Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yashasvi Health Update : यशस्वी जयस्वालच्या तब्बेतीबाबत धक्कादायक खुलासा! 2 दिवसांत घडले असे काही…

भारतीय संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला  हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. आता त्याची तब्बेत बरी असून तो मुंबईला परतला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 18, 2025 | 06:15 PM
Yashasvi Health Update : यशस्वी जयस्वालच्या तब्बेतीबाबत धक्कादायक खुलासा! 2 दिवसांत घडले असे काही…
Follow Us
Close
Follow Us:

Yashasvi Health Update : भारतीय संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालची प्रकृती अचानक बिघडली होती. त्याला  हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. आता त्याच्या प्रकृतीबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांत यशस्वीने अंदाजे २ किलो वजन कमी झाले आहे आणि डॉक्टरांनी त्याला ७ ते १० दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला देखील दिला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान हा सर्व प्रकार समोर आला आहे. जेव्हा हरियाणाविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याची प्रकृती अचानक बिघडली होती, त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केले होते.

हेही वाचा : IND vs SA 5th t20I : अहमदाबादमध्ये भारतच ‘बॉस’! पाचव्या T20 सामन्याचे गणित काय?वाचा सविस्तर

यशस्वीला सामन्यादरम्यान खूप अस्वस्थ वाटू लागले आणि त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. सुरुवातीला पोटात सूज आल्याचे निदान झाले, परंतु पुढील तपासणीत खरे कारण समोर आले आहे.

 गॅस्ट्रोएन्टेरिटिसचे निदान

सीटी स्कॅन आणि अल्ट्रासाऊंडमध्ये यशस्वीला गॅस्ट्रोएन्टेरिटिसचा त्रास असल्याचे उघड झाले आहे.  हे सहसा अन्न विषबाधेमुळे होते आणि त्यामुळे पोटदुखी, अशक्तपणा आणि वजन देखील कमी होते. त्याच्या बिघडत्या तब्येतीमुळे, यशस्वीला काही काळ रुग्णालयात  राहावे लागेल.  तथापि, वेळेवर उपचार मिळाल्यामुळे त्याची प्रकृती आता बरी असल्याची माहिती आहे.

  यशस्वीला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

यशस्वी जयस्वालला आता रुग्णालयातून डिस्चार्ज दिला गेला आहे. तो मुंबईत परतला असून त्याला पुढील काही दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे आणि तो पुढील काही दिवस क्रिकेटपासून लांब राहणार आहे.  एका सूत्राने सांगितले की, “हा अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार असून पुण्यातील हॉटेलमध्ये त्याने काहीतरी खाल्ले असण्याची शक्यता असून त्यामुळे  त्याची प्रकृती बिघडल्याचे समजते. गेल्या दोन दिवसांत त्याचे २ किलो वजन कमी झाले असून डॉक्टरांनी त्याला ७ ते १० दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे.”

विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यांना मुकावे लागणार?

असे ​​बोलले जात आहे की, यशस्वी पूर्णपणे बरा होण्यासाठी किमान एक आठवडा तरी लागणार आहे. त्यामुळे, तो विजय हजारे ट्रॉफीच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संघ व्यवस्थापन त्याच्या पुनरागमनाची घाई करण्याच्या तयारीत नाही.

हेही वाचा : IND vs SA 4th T20I : अखेर लखनौ टी-20 सामान्याबद्दल BCCI ने केली चूक मान्य! आगामी मालिकांच्या वेळापत्रकाबाबत काळजी घेणार

बीसीसीआय यशस्वी जयस्वालच्या प्रकृतीवर देखील बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती आहे. पुढील महिन्यात भारतीय संघ  न्यूझीलंडविरुद्ध व्हाईट बॉल मालिका खेळणार असून ज्यामध्ये यशस्वी एकदिवसीय संघाचा भाग असणार आहे.

Web Title: Yashasvi health update a shocking revelation about yashasvi jaiswals health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 06:15 PM

Topics:  

  • Health Updates
  • Syed Mushtaq Ali Trophy
  • Yashasvi Jaiswal

संबंधित बातम्या

Yashasvi Jaiswal Hospitalised: यशस्वी जैस्वालची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालं?
1

Yashasvi Jaiswal Hospitalised: यशस्वी जैस्वालची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालं?

यशस्वी जयस्वालने ठोकले शतक, निवडकर्त्याने वेधले लक्ष! भारतीय संघात मिळणार पुन्हा कमबॅक करण्याची संधी?
2

यशस्वी जयस्वालने ठोकले शतक, निवडकर्त्याने वेधले लक्ष! भारतीय संघात मिळणार पुन्हा कमबॅक करण्याची संधी?

IPL 2026 Auction : 9 चौकार, 11 सिक्स… कोण आहे Salil Arora? 39 चेंडूत ठोकले शतक, लिलावात नशीब चमकणार का?
3

IPL 2026 Auction : 9 चौकार, 11 सिक्स… कोण आहे Salil Arora? 39 चेंडूत ठोकले शतक, लिलावात नशीब चमकणार का?

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान भ्रष्टाचार घोटाळ्यात चार खेळाडूंचा सहभाग; मोठी कारवाई
4

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान भ्रष्टाचार घोटाळ्यात चार खेळाडूंचा सहभाग; मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.