फोटो सौजन्य - Delhi Capitals सोशल मीडिया
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने कालच्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता, आज त्यांचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. सुरुवातीला आरसीबीच्या संघाने दमदार खेळ दाखवला होता. त्यानंतर संघाला सलग तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ विजयाच्या शोधात आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हा सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आज आरसीबीच्या होम ग्राउंडवर आजचा सामना रंगणार आहे त्यामुळे आरसीबी चाहते आज सामना पाहण्यासाठी गर्दी करतील.
आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आमनेसामने असणार आहे. आज संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही JioHotstar वर पाहू शकता. तर टेलिव्हिजनवर पाहणारे प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स १८ वर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला गेल्या सलग ३ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या, स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. तथापि, जर आजच्या सामन्यामध्ये आरसीबी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध हरला तर पुढचा मार्ग कठीण होणार आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हेड टू हेड रेकॉर्ड कसा राहिला आहे? दोघांपैकी कोणता संघ वरचढ आहे?
दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर आतापर्यत दोन्ही संघ ५ वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला ३ वेळा पराभूत केले आहे तर आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सला २ वेळा हरवले आहे. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे पारडे जड दिसत आहे. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की दोन्ही संघांमध्ये कठीण स्पर्धा झाली आहे, परंतु दिल्ली कॅपिटल्स हेड टू हेड रेकॉर्डमध्ये पुढे आहे.
गुणतालिकेबद्दल बोलायचं झालं तर ८ गुणांसह दिल्ली कॅपिटल्सचा संघ अव्वल स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सचे ६ गुण आहे, कालच्या दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवानंतर संघ दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघ तिसऱ्या स्थानावर आहे आरसीबीचे पॉईंट टेबलमध्ये ४ गुण आहेत. युपी वॉरियर्स सुद्धा ४ गुंणासह चौथ्या स्थानावर आहे पण आरसीबीचा रन रेट चांगला असल्यामुळे त्यांना वरचे स्थान मिळाले आहे. गुजरात जायंट्सचा संघ ४ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.