भारत वि बांगलादेश(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : आशिया कप २०२५(Asia cup 2025) मधील सुपर ४ सामने सुरू झाले आहेत. आतापर्यंत २ सुपर ४ सामने खेळले गेले आहेत, तर तिसरा सुपर ४ सामना आज श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जात आहे. तर उद्या म्हणजेच २४ सप्टेंबर रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात चौथा सुपर ४ सामना खेळला जाणार आहे. बांगलादेशने पहिल्या सुपर ४ सामन्यात श्रीलंकेला हरवून आपली विजयी सुरवात केली होती. २४ सप्टेंबर रोजी बलाढ्य भारताविरुद्ध बांगलादेशचा कस लागणार आहे. कारण, भारतीय संघ आशिया कप २०२५ मध्ये गट टप्प्यापासून अपराजित आहे. असे असले तरी बांगलादेशचा आत्मविश्वास गगनाला भिडलेला दिसत आहे. आम्ही असे का म्हणत आहोत याबाबत आपण जाणून घेऊया.
युएईमध्ये होणाऱ्या आशिया कप २०२५ च्या सुपर ४ फेरीत बांगलादेशचा सामना २४ सप्टेंबर रोजी भारताशी होणार आहे. बांगलादेशचा स्पर्धेचा इतिहास बघितला तर खूपच लाजिरवाणा आहे. तरी देखील त्यांच्या विनोदी विधानांची कमी दिसून येत नाही. भारताविरुद्धच्या सामन्याआधी बांगलादेशचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, कोणताही संघ भारताला हरवू शकतो. त्यांच्या या वाक्यावरून दिसून येत आहे की, त्यांना भारताच्या अकडेवारीबद्दल काही एक माहिती नाही. जर सिमन्स यांना ही आकडेवारी माहित असती, तर त्यांनी हे धाडसी विधान करण्याची हिंमत केली नसती.
हेही वाचा : Asia cup 2025 : पाकिस्तानसह श्रीलंकन खेळाडूंच्या रडारवर अभिषेक शर्मा! नेमकं कारण काय? वाचा सविस्तर
आशिया कप टी-२० च्या इतिहासामध्ये भारत आणि बांगलादेश फक्त दोन सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. भारताने त्यांना दोन्ही सामन्यांमध्ये धूळ चारली आहे. हे आकडे पुरेसे नसतील तर एकूणच इतिहासात या फॉरमॅटमध्ये भारत आणि बांगलादेश १७ वेळा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यापैकी भारतीय संघाने बांगलादेशला १६ वेळा पराभूत केले आहे. अर्थात, ही आकडेवारी बघून तरी बांगलादेशने आपल्या प्रतिस्पर्ध्याबद्दल बोलताना काळजी घ्यायला हवी होती. पण पत्रकार परिषदेत बांगलादेशच्या प्रशिक्षकांनी अशी विधाने कडून स्वताचे हासे करून घेतले आहे.
भारतीय संघाने केवळ टी-२० मध्येच नाही तर एकदिवसीय सामन्यांमध्ये देखील बांगलादेशला धूळ चारली आहे. या आवृत्तीत, भारताने बांगलादेशविरुद्ध खेळलेल्या ४२ पैकी ३३ सामन्यात विजय मिळवला आहे. तर ८ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. अशी लाजिरवाणी आकडेवारी असताना देखील बांगलादेशच्या प्रशिक्षकाचे विधान हे खूपच बाळबोध असेच ठरते.