
Yashvir Singh Replaced Neeraj Chopra
भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनने (AFI) गुरुवारी आगामी आशियाई खेळांसाठी ७७ सदस्यीय ट्रॅक अँड फील्ड संघाची घोषणा केली. यशवीर सिंगचा पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. त्याच्यासोबत रोहित यादवही भारताचे प्रतिनिधित्व करेल. दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राचा यापूर्वी ७३ सदस्यीय संघात समावेश होता. तो जकार्ता २०१८ आणि हांगझू २०२३ मध्ये आपल्या आशियाई खेळांतील विजेतेपदाला डिफेन्ड करणार होता, परंतु दुखापतीमुळे तो आता जपानमधील खेळांचा भाग असणार नाही. यशवीरने अलीकडेच ग्लासगो येथील राष्ट्रकुल खेळांमध्ये कांस्य पदक जिंकून आपला दावा अधिक मजबूत केला आहे. आता यशवीर आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरजची जागा घेईल.
भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष (AFI) बहादूर सिंग सग्गू पत्रकार परिषदेत म्हणाले की, ‘आम्ही आशियाई खेळांसाठी नीरज चोप्राच्या जागी यशवीर सिंगचा समावेश केला आहे. त्याने राष्ट्रकुल खेळांमध्ये पदक जिंकले आहे. नीरज सध्या दुखापतग्रस्त आहे. त्याच्या दुखापतीमुळे हा बदल करण्यात आला आहे. यशवीरच्या येण्याबद्दल कोणतीही अडचण नव्हती.’
२०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकून यशवीर सिंगने आपले कौशल्य सिद्ध केले.तसेच, त्याने आपली सर्वोत्तम कामगिरीही केली. यशवीरने ८५.४१ मीटरचा थ्रो केला. काशिनाथ नायक (२०१०) आणि नीरज (२०१८, २०२६) यांच्यानंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणारा यशवीर हा तिसरा भारतीय भालाफेकपटू आहे. २०२६ हे वर्ष त्याच्यासाठी खूपच यशस्वी ठरले आहे. त्याने आठ स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि त्यापैकी सहा स्पर्धांमध्ये ८० मीटरपेक्षा जास्त थ्रो केला. आता सर्वांच्या नजरा यशवीरवर असतील. नीरजच्या जागी संघात स्थान मिळाल्याने त्याच्यावर दबावही असेल.