WTC Final 2025: Steve Smith created history as soon as he stepped onto the field! He equaled 'this' record...
WTC Final 2025 : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना सुरू आहे. सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंम्बा बवुमाने नाणेफेक जिंकुन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ऑस्ट्रेलिया संघ प्रथम फलंदाजी करत आहे. ऑस्ट्रेलियाची सुरवात चांगली झाली नाही. साऊथ आफ्रिकेच्या कसिगो रबाडाने ऑस्ट्रेलियाला सुरवातीला दोन धक्के दिले. उस्मान ख्वाजा आणि कॅमेरॉन ग्रीन या दोघांना त्याने १६ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर मैदानात फलंदाजीसाठी स्टीव्ह स्मिथ आला. स्मिथने मैदानावर पाय ठेवताच कसोटी क्रिकेटमध्ये एक विक्रम रचला आहे.
ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथने अंतिम सामन्यात त्याच्याच देशाचा दिग्गज फलंदाज रिकी पॉन्टिंगच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की पॉन्टिंगने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण 6 आयसीसी अंतिम सामने खेळण्याचा पराक्रम केला होता. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ अंतिम 2025 सह, स्टीव्ह स्मिथने देखील 6 आयसीसी अंतिम सामने खेळले आहेत. या यादीत आशियाई देश श्रीलंकेच्या दोन खेळाडूंचा देखील समावेश आहे. श्रीलंकेचा कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांनी त्यांच्या कारकिर्दीत प्रत्येकी 6 आयसीसी अंतिम सामने खेळले आहेत.
भारताचा विराट कोहली आणि रोहित शर्मा सर्वाधिक आयसीसी अंतिम सामने खेळणाऱ्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत. या दोघांनीही एकूण 9-9 आयसीसी फायनल सामने खेळले आहेत. यानंतर आणखी एका भारतीय खेळाडूचा नंबर लागतो. रवींद्र जडेजाही या याडीताहे. त्याने एकूण 7 आयसीसी अंतिम सामने खेळलेले आहेत.
हेही वाचा : WTC Final 2025 : कागिसो रबाडाचे ऑस्ट्रेलियाला मोठे धक्के; एकाच षटकात ‘या’ दोन फलंदाजांना पाठवले माघारी..
कागिसो रबाडा आणि मार्को जानसेन यांनी दक्षिण आफ्रिकेला मोठे यश मिळवून दिले आहे. कगीसो रबाडाने प्रथम उस्मान ख्वाजाला बाद केले. ख्वाजा भोपळाही न फोडता आऊट झाला.त्याने २० चेंडूचा सामना केला. त्यात त्याला एक ही धाव काढता आली नाही. तर त्याच षटकात रबडाने कॅमेरॉन ग्रीनला ४ धावांवर असताना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यांनंतर मार्नस लाबुशेन(५६ चेंडू १७ धावा) आणि ट्रॅव्हिस हेड(१३ चेंडू ११ धावा) या जोडीला मार्को जानसेने आऊट केले. सध्या स्टीव्ह स्मिथ ४५ धावांवर तर ब्यू वेबस्टर ९ धावांवर खेळत आहे. ३० ओव्हर झाले असून ऑस्ट्रेलियाच्या ६४ धावा झाल्या आहेत.
टेम्बा बावुमा (कर्णधार), एडेन मार्कराम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल व्हेरेन, मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.
उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिशेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवुड.