Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१७ वर्षांत पहिल्यांदाच घडलं! Virat Kohli ला लग्नाची मागणी करणाऱ्या ‘त्या’ महिला क्रिकेटरने लॉर्ड्सवर रचला इतिहास

Danni Wyatt-Hodge Scored 300 runs In Women's T 20 world Cup 2026: इंग्लंडची फलंदाज डॅनी वायट-हॉजने महिला टी-२० विश्वचषक २०२६ च्या स्पर्धेत इतिहास रचला आहे. ती या स्पर्धेच्या एकाच हंगामात ३०० धावा करणारी पहिली खेळाडू ठरली आहे. तिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात ही कामगिरी केली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 06, 2026 | 06:39 PM
१७ वर्षांत पहिल्यांदाच घडलं! Virat Kohli ला लग्नाची मागणी करणाऱ्या ‘त्या’ महिला क्रिकेटरने लॉर्ड्सवर रचला इतिहास
Follow Us
Follow Us:
  • डॅनी वायट-हॉजचा ऐतिहासिक कारनामा
  • एकाच हंगामात ३०० धावा करणारी पहिली खेळाडू
  • १७ वर्षांत पहिल्यांदाच घडलं
महिला टी २० विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा बाजी मारली. अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव करुन सलग सातव्यांदा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले. परंतु, ऑस्ट्रेलियाच्या विजेतेपदासोबतच सर्वात जास्त चर्चा रंगली ती म्हणजे इंग्लंडची फलंदाज डॅनी वायट-हॉजची. जवळपास १२ वर्षांपूर्वी सोशल मीडियावर विराट कोहलीला ‘कोहली, माझ्याशी लग्न कर’ असे लिहून जगभरात चर्चेत आलेल्या इंग्लंडची स्टार फलंदाज डॅनी वायट-हॉजने महिला टी-२० विश्वचषकात नवा इतिहास रचला आहे. ती टी-२० विश्वचषकाच्या एकाच हंगामात ३०० धावा करणारी डॅनी पहिली खेळाडू ठरली आहे. लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात, आपल्या खेळीत ८ धावा पूर्ण करताच डॅनीने हा ऐतिहासिक विक्रम केला.

W, W, W, W! दासुन शनाकाचा ‘डबल हॅट-ट्रिक’ धमाका; ४ बॉलमध्ये ४ विकेट्स घेऊन फिरवला गमावलेला सामना

डॅनी वायट-हॉजचा ऐतिहासिक कारनामा

डॅनी वायट-हॉजने २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषकात ७ सामन्यांमध्ये ६०.४० च्या सरासरीने ३०२ धावा पूर्ण केल्या आहेत. यादरम्यान तिने ४२ चौकार आणि दोन षटकार मारले. तिच्या बॅटने श्रीलंकेविरुद्ध १०५ धावांची नाबाद शानदार खेळी साकारली. यानंतर तिने आयर्लंडविरुद्ध १६ धावा, स्कॉटलंडविरुद्ध ७ धावा, वेस्ट इंडिजविरुद्ध ६५ धावा, न्यूझीलंडविरुद्ध ८९ धावा आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उपांत्य सामन्यात १२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामन्यात ८ धावा करून तिने ३०० धावांचा ऐतिहासिक टप्पा गाठला.

ऑस्टेलिया पुन्हा एकदा चॅम्पियन

लॉर्ड्सवर खेळलेल्या अंतिम सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. ७ धावांवर एमी जोन्सची पहिली विकेट पडली. यानंतर कर्णधार नॅट सिव्हर-ब्रंट आणि डॅनी वायट-हॉज यांनी दुसऱ्या विकेटसाठी २५ धावा जोडल्या. डॅनी ८ धावा करून बाद झाली. अॅलिस कॅप्सीने २३ धावांचे योगदान दिले, तर कर्णधार नॅट सायव्हर-ब्रंटने ५३ चेंडूंमध्ये नाबाद ५८ धावा केल्या. तिच्यासोबत फ्रेया कॅम्पने २८ चेंडूंमध्ये नाबाद ४४ धावांची खेळी केली. या दोघींमध्ये पाचव्या विकेटसाठी ८० धावांची अभेद्य भागीदारी झाली, ज्यामुळे इंग्लंडने चार विकेट गमावून १५० धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. ऑस्ट्रेलियाकडून किम गार्थ, लुसी हॅमिल्टन, सोफी मॉलिन्यूक्स आणि अॅनाबेल सदरलँड यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला. ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य १७. १ षटकांत सहजद पूर्ण केले आणि पुन्हा एकदा जागतिक स्तरावर आपले वर्चस्व सिद्ध केले.

कोहलीला केली लग्नाची मागणी

२०१४ मध्ये डॅनी वायट-हॉज जगभरात चर्चेत आली होती, जेव्हा तिने विराट कोहलीसाठी सोशल मीडियावर ‘माझ्याशी लग्न कर’ ( Kohli Marry Me) असे लिहून एक मजेशीर पोस्ट केली होती. नंतर, जेव्हा दोन्ही खेळाडू भेटले, तेव्हा विराट कोहली तिला हसत म्हणाला, ‘ट्विटरवर अशा गोष्टी बोलू नकोस, लोक त्या गांभीर्याने घेतात.’ त्याच भेटीत कोहलीने डॅनीला आपली एक क्रिकेट बॅट भेट म्हणूनही दिली होती. आता, अनेक वर्षांनंतर, डॅनीने तिच्या बॅटने असा विक्रम केला आहे, जो महिला टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाहायला मिळाला.

IND vs ENG : स्पिनचा डाव भारी पडला! आता पेसर्सचा पलटवार; टीम इंडियात मोठे बदल होणार? कशी असेल संभाव्य प्लेइंग ११?

Web Title: Womens t20 world cup 2026 danni wyatt 300 runs record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 06:39 PM

Topics:  

  • Eng vs aus
  • ICC T20 World Cup 2026
  • ICC Women's T20 World Cup
  • ICC Womens World Cup

संबंधित बातम्या

Women’s T20 World Cup 2026: डॅनी वायट-हॉजने गोलंदाजांना धुतले, श्री चरणीच्या फिरकीने फलंदाज उद्ध्वस्त; स्पर्धेत दोघींचाच जलवा
1

Women’s T20 World Cup 2026: डॅनी वायट-हॉजने गोलंदाजांना धुतले, श्री चरणीच्या फिरकीने फलंदाज उद्ध्वस्त; स्पर्धेत दोघींचाच जलवा

Ellyse Perry 9 ICC Trophies: एलिस पेरीचा धमाका! 9 वेळा ICC ट्रॉफीवर नाव कोरून रचला इतिहास
2

Ellyse Perry 9 ICC Trophies: एलिस पेरीचा धमाका! 9 वेळा ICC ट्रॉफीवर नाव कोरून रचला इतिहास

ENG W vs AUS W: कांगारूंचा पुन्हा एकदा महाधमाका! ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ७ विकेट्सने चिरडले; सातव्यांदा पटकावले विश्वविजेतेपद
3

ENG W vs AUS W: कांगारूंचा पुन्हा एकदा महाधमाका! ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ७ विकेट्सने चिरडले; सातव्यांदा पटकावले विश्वविजेतेपद

ENG W vs AUS W Final: वर्ल्ड कप फायनलमध्ये चालली इंग्लिश कर्णधाराची बॅट, इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर ठेवले १५१ धावांचे आव्हान
4

ENG W vs AUS W Final: वर्ल्ड कप फायनलमध्ये चालली इंग्लिश कर्णधाराची बॅट, इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर ठेवले १५१ धावांचे आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.