Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WPL 2026 RCB vs GG : गुजरात बंगळुरूची विजयी मालिका थांबवण्यासाठी उत्सुक, जाणून घ्या Playing 11, खेळपट्टी आणि हवामान अपडेट्स

आतापर्यंत आरसीबी हा एकमेव अपराजित संघ आहे, ज्याने दोनपैकी दोन सामने जिंकले आहेत. स्मृती मानधनाचा संघ आता अ‍ॅशले गार्डनरच्या गुजरात जायंट्सशी सामना करेल.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 16, 2026 | 02:37 PM
फोटो सौजन्य - Gujarat Giants/Royal Challengers Bengaluru

फोटो सौजन्य - Gujarat Giants/Royal Challengers Bengaluru

Follow Us
Close
Follow Us:

WPL 2026 RCB vs GG Match Preview : स्मृती मानधनाची RCB पुढील चार दिवसांत (१६-१९ जानेवारी) तीन सामने खेळणार आहे. या वेळापत्रकात प्रवासाचा दिवस (१८ जानेवारी) समाविष्ट आहे, जिथे ते नवी मुंबई ते वडोदरा असा प्रवास करतील. हे व्यस्त वेळापत्रक शुक्रवारी सुरू होईल, जेव्हा बंगळुरू संघ नवी मुंबईतील DY पाटील स्टेडियमवर गुजरात जायंट्सशी सामना करेल. विशेष म्हणजे, महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात पहिल्यांदाच या ठिकाणी हे दोन्ही संघ एकमेकांसमोर येतील.

आरसीबीची विजयी मालिका खंडित होईल

या हंगामात आतापर्यंत आरसीबी हा एकमेव अपराजित संघ आहे, ज्याने दोनपैकी दोन सामने जिंकले आहेत, ज्यामध्ये त्यांनी मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्सचा पराभव केला आहे. विजयी मालिका सुरू ठेवण्यासाठी, स्मृती मानधनाचा संघ आता अ‍ॅशले गार्डनरच्या गुजरात जायंट्सशी सामना करेल, ज्यांनी एमआयविरुद्ध पराभवानंतर यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पहिले दोन सामने जिंकले आहेत.

Our 3️⃣rd outing this #WPL2026, fully dialed in. 😮‍💨🔥 With the same hunger and the same intent, our girls are chasing 3️⃣/3️⃣ with the 12th Man Army backing us all the way. 🙌🔥#PlayBold #ನಮ್ಮRCB #GGvRCB pic.twitter.com/JyXbw55R9Q — Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) January 16, 2026

समोरासमोर आकडेवारी

महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात, बंगळुरू आणि गुजरातने सहा सामने खेळले आहेत, ज्यामध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन विजय मिळवले आहेत. दरम्यान, आरसीबीने डीवायपीएल स्टेडियमवर पाच सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तीन विजय आणि दोन पराभव झाले आहेत. दुसरीकडे, गुजरातने या मैदानावर खेळलेल्या सहा सामन्यांमध्ये दोन विजय आणि चार पराभव स्वीकारले आहेत.

हवामान अंदाज

नवी मुंबईतील तापमान आज १९ ते ३१ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे, पावसाचा अंदाज नाही. ताशी ३ ते ८ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची अपेक्षा आहे. रात्री थोडासा दवही पाठलाग करणाऱ्या संघाला अनुकूल ठरू शकतो.

WPL 2026 : तीन दिवसात दुसऱ्यांदा भिडणार यूपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स! वाचा कधी आणि कुठे होणार सामना?

पिच रिपोर्ट

आरसीबी आणि गुजरात यांच्यातील हा WPA २०२६ सामना एक उत्तम सामना ठरू शकतो. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवरील खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल आहे. अनेकदा संघांनी १५० चा टप्पा सहज ओलांडताना पाहिले आहे. यामुळे उच्च धावसंख्या असलेला सामना होऊ शकतो. नंतर फलंदाजी करणे अनेकदा फायदेशीर ठरले आहे.

आरसीबीचा संभाव्य प्लेइंग ११

ग्रेस हॅरिस, स्मृती मानधना (कर्णधार), डी हेमलता, ऋचा घोष (विकेटकीपर), गौतमी नाईक, राधा यादव, नादिन डी क्लर्क, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, लिन्से स्मिथ, लॉरेन बेल

जीजीची संभाव्य प्लेइंग ११

बेथ मुनी (यष्टीरक्षक), सोफी डेव्हाईन, आयुषी सोनी, ॲश्ले गार्डनर (कर्णधार), जॉर्जिया वेरेहम, भारती फुलमाली, काशवी गौतम, कनिका आहुजा, तनुजा कंवर, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग.

सामना कुठे आणि कसा पाहायचा?

बंगळुरू आणि गुजरात यांच्यातील सामना १६ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल. दोन्ही कर्णधार संध्याकाळी ७ वाजता टॉससाठी येतील. क्रिकेट चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचा आनंद घेऊ शकतात. हा सामना जिओहॉटस्टारवर ऑनलाइन स्ट्रीम केला जाईल.

Web Title: Wpl 2026 rcb vs gg gujarat keen to stop bangalore winning streak know playing 11 pitch and weather updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • cricket
  • Sports
  • WPL 2026

संबंधित बातम्या

WPL 2026 : तीन दिवसात दुसऱ्यांदा भिडणार यूपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स! वाचा कधी आणि कुठे होणार सामना?
1

WPL 2026 : तीन दिवसात दुसऱ्यांदा भिडणार यूपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स! वाचा कधी आणि कुठे होणार सामना?

T20 World Cup 2026 पूर्वी अफगाणिस्तानच्या संघाला मोठा धक्का! दुखापतीमुळे या स्टार खेळाडूला सोडावा लागला संघ
2

T20 World Cup 2026 पूर्वी अफगाणिस्तानच्या संघाला मोठा धक्का! दुखापतीमुळे या स्टार खेळाडूला सोडावा लागला संघ

आठ सामन्यांनंतर WPL 2026 च्या पॉइंट्स टेबल स्थिती काय? RCB अव्वल स्थानावर तर MI…जाणून घ्या गुणतालिकेचं चित्र
3

आठ सामन्यांनंतर WPL 2026 च्या पॉइंट्स टेबल स्थिती काय? RCB अव्वल स्थानावर तर MI…जाणून घ्या गुणतालिकेचं चित्र

नझमुलच्या कृतीवर बांगलादेशी क्रिकेटपटू ठाम, जाहीर माफीची केली मागणी! बीपीएल खेळण्यावर अजूनही प्रश्नचिन्ह
4

नझमुलच्या कृतीवर बांगलादेशी क्रिकेटपटू ठाम, जाहीर माफीची केली मागणी! बीपीएल खेळण्यावर अजूनही प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.