कगीसो रबाडा(फोटो-सोशल मीडिया)
SA vs AUS WTC Final 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना सुरू झाला आहे. सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंम्बा बवुमाने नाणेफेक जिंकुन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आता दक्षिण आफ्रिकेसाठी चांगला ठरत आही असे दिसत आहे. कारण ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली नाही. १६ धावांवर त्यांना कगिसो रबडाने दोन मोठे झटके दिले आहेत. उस्मान ख्वाजा आणि कॅमेरॉन ग्रीन या दोघांना त्याने १६ धावांवर माघारी पाठवले आहे.
कागिसो रबाडाने दक्षिण आफ्रिकेला मोठे यश मिळवून दिले आहे. स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेनची जोडी सध्या मैदानावर खेळत आहे. कगीसो रबाडाने प्रथम उस्मान ख्वाजाला बाद केले. ख्वाजा भोपळाही न फोडता आऊट झाला.त्याने २० चेंडूचा सामना केला. त्यात त्याला एक ही धाव काढता आली नाही. तर त्याच षटकात रबडाने कॅमेरॉन ग्रीनला ४ धावांवर असताना बाहेरचा रस्ता दाखवला. १७ ओव्हर झाले असून असून स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन ही दोघे ऑस्ट्रेलियाचा डाव सावरून घेत आहेत. संघाच्या ४१ धावा झालेल्या आहेत.
लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवण्यात ये असलेल्या सामन्यासाठी सामन्याच्या पूर्वसंध्येला दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली. बुधवारी, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ११ जून ते १५ जून दरम्यान लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जाणार आहे. विजेत्या संघाला ३.६ दशलक्ष डॉलर्सची बक्षिसाची रक्कम मिळणार आहे. ही रक्कम २०२१ च्या विजेत्या न्यूझीलंड आणि २०२३ च्या विजेत्या ऑस्ट्रेलियाला मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेच्या दुप्पट आहे. तर उपविजेत्या संघाला २.१६ दशलक्ष डॉलर्स इतकी रक्कम मिळेल. याचा अर्थ असा की यावेळी उपविजेत्या संघाला गेल्या दोन विजेत्यांना मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे. २०२३ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि २०२१ मध्ये न्यूझीलंडला जागतिक कसोटी अजिंक्यपद विजेतेपद जिंकल्याबद्दल १.६ दशलक्ष डॉलर्स मिळाले होते.
टेम्बा बावुमा (कर्णधार), एडेन मार्कराम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल व्हेरेन, मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.
हेही वाचा : ENG vs WI : 16 वर्ष जुना क्रिस गेलचा रेकाॅर्ड मोडला! इंग्लंडच्या सलामी जोडीचे नाव कोरले सुवर्ण अक्षरात
उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिशेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवुड.