बेन डकेटचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक (फोटो सौजन्य - IANS)
बेन डकेट इतक्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे की, गेल्या पाच एकदिवसीय डावांमधील हे त्याचे तिसरे शतक होते. यापूर्वी, पाकिस्तानमध्ये झालेल्या त्रिकोणीय एकदिवसीय मालिकेत त्याने यजमान पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याविरुद्ध अनुक्रमे १०५ आणि १६७ धावा केल्या होत्या.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ३२८ धावा केल्या. बेन डकेटच्या १३३ धावा, टॉम बेंटन (४४) आणि विल जॅक्स यांनी प्रत्येकी ५९ धावा करून अर्धशतके झळकावली. ऑस्ट्रेलियाच्या अर्धवेळ गोलंदाजांनी सर्वाधिक बळी घेतले. मॅट रेनशॉने सर्वाधिक तीन बळी घेतले, तर जॅक एडवर्ड्सने दोन, तर कूपर कॉनोली आणि ट्रॅव्हिस हेड यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
पुढील महिन्यात गोव्यात होणाऱ्या २०२७ इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या मिनी-लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने १६ खेळाडूंना कायम ठेवले असून नऊ खेळाडूंना संघातून मुक्त केले आहे. संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा समावेश आहे, ज्याने कामाचा ताण असल्याचे कारण देत फ्रँचायझी आणि बीसीसीआयला कळवले होते की तो स्पर्धेसाठी उपलब्ध होणार नाही. मुक्त केलेले खेळाडू: नितीश राणा, अभिषेक पोरेल, पथुम निस्संका, बेन डकेट, करुण नायर, साहिल पारख, दुशमंथा चमीरा, रेहान अहमद, मिचेल स्टार्क आणि अजय मंडल.
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या इंग्लिश संघाने पर्थमध्ये पहिला एकदिवसीय सामना गमावला होता, परंतु अॅडलेडमध्ये १३५ धावांनी सामना जिंकून उल्लेखनीय पुनरागमन केले. आता तिसरा एकदिवसीय सामना निर्णायक ठरणार असून, त्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी मेलबर्नमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू होईल.
Ans: बेन डकेटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात १३३ धावा केल्या
Ans: Delhi Capitals संघात बेन डकेट खेळत होता
Ans: बेन डकेट इंग्लंड संघातून खेळतो






