Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zimbabwe vs Namibia T20I: रेकॉर्डवर रेकॉर्ड! एकच विश्वविक्रम दोनदा मोडला, सातव्या जोडीचा तुफान कहर

Zimbabwe vs Namibia T20I: झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात एकाच विक्रमाची दोनदा मोडतोड झाली. झिम्बाब्वेचे ६ फलंदाज १०१ धावांवर बाद झाल्यानंतर रायन बर्ल आणि ब्रॅड इव्हान्स यांनी सातव्या विकेटसाठी अवघ्या ४८ चेंडूत ९४ धावांची नाबाद भागीदारी केली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 01, 2026 | 06:15 PM
Zimbabwe vs Namibia T20I: रेकॉर्डवर रेकॉर्ड! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Zimbabwe vs Namibia T20I: रेकॉर्डवर रेकॉर्ड! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • बर्ल-इव्हान्सने सातव्या विकेटसाठी ९४ धावा केल्या
  • ऑस्ट्रेलियाचा ९२ धावांचा जुना विक्रम मोडला
  • एकाच सामन्यात विक्रमाची पुन्हा मोडतोड झाल्याने थरार वाढला
Zimbabwe vs Namibia T20I:  क्रिकेटमध्ये रोज काही ना काही रेकॉर्ड बनतात आणि मोडतात. पण काल झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्यात जो सामना झाला त्यात असं काही घडलं की सगळेच थक्क झाले. एकाच मॅचमध्ये एकाच रेकॉर्ड दोन वेळा मोडला गेला. असं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार क्वचित घडतं. नामिबिया, झिम्बाब्वे आणि साऊथ आफ्रिका या तीन देशांमध्ये सध्या टी-२० सिरीज सुरू आहे. या सिरीजचा तिसरा सामना ३१ ऑगस्टला झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्यात झाला. हा सामना खूपच थरारक झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. Zimbabwe vs Namibia T20I:

सामन्यात नेमकं काय झालं?

नामिबियाने टॉस जिंकून पहिले बॉलिंग घ्यायचा निर्णय घेतला. झिम्बाब्वे फलंदाजीला आली. सुरुवात चांगली झाली नव्हती. झिम्बाब्वेचे ६ गडी फक्त १०१ धावांवर बाद झाले होते. सगळ्यांना वाटलं आता झिम्बाब्वे १३०-१४० वरच थांबेल.

पण तिथून खरी गंमत सुरू झाली. सातव्या विकेटसाठी रयान बर्ल आणि ब्रॅड इव्हान्स हे दोघे मैदानात आले. दोघांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. नामिबियाच्या बॉलर्सना कुठे बॉल टाकावा हेच कळेना. दोघांनी मिळून फक्त ४८ चेंडूत ९४ धावा कुटल्या आणि नाबाद राहिले. त्यामुळे झिम्बाब्वेने २० ओव्हरमध्ये ६ विकेट गमावून १९५ धावा केल्या. नामिबियाला जिंकायला १९६ धावा हव्या होत्या.

या ९४ धावांच्या भागीदारीने एक जुना वर्ल्ड रेकॉर्ड तुटला. २०२१ साली ऑस्ट्रेलियाच्या डॅनियल सॅम्स आणि मार्कस स्टॉइनिस यांनी न्यूझीलंडविरुद्ध सातव्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी केली होती. तोच रेकॉर्ड होता टी-२० इंटरनॅशनल मधला सातव्या विकेटसाठीचा सर्वात मोठा रेकॉर्ड. तो काल बर्ल आणि इव्हान्सने मोडला. सगळ्यांना वाटलं आता हा नवीन रेकॉर्ड झिम्बाब्वेच्या नावावर राहील. पण खरी फिल्म तर बाकी होती.

Chess: पुण्यात रंगला बुद्धिबळाचा महासंग्राम! खुल्या गटात कोण जिंकले? विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव

त्याच दिवशी पुन्हा रेकॉर्ड तुटला!

१९६ धावांचा पाठलाग करताना नामिबियाची पण सुरुवात खराब झाली. त्यांचे पण ६ गडी फक्त ७६ धावांवर बाद झाले. सामना झिम्बाब्वेच्या हातात गेला असं वाटत होतं.पण नामिबियाकडून सातव्या विकेटसाठी झेन ग्रीन आणि रुबेन ट्रम्पलमन नव्हे तर ब्युरेन व्होल्शेंक हे दोघे आले. आणि त्यांनी जे केलं ते अविश्वसनीय होतं.या दोघांनी झिम्बाब्वेच्या बॉलर्सची चांगलीच धुलाई केली. त्यांनी सातव्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी केली. म्हणजे झिम्बाब्वेने काही तासांपूर्वी केलेला ९४ धावांचा रेकॉर्ड त्याच सामन्यात मोडला गेला.

नामिबियाच्या नावावर

आता टी-२० क्रिकेटमध्ये सातव्या विकेटसाठीची सर्वात मोठी भागीदारी ११० धावांची झाली आहे आणि ती नामिबियाच्या नावावर आहे.या भागीदारीमुळे नामिबिया जिंकण्याच्या अगदी जवळ आली होती. शेवटच्या १० धावा हव्या असताना ही जोडी फुटली आणि सगळा खेळ बदलला. नामिबियाचा पूर्ण संघ १९० धावांवर ऑल आऊट झाला आणि झिम्बाब्वेने हा सामना फक्त ५ धावांनी जिंकला.

Duleep Trophy: अबब किती ते विचित्र! Mukesh Kumar ने एकाच सामन्यात टाकले तब्बल 14 नो बॉल; मात्र 7 विकेट्स…

सामना झिम्बाब्वे जिंकली असली तरी चर्चा फक्त या दोन भागीदारींचीच आहे. एकाच टी-२० सामन्यात दोन्ही संघाच्या सातव्या विकेटसाठी ९० पेक्षा जास्त धावा आणि एकाच दिवशी दोन वेळा वर्ल्ड रेकॉर्ड तुटणं, हे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं आहे.

Web Title: World record broken twice in one match by seventh wicket partnerships

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • 2026 T20 Cricket World Cup
  • cricket news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? पूजेत त्याचं महत्त्व जाणून घ्या, कारण फार कमी जणांना माहित!
1

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? पूजेत त्याचं महत्त्व जाणून घ्या, कारण फार कमी जणांना माहित!

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय
2

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय

Jalgaon Earthquake Today: जळगाव हादरलं! जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का, नागरिकांमध्ये खळबळ
3

Jalgaon Earthquake Today: जळगाव हादरलं! जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का, नागरिकांमध्ये खळबळ

Duleep Trophy: अबब किती ते विचित्र! Mukesh Kumar ने एकाच सामन्यात टाकले तब्बल 14 नो बॉल; मात्र 7 विकेट्स…
4

Duleep Trophy: अबब किती ते विचित्र! Mukesh Kumar ने एकाच सामन्यात टाकले तब्बल 14 नो बॉल; मात्र 7 विकेट्स…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.