IND vs PAK: 'If Abhishek Sharma plays 20 overs, he will score 200 runs..', the statement of former Indian cricketer created a stir...
Asia cup 2025 : आशिया कपच्या (Asia cup 2025 ) सुपर ४ सामन्यात भारताने पाकिस्तानल धूळ चारली. या सामन्यात अभिषेक शर्मा भारतासाठी खरा हीरो ठरला. त्याने ३९ चेंडूत ७४ धावा करून भारताचा विजय सोपा केला. त्याच्या खेळीचे आता सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. सध्या अभिषेक शर्मा हा टी-२० क्रिकेटमध्ये नंबर वन फलंदाज आहे. या संदर्भात आता एका माजी दिग्गज खेळाडूचे विधान व्हायरल होऊ लागले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, जर अभिषेक २० षटके खेळत राहिला तर तो एकट्याने २०० धावा उभ्या करू शकतो.
हेही वाचा : IND VS BAN : ‘भारताला पराभूत करू…’, बांगलादेशची शिरजोरी, सामन्यायाधीच प्रशिक्षकाने उधळली मुक्ताफळे
युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांचे अभिषेक शर्माबाबतचे विधान सध्या व्हायरल होत आहे. योगराज सिंग भारताच्या पाकिस्तानवरील विजयाने अत्यंत आनंदी असल्याचे दिसत आहेत. त्यांनी शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांच्या फलंदाजीचे भरभरून कौतुक देखील केले आहे. त्यांना असा विश्वास वाटत आहे की, जर सलामीवीर अभिषेक शर्माने पूर्ण २० षटके खेळून काढली तर तो २०० धावांचा टप्पा देखील सहज गाठू शकतो.
योगराज सिंग यांनी आयएएनएसला सांगितले की, “शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा ज्या लयीत आहेत ते पाहता असे दिसून येत आहे की, ते २५० धावांचे लक्ष्य देखील सहज गाठू शकतात, परंतु त्यांना १५ षटके खेळावी लागणार आहेत. मी अभिषेक शर्माला फक्त १२-१५ षटके खेळण्यास सांगू इच्छितो. मला वाटते की संघ शुभमन गिल आणि अभिषेक शर्मावर जास्तच अवलंबून राहत असल्याचे दिसत आहे.”
माजी क्रिकेटपटू योगराज सिंग पुढे म्हणाले की, “शुभमन गिल एकाच चेंडूने दोन वेळा बाद झाला आहे. त्याने सुधारणा करायला हवी. तुम्ही कितीही मोठा खेळाडू झाला तरी देखील तुम्ही खेळापेक्षा मोठे होण्याची शक्यता नाही. खेळाडूंनी नेहमीच विद्यार्थी राहिले पाहिजे.” असे योगराज सिंग म्हणाले.
योगराज सिंग यांचा असा विश्वास आहे की जर अभिषेक पूर्ण २० षटके खेळून गेला तर तो द्विशतक देखील झळकावू शकतो. ते म्हणाले की , “मला वाटते की ज्या दिवशी अभिषेक शर्मा २० षटके खेळूण काढेल तो २०० धावांचा टप्पा सहज गाठू शकेल.