Amravati Free Style Wrestling Competition
या स्पर्धेत विद्यालयाचा विद्यार्थी शुभम रवींद्र शिरसाठ याने १९ वर्षे वयोगटातील ६५ किलो वजन गटाच्या फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत अमरावती विभागातून प्रथम क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे विद्यालयाचा विद्यार्थी ओमकार सुनील काकड याने १७वर्षे वयोगटातील ४८ किलो वजन गटातील ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला, दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिस्पर्धाविरुद्ध उत्कृष्ट डावपेच, ताकद व आत्मविश्वासाचे प्रदर्शन करत विभागीय स्तरावर विजेतेपद मिळविले. त्यांच्या या यशामुळे आता ते आगामी राज्यस्तरीय फ्री स्टाईल व ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यावेळी प्राचार्य उद्धव दराडे, क्रीडा प्रशिक्षक सुनील काकड़, राजू चंदवडे, सहाय्यक शिक्षक रामदास सानप, प्रकाश सोनुने, संजय केकान, गजानन मुंढे, राजीव मांटे, नितीन खरात, गजानन थिगळे, संजय काळुसे, उद्धव राठोड, गवई, गोपाळ पवार, गणेश काळुसे, रामेश्वर हरकळ आदींसह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
शुभम शिरसाठ व ओमकार काकड यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यालयात त्यांचे स्वागत व कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे श्रेय त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण सरावाला, क्रीडा प्रशिक्षकांचे मार्गदर्शन तसेच विद्यालयातील शिक्षक व पालकांच्या प्रोत्साहनाला दिले जात आहे. विजयी विद्याथ्यांचे विद्यालयाचे अध्यक्ष शिवाजीराव काळूसे यांनी स्वागत करून त्यांचे कौतुक केले. तसेच आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देत विद्याथ्यांनी याच जिद्दीने व मेहनतीने सराव करून विद्यालयासह अमरावती विभागाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.






