
फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru सोशल मिडिया
WPL 2026 : महिला प्रीमियर लीग २०२६ चा सामना १७ जानेवारी रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या गोलंदाजांनी कहर केला होता. सुरूवातीच्या पहिल्या दोन ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने चार विकेट गमावले होते त्यानंतर संघाने शेफाली वर्माच्या जोरावर चांगली धावसंख्या उभारली होती. RCB ने शानदार कामगिरी केली आणि सामना ८ विकेट्सने जिंकला.
दिल्लीकडून शफाली वर्माने शानदार अर्धशतक झळकावले, तर RCB कडून स्मृती मानधनाने कहर केला आणि तिचे शतक 4 धावांनी हुकले. RCB ने हंगामातील त्यांचा सलग चौथा विजय मिळवला आणि यामुळे क्रमवारीतही बदल झाला.
प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने २० षटकांत १० गडी गमावून १६६ धावा केल्या. सलामीवीर शफाली वर्माने ४१ चेंडूत ६२ धावा केल्या, तर लुसी हॅमिल्टनने १९ चेंडूत ३६ धावा केल्या. याशिवाय दिल्लीच्या इतर कोणत्याही फलंदाजाने लक्षणीय कामगिरी केली नाही. आरसीबीकडून लॉरेन बेलने तीन आणि सायली सातघरेने तीन विकेट घेतल्या.
Making winning a habit 🥳@RCBTweets marching bold as they make it 4⃣ in 4⃣ ❤️ A convincing 8⃣-wicket victory to wrap up the Navi Mumbai leg 🙌 Scorecard ▶️ https://t.co/NnuH8NbLG5 #TATAWPL | #KhelEmotionKa | #DCvRCB pic.twitter.com/cDbPBCVqo6 — Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 17, 2026
लक्ष्याचा पाठलाग करताना, आरसीबीने फक्त दोन विकेट गमावत १६९ धावा केल्या. सलामीवीर ग्रेस हॅरिसने १ आणि स्मृती मानधनाने ६१ चेंडूत ९६ धावा केल्या. जॉर्जिया वॉलनेही ४२ चेंडूत ५४ धावा केल्या. अशा प्रकारे आरसीबीने आठ विकेट राखून विजय मिळवला. हा हंगामातील त्यांचा चौथा विजय होता, ज्यामुळे ते पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर राहिले.
आरसीबी ४ विजय आणि ८ गुणांसह गुणतालिकेत आघाडीवर आहे. मुंबई इंडियन्स ४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, त्यानंतर गुजरात जायंट्स ४ गुणांसह दुसऱ्या आणि यूपी वॉरियर्स ४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स २ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
After a competitive 1⃣st leg, @RCBTweets remain unbeaten with 8⃣ points 🥳 Where does your favourite team stack up? 🤔#TATAWPL | #KhelEmotionKa pic.twitter.com/k8QoujeLuC — Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 17, 2026