Excuse me' असं बोलल्याने महिला आणि तिच्या कुटुंबियांना भर रस्त्यात मारहाण झाली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 09, 2025 | 10:21 AM
beaten (फोटो सौजन्य- social media)

beaten (फोटो सौजन्य- social media)

Follow Us
Close
Follow Us:

डोंबिवली, जुनी डोंबिवली पश्चिममध्ये इंग्रजी शब्दावरून मराठी-उत्तर भारतीय वादाला चिघळण्याची घटना समोर आली आहे. ‘Excuse me’ असं बोलल्याने महिला आणि तिच्या कुटुंबियांना भर रस्त्यात मारहाण झाली. विष्णूनगर पोलिसांनी या प्रकरणी तक्रारी नोंदवत तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे.

Ajit Pawar News: अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंना अक्षरश: झापलचं; देवगिरी बंगल्यावर नेमकं काय घडलं?

७ एप्रिल २०२५ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास गणेश श्रद्धा बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या पुनम अंकीत गुप्ता या महिला त्यांच्या दोन मैत्रिणींसोबत घराकडे परतत होत्या. त्याच दरम्यान, बिल्डिंगच्या बाहेर रस्त्यावर काही लोक उभे होते. त्या लोकांना वाट करून देण्यासाठी पुनम यांनी Excuse me असे इंग्रजीत म्हटले. मात्र या साध्या वाक्यावरून तिथे उभे असलेल्या अनिल पवार, त्यांची पत्नी आणि बाबासाहेब गोविंद ढबाले यांचा संताप अनावर झाला.

मदतीला आलेल्या दोघांनाही मारहाण
या तिघांनी “इंग्रजी नको, मराठीत बोला” असे म्हणत पुनम आणि त्यांच्या मैत्रिणीला चापट्या आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, गोंधळ ऐकून मदतीला आलेले पुनम यांचे पती आणि दुसरी मैत्रीण यांनाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत पुनम यांच्या नाकातील फुलीसुद्धा तुटली असून, त्यांचे शारीरिक आणि मानसिक नुकसान झाले आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
या प्रकाराचा व्हिडिओ घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतरांनी काढून सोशल मीडियावर पोस्ट केला असून, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या घटनेनंतर दोन्ही गटांनी विष्णूनगर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ११५(२), ३५२ आणि ३२४ (४) अंतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Web Title: Woman beaten up in dombivli for speaking in forced english marathi north indian dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 10:21 AM

Topics:  

  • Dombivali Crime
  • Marathi language Compulsory
  • Mumbai

संबंधित बातम्या

डोंबिवलीत फिनिक्स इन्व्हेस्टमेंटचा महाघोटाळा; १०० हून अधिक गुंतवणूकदारांची ४-५ कोटींची फसवणूक, चार आरोपी अटकेत
1

डोंबिवलीत फिनिक्स इन्व्हेस्टमेंटचा महाघोटाळा; १०० हून अधिक गुंतवणूकदारांची ४-५ कोटींची फसवणूक, चार आरोपी अटकेत

लुसिरा ज्वेलरीचे मुंबईत पहिले स्टोअर सुरू! केवळ विक्री केंद्र नव्हे तर सामुदायिक अनुभव केंद्र
2

लुसिरा ज्वेलरीचे मुंबईत पहिले स्टोअर सुरू! केवळ विक्री केंद्र नव्हे तर सामुदायिक अनुभव केंद्र

Devendra Fadnavis: रामलीला कार्यक्रमांना मुसळधार पावसाचा फटका; मंडळांची फडणवीसांकडे धाव, केल्या ‘या’ मागण्या
3

Devendra Fadnavis: रामलीला कार्यक्रमांना मुसळधार पावसाचा फटका; मंडळांची फडणवीसांकडे धाव, केल्या ‘या’ मागण्या

अभिनेत्री अलंकृता सहायचे मुंबईत पुनरागमन; अनेक दमदार प्रोजेक्ट्ससह करणार नव्या अध्यायाची सुरूवात
4

अभिनेत्री अलंकृता सहायचे मुंबईत पुनरागमन; अनेक दमदार प्रोजेक्ट्ससह करणार नव्या अध्यायाची सुरूवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.