
Smriti Mandhana surpasses Harmanpreet Kaur's record! She became the first Indian player to achieve this feat in the WPL.
Smriti Mandhana broke Harmanpreet Kaur’s record : महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये काल नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने विजय मिळवला. या दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कर्णधार स्मृती मानधनाने महिला प्रीमियर लीग मध्ये एक मोठा टप्पा गाठला आहे. ती WPL मध्ये भारतीय फलंदाजाकडून सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे. मानधनाने ही कामगिरी करताना हरमनप्रीत कौरला मागे टाकत इतिहास रचला आहे.
शनिवारी (१७ जानेवारी) नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध महिला प्रीमियर लीग २०२६ सामन्यात कर्णधार स्मृती मानधनाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी डावाची सुरुवात केली आणि ६१ चेंडूत ९६ धावा फटकावल्या. मानधनाने १३ चौकार आणि ३ षटकारांसह ९६ धावा करून हरमनप्रीत कौरचा विक्रम मोडीत काढला आहे. ९ मार्च २०२४ रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर गुजरात जायंट्स विरुद्ध हरमनप्रीत कौर ४८ चेंडूत नाबाद ९५ धावा केल्या होत्या. आता मानधनाने या बाबत तिला मागे टाकले आहे.
महिला प्रीमियर लीगमध्ये अद्याप कोणत्याही फलंदाजाला शतक झळकाववण्यात यश आलेले नाही. स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम न्यूझीलंडची दिग्गज अष्टपैलू खेळाडू सोफी डेव्हाईन हिच्या नावावर जमा आहेत. महिला प्रीमियर लीग २०२३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना, सोफी डेव्हाईनने १८ मार्च २०२३ रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर गुजरात जायंट्स विरुद्ध फक्त ३६ चेंडूत ९९ धावा केल्या होत्या. तथापि, ती तिच्या शतकापासून फक्त एक धाव कमी पडली होती.
हेही वाचा : IND vs NZ, 3rd ODI : इंदोरमध्ये मिचेल-फिलिप्सचे वादळ! न्यूझीलंडचे भारतासमोर 338 धावांचे लक्ष्य
यानंतर, ८ मार्च २०२५ रोजी लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात, ऑस्ट्रेलियन फलंदाज जॉर्जिया वॉलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध UP वॉरियर्सकडून खेळताना ५६ चेंडूत नाबाद ९९ धावांची खेळी केली होती. डावाचा शेवटचा चेंडू खेळण्याची संधी न मिळाल्याने जॉर्जिया पहिली WPL शतकवीर होण्यापासून दूर राहिली होती.