Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Tennis League : स्वितोलिना, बेन्शिच, किर्गिओसचा बंगळुरूत जलवा! वर्ल्ड टेनिस लीगसाठी स्टार खेळाडूंची मांदियाळी

World Tennis League : वर्ल्ड टेनिस लीगच्या पाचव्या पर्वात एलिना स्वितोलिना, बेलिंडा बेन्शिच, निक किर्गिओससह 16 खेळाडू सहभागी होणार. 17 ते 20 डिसेंबरदरम्यान बंगळुरूमध्ये रंगणार टेनिसचा थरार.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 18, 2026 | 02:02 PM
World Tennis League : स्वितोलिना, बेन्शिच, किर्गिओसचा बंगळुरूत जलवा! वर्ल्ड टेनिस लीगसाठी स्टार खेळाडूंची मांदियाळी

World Tennis League : स्वितोलिना, बेन्शिच, किर्गिओसचा बंगळुरूत जलवा! वर्ल्ड टेनिस लीगसाठी स्टार खेळाडूंची मांदियाळी

Follow Us
Follow Us:
  • ऑस्ट्रेलियाचा निक किर्गिओस प्रमुख आकर्षण
  • भारताचे दमदार खेळाडूही लीग रंगवणार
  • नामवंत खेळाडूंमुळे स्पर्धेचा दर्जा उंचावणार
 

World Tennis League : वर्ल्ड टेनिस लीगच्या पाचव्या पर्वासाठी टेनिस विश्वातील दिग्गज खेळाडूंची मांदियाळी सज्ज झाली आहे. माजी जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू कारोलिना प्लिश्कोव्हा, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती बेलिंडा बेन्शिच, एलिना स्वितोलिना, निक किर्गिओस आणि विम्बल्डन दुहेरी विजेता हॅरी हेलिओव्हारा यांच्यासह एकूण 16 आंतरराष्ट्रीय आणि भारतीय टेनिसपटू स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
17 ते 20 डिसेंबर 2026 या कालावधीत बंगळुरू येथील केएसएलटीएच्या एस. एम. कृष्णा टेनिस स्टेडियमवर ही स्पर्धा रंगणार आहे.

आयकॉनिक स्पोर्ट्स अँड इव्हेंट्सद्वारे परवानाधारक आणि व्यवस्थापित करण्यात येणाऱ्या या लीगमध्ये AKRIXX Eagles, Game Changers Falcons, Aussie Mavericks Kites आणि VB Realty Hawks असे चार संघ विजेतेपदासाठी आमनेसामने येतील. प्रत्येक संघात आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह भारतातील आघाडीच्या टेनिसपटूंचा समावेश असेल.

महिला खेळाडूंमध्ये युक्रेनची एलिना स्वितोलिना हे प्रमुख आकर्षण असेल. तिच्या नावावर 20 डब्ल्यूटीए एकेरी विजेतेपदे असून, 2018 मध्ये तिने डब्ल्यूटीए फायनल्सचे विजेतेपद पटकावले होते. स्वित्झर्लंडची बेलिंडा बेन्शिच हिने टोकियो 2020 ऑलिम्पिकमध्ये एकेरीचे सुवर्णपदक जिंकले आहे. चेकियाची कारोलिना प्लिश्कोव्हा आणि स्पेनची पॉला बाडोसा यांचाही स्पर्धेत सहभाग असेल.

ऑस्ट्रेलियाचा निक किर्गिओस प्रमुख आकर्षण

पुरुषांच्या गटात ऑस्ट्रेलियाचा निक किर्गिओस आपल्या आक्रमक खेळशैलीने चाहत्यांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे. 2022 मध्ये त्याने विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली होती. कझाकस्तानचा अलेक्झांडर ब्युब्लिक, बेल्जियमचा झिझू बर्ग्स आणि फिनलंडचा हॅरी हेलिओव्हारा हे अन्य आंतरराष्ट्रीय खेळाडू असतील. हेलिओव्हारा याने 2024 आणि 2026 मध्ये विम्बल्डन पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे.

Ben Duckett: बदला! काही तासांपूर्वीच IPL मधून काढलं, पठ्ठ्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकले शतक

भारताचे दमदार खेळाडूही लीग रंगवणार

भारतीय खेळाडूंमध्ये सुमित नागल, युकी भांबरी, धाक्शिनेश्वर सुरेश आणि रामकुमार रामनाथन यांचा पुरुष गटात समावेश आहे. तर महिला गटात माया राजेश्वरन रेवती, श्रीवल्ली रश्मिका भामिदिपती, ऋतुजा भोसले आणि वैष्णवी आडकर या खेळाडू सहभागी होणार आहेत. ऋतुजा आणि वैष्णवी यांचे हे वर्ल्ड टेनिस लीगमधील पदार्पण असेल.

भारताच्या युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गजांसोबत खेळण्याची संधी या स्पर्धेमुळे मिळणार आहे. अनुभवी खेळाडू आणि नवोदित प्रतिभावंत यांच्या सहभागामुळे चार दिवसांच्या या स्पर्धेत चुरशीचे सामने पाहायला मिळतील.

IPL Auction: कोणत्या टीमजवळ किती पैसे वाचले? कोणत्या टीमला खरेदी करावे लागणार जास्त खेळाडू? Team चे गणित

नामवंत खेळाडूंमुळे स्पर्धेचा दर्जा उंचावणार

वर्ल्ड टेनिस लीगचे सह-संस्थापक महेश भूपती यांनी यंदाच्या खेळाडूंच्या यादीबद्दल उत्साह व्यक्त केला. ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेरीत खेळलेले खेळाडू, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती आणि जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडूंचा सहभाग यामुळे स्पर्धेचा दर्जा उंचावणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय खेळाडूंनाही आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

लीगच्या सह-संस्थापक हेमाली शर्मा यांनीही बंगळुरूमध्ये जागतिक दर्जाच्या टेनिस स्पर्धेचे आयोजन होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्याचा अनुभव मिळावा आणि देशात टेनिसचा प्रसार व्हावा, हा लीगचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: वर्ल्ड टेनिस लीगचे पाचवे पर्व कधी होणार आहे?

    Ans: वर्ल्ड टेनिस लीगचे पाचवे पर्व 17 ते 20 डिसेंबर 2026 या कालावधीत होणार आहे.

  • Que: वर्ल्ड टेनिस लीगचे सामने कुठे खेळवले जाणार आहेत?

    Ans: बंगळुरू येथील केएसएलटीएच्या एस. एम. कृष्णा टेनिस स्टेडियमवर सामने खेळवले जाणार आहेत.

  • Que: वर्ल्ड टेनिस लीगमध्ये कोणते आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडू सहभागी होणार आहेत?

    Ans: एलिना स्वितोलिना, बेलिंडा बेन्शिच, कारोलिना प्लिश्कोव्हा, निक किर्गिओस, अलेक्झांडर ब्युब्लिक आणि हॅरी हेलिओव्हारा यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होतील.

Web Title: World tennis league 2026 star players bengaluru rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • Olympic
  • sumit nagal
  • Tennis Premier League

संबंधित बातम्या

Carrom Tournament : 40 वर्षांनंतर विलिंग्डन जिमखान्यात राज्यस्तरीय कॅरमचा थरार; 342 खेळाडूंचा सहभाग
1

Carrom Tournament : 40 वर्षांनंतर विलिंग्डन जिमखान्यात राज्यस्तरीय कॅरमचा थरार; 342 खेळाडूंचा सहभाग

World Tennis League : बेंगळुरूमध्ये रंगणार जागतिक टेनिसचा थरार; 17 डिसेंबरपासून वर्ल्ड टेनिस लीग
2

World Tennis League : बेंगळुरूमध्ये रंगणार जागतिक टेनिसचा थरार; 17 डिसेंबरपासून वर्ल्ड टेनिस लीग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.