Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WTC 2025-27: बांग्लादेशच्या विजयाने समीकरणं बदलली; ऑस्ट्रेलियाची बादशाही धोक्यात! भारतालाही टाकलं मागे

WTC Points Table update after Bangladesh beat Australia: जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या २०२५-२७ हंगामात दमदार कामगिरी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला मायदेशात बांग्लादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात ९ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. यामुळे आता त्यांचे अव्वल स्थान धोक्यात आले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 16, 2026 | 03:42 PM
WTC 2025-27:  बांग्लादेशच्या विजयाने समीकरणं बदलली; ऑस्ट्रेलियाची बादशाही धोक्यात! भारतालाही टाकलं मागे
Follow Us
Follow Us:
  • बांग्लादेशच्या विजयाने समीकरणं बदलली
  • ऑस्ट्रेलियाची बादशाही धोक्यात
  • भारतालाही टाकलं मागे
बांग्लादेशने २३ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी मालिका खेळताना इतिहास रचला आहे. डार्विनमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बांग्लादेशने ऑस्ट्रेलियाचा ९ विकेट्सने पराभव करत ऑस्ट्रेलियातील पहिला कसोटी विजय नोंदवला. सामन्याच्या चौथ्याच दिवशी बांग्लादेशने हा ऐतिहासिक विजय मिळवत दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने बांग्लादेशसमोर विजयासाठी अवघ्या ५७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे आव्हान बांग्लादेशने केवळ १४.२ षटकांत एका विकेट गमावून पूर्ण केले. शादमान इस्लाम २५ धावांवर, तर मोमिनुल हक ३० धावांवर नाबाद राहिले. पहिल्या डावात शतक झळकावणारा तन्झिद हसन मात्र दुसऱ्या डावात खाते न उघडताच बाद झाला. अखेर बांग्लादेशने कांगारूंना त्यांच्याच घरात धूळ चारत ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. आता, बांग्लादेशच्या या विजयाने जागतिक कोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) गुणतालिकेत मोठा उलटफेर झाला आहे.

Aus vs Ban: कांगारूंची शिकार! बांग्लादेशने ऑस्ट्रेलियाला घरातच लोळवलं; 9 विकेट्सने ऐतिहासिक विजय

ऑस्ट्रेलियाचे अव्वल स्थान धोक्यात, बांग्लादेशला फायदा

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२५-२७ च्या गुणतालिकेनुसार, बांग्लादेशविरुद्धचा सामना गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या गुणांच्या टक्केवारीत घट झाली आहे. ऑस्ट्रेलियन संघ ७७.७८ च्या एकूण गुणांच्या टक्केवारीसह अजूनही पहिल्या स्थानावर आहे. डब्ल्यूटीसी २०२५-२७ च्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर विद्यमान विजेता दक्षिण आफ्रिका असून, त्याची एकूण गुणांची टक्केवारी ७५ आहे. त्यामुळे, जर ऑस्ट्रेलिया बांग्लादेशविरुद्धचा दुसरा सामना हरला, तर तो आपले पहिले स्थान गमावेल. दुसरीकडे, बांग्लादेशला या विजयाचा फायदा झाला असून, डब्ल्यूटीसीच्या चालू फेरीत ६६.६७ च्या एकूण गुणांच्या टक्केवारीसह तो चौथ्या स्थानावर आहे.

बांग्लादेशने भारताला टाकलं मागे

या विजयामुळे बांग्लादेशने डब्ल्यूटीसी गुणतालिकेत उलथापालथ घडवून आणली आहे. बांगलादेश आता डब्ल्यूटीसी गुणतालिकेत भारताच्या पुढे गेला असून त्याने आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. बांगलादेश चौथ्या स्थानावर कायम आहे, परंतु त्याने आपल्या गुणांच्या टक्केवारीत लक्षणीय सुधारणा केली आहे. दुसरीकडे, भारत पाचव्या स्थानावर आहे.

सध्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारत श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या चालू हंगामातील अंतिम फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत टिकून राहण्याकरिता भारताला प्रत्येक सामना जिंकावा लागेल. भारतीय संघ सध्या डब्ल्यूटीसी २०२५-२७ च्या गुणतालिकेत ४८.१५% एकूण गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. गॉलमधील पहिल्या कसोटीतील विजयामुळे त्यांचे स्थान अधिक मजबूत होऊ शकते.

IND vs SL Live: गॉलमध्ये पावसाची बॅटिंग सुरूच! पहिलं सत्र रद्द, दुसऱ्या सत्रालाही विलंब; सामना कधी सुरू होणार?

Web Title: Wtc 2025 27 updated points table bangladesh beat australia india ranking

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • Australia Cricket Team
  • Bangladesh Cricket Team
  • WTC 2027
  • WTC Points Table

संबंधित बातम्या

Aus vs Ban: कांगारूंची शिकार! बांग्लादेशने ऑस्ट्रेलियाला घरातच लोळवलं; 9 विकेट्सने ऐतिहासिक विजय
1

Aus vs Ban: कांगारूंची शिकार! बांग्लादेशने ऑस्ट्रेलियाला घरातच लोळवलं; 9 विकेट्सने ऐतिहासिक विजय

AUS Vs BAN: कांगारूंना लयं पळवलं! घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया अडचणीत, तंजिद हसनने…
2

AUS Vs BAN: कांगारूंना लयं पळवलं! घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया अडचणीत, तंजिद हसनने…

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल
3

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Mitchell Starc चा ऐतिहासिक विक्रम! हेराथला मागे टाकत बनला टेस्ट क्रिकेटचा नंबर-1 लेफ्ट-आर्म बॉलर
4

Mitchell Starc चा ऐतिहासिक विक्रम! हेराथला मागे टाकत बनला टेस्ट क्रिकेटचा नंबर-1 लेफ्ट-आर्म बॉलर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.