सौरव गांगुल(फोटो-सोशल मीडिया)
Ind vs Eng : भारत आणि इंग्लंडमधील पाच सामन्यांची कसोटी मालिका २० जूनपासून सुरवात होणार आहे. या दरम्यान, भारतीय संघाचे नेतृत्व तरुण शुभमन गिल करणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडिया आधीच इंग्लंडमध्ये रवाना झाली आहे. अशा परिस्थितीत, गिल आणि कंपनीसाठी हा दौरा खूप आव्हानात्मक ठरणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गजांनी निवृत्ती घेतली असून आता संघात रवींद्र जडेजा, केएल राहुल आणि जसप्रीत बूमराह यांना सोडून नव्या दमाच्या टीम इंडियाकडे या दौऱ्यात अनुभवाची कमतरता दिसून येत आहे.
या दौऱ्यात टीम इंडियाकडे गोलंदाजीत जसप्रीत बुमराहकडे अनुभव असणार आहे. गोलंदाजीत संघाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असणार आहे. माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीनेही बूमराहवर विश्वास दाखवला आहे. इंग्लंडच्या भूमीवर संघाच्या विजयात जसप्रीत बुमराह ट्रम्प कार्ड ठरू शकतो, असे गांगुलीने म्हटले आहे.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, रेव्हस्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला की, “जसप्रीत बुमराह हा भारतीय संघाचा सर्वात मोठा ट्रम्प कार्ड असणार आहे. पण, तुम्हाला हे समजून घ्यायल हवे की, तुम्ही त्याला सतत गोलंदाजी करायला लावू शकत नाही. कर्णधार शुभमन गिलला हे समजून घ्यावे लागणार आहे. तुम्हाला बुमराहचा वापर हा विकेट घेण्यासाठी करावा लागणार आहे.” असे देखील गांगुली म्हणला आहे.
तो पुढे म्हणाला की, “तुम्ही जसप्रीतला एका दिवसात १२ पेक्षा जास्त षटके गोलंदाजी करायला लावू नये. इतर गोलंदाजांना पुढे येऊ द्या. जर तुम्ही बुमराहला थांबवण्यास यशस्वी ठरलात आणि त्याचा विकेट घेणारा गोलंदाज म्हणून वापर केलात तर तुम्हाला जिंकण्याची अधिक चांगली शक्यता असणार आहे.”
गांगुली पुढे म्हणाला की, “अशा परिस्थितीत सद्या इंग्लंड हा एक चांगला संघ म्हणून पुढे आला आहे. तथापि, जर टीम इंडियाने चांगली फलंदाजी केली आणि बुमराहचा योग्य वापर करण्यात आला, तर टीम इंडियाला जिंकण्याची चांगली शक्यता असेल. मी एजबॅस्टन आणि लॉर्ड्स कसोटी सामने पाहण्यासाठी येणार आहे, कारण मला विश्वास आहे की टीम इंडियाला ही मालिका जिंकण्याची संधी असणार आहे.”
हेही वाचा : WTC Final 2025 : कागिसो रबाडाचे ऑस्ट्रेलियाला मोठे धक्के; एकाच षटकात ‘या’ दोन फलंदाजांना पाठवले माघारी..
शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंग.
बेन स्टोक्स (कर्णधार), बेन डकेट, ऑली पोप, जॅक क्रॉली, जो रूट, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, जोश टंग, जेमी ओव्हरटन, ख्रिस वोक्स.