फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ : मागील तीन दिवसांपूर्वी आयसीसी स्पर्धेची मजा पूर्णपणे नष्ट झाली आहे. याचे कारण म्हणजेच यजमान देश पाकिस्तानमध्ये मागील तीन दिवसांपासून पडणारा मुसळधार पाऊस. पाकिस्तान २९ वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेचे आयोजन करत आहे. यानंतरही पीसीबीच्या तयारीची खिल्ली उडवली जात आहे. पीसीबीच्या खराब तयारीमुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये आतापर्यंत ३ सामने गमावले गेले आहेत. काल अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना सुरु झाला आणि या सामन्यादरम्यान मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे सामना रद्द करण्यात आला होता.
याआधी पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश, ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका आणि अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया हे तीन सामने रद्द करण्यात आले होते. ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान पावसामुळे लाहोर स्टेडियम कोरडे करण्यासाठी घाणेरडे मॉप क्लिनर वापरल्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या स्पर्धेतील सर्वात रोमांचक सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात होता. ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत असताना १३ व्या षटकात पाऊस सुरू झाल्याने सामना रद्द करण्यात आला.
ऐ afg vs aus मैच के दौरान का वीडियो है 😁🤓😁🤓pic.twitter.com/ClhlYzACeH
— Faruk (@uf2151593) March 1, 2025
काही वेळाने पाऊस थांबला पण नंतर स्टेडियम कर्मचारी मैदान कोरडे करू शकले नाहीत आणि शेवटी सामना रद्द करण्यात आला. ग्राउंड स्टाफ घाणेरड्या पुसण्याने मैदान स्वच्छ करत होते. हा सामना रद्द झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला तर अफगाणिस्तान संघ आता स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. या सामन्यापूर्वी, रावळपिंडीमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामनाही पावसामुळे वाया गेला. यजमान पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला.
Play could not start at Pakistan’s Gaddafi Stadium after just 30 minutes of rain. #AFGvsAUS
Efforts were being made to dry the field with sponges at Pakistan’s Gaddafi Stadium, but the Afghanistan vs Australia match was cancelled due to rain as the field did not dry.
Australia… pic.twitter.com/9ckthUtpOd
— CricVipez (@CricVipezAP) February 28, 2025
आज इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सामना होणार आहे. तर सेमीफायनलचा एक सामना दुबईमध्ये खेळवला जाईल आणि दुसरा सामना पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आला आहे. भारताचा संघाने जर अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला तर सामना दुबई मैदानावर खेळवला जाणार आहे आणि जर टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पराभूत झाली तर सामना पाकिस्तानमध्ये होणार आहे.