भारत आणि दक्षिण आफ्रिका(फोटो-सोशल मीडिया)
IND vs SA 5th t20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा सामना बुधवारी लखनऊच्या एकाना स्टेडियमवर खेळवला जाणार होता. परंतु, दाट धुक्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला. आता मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना शुक्रवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. अहमदाबादमध्ये भारतीय संघाची टी-२० क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी राहिली आहे. या ठिकाणी भारतीय संघाला केवळ इंग्लंडकडूनच पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे आता भारताला अहमदाबादमधील विजय मालिका जिंकण्यास मदत करेल अशी आशा आहे.
भारतीय क्रिकेट संघाने अहमदाबादमध्ये सात टी-२० सामने खेळलेले आहेत. त्यापैकी भारताने पाच सामने जिंकले आहेत, तर दोन सामन्यांचा निकाल मात्र भारताच्या बाजूने लागू शकला नाही. इंग्लंडने हे दोन्ही सामने ८ विकेट्सने जिंकले आहेत. या विक्रमाच्या आधारे, भारतीय अहमदाबादमध्ये मालिका जिंकू शकते असे मानले जाते.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या मालिकेत २-१ अशा आघाडीवर आहे. भारताने पहिला सामना जिंकला तर दूसरा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला. तसेच तिसरा सामना भारताने जिंकून आघाडी घेतली. चौथा सामना होऊ शकला नाही. जर दक्षिण आफ्रिकेने पाचवा टी-२० सामना जिंकला तर मालिका अनिर्णित राहील. जर भारताने हा सामना जिंकला तर भारत मालिकेवर कब्जा करेल.
अहमदाबादमध्ये कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असणार आहेत. कारण भारतीय कर्णधाराची आताची कामगिरी खराब राहिलेली आहे. त्याला गेल्या २० डावांमध्ये एक देखील अर्धशतक झळकावता आलेले नाही. अहमदाबादची खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल मानली जाते, त्यामुळे सूर्यकुमार यादव मोठ्या डावात मोठी खेळी करून आपली क्षमता दाखवून देऊ शकतो.
हेही वाचा : WI VS NZ : टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉनवे जोडीचा WTC मध्ये धुमाकूळ! सलामीच्या ‘त्या’ पराक्रमाने रचला विश्वविक्रम
वाचा दोन्ही संघ
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद
दक्षिण आफ्रिकाः एडेन मार्कराम (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेड्रिक्स, देवाल्ड बुविस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, डोनोवन फरेरा, माकों जानसेन, लुथो सिपामला, ओटनील बार्टमन, अॅरिक नॉर्टजे, लुंगी एनगिडी, कॉर्बिन बॉश, केशव महाराज आणि जॉर्ज लिंडे.






