अभिषेक शर्मा आणि आनंद महिंद्रा(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी सुपर ४ सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानला ६ विकेट्सने धूळ चारली होती. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. यामध्ये अभिषेक शर्माने आपल्या बॅटने कहरच केला. त्याने ३९ चेंडूत ७४ धावांची तुफानी खेळी केली. अभिषेकच्या या खेळीने माजी महान खेळाडू रविचंद्रन अश्विन आणि केविन पीटरसन यांना प्रभावित केले. आता यामध्ये अजून एका व्यक्तिची भर पडली आहे. अभिषेक शर्माच्या या खेळीने आनंद महिंद्रा देखील चकित झाले आहेत. त्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून आपला आनंद व्यक्त केला आहे.
भारतीय माजी फिरकीपटू आर आश्विनने म्हटले आहे की, “हा तरुण खेळाडू भारतासाठी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक बनणार आहे.” अभिषेक शर्माच्या खेळीने भारताने सुपर ४ सामन्यात पाकिस्तानचा सहज पराभव केला. यानंतर अभिषेकवर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला.
सामन्यादरम्यान, पाकिस्तानी खेळाडू आणि अभिषेक यांच्यात काही शाब्दिक चकमक देखील झालेली पाहायला मिळाली. भारताने सामना जिंकल्यानंतर सलामीवीर अभिषेककडून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “तुम्ही बोला, आम्ही जिंकतो.” अभिषेक शर्माने ही पोस्ट शेअर करून पाकिस्तानी खेळाडूंना चोख प्रत्युत्तर दिले होते. हीच पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली.
या दरम्यान महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांच्याकडून अभिषेकच्या पोस्टचे कौतुक करण्यात आले. महिंद्रा यांनी त्या पोस्टला त्यांचे सोमवारचे प्रेरणास्थान देखील बनवले. त्यांनी लिहिले कि, “आणखी काही बोलण्याची गरज नाही.” आनंद महिंद्रा यांची प्रतिक्रिया सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, एका वापरकर्त्याकडून आनंद महिंद्रा यांना विचारण्यात आले की, “तुम्ही अभिषेक शर्माला थार भेट देणार नाही का?”
No more words need to be added. This post is my #MondayMotivation https://t.co/svrVCSEFfZ — anand mahindra (@anandmahindra) September 22, 2025
हेही वाचा : Asia cup 2025 : पाकिस्तानसह श्रीलंकन खेळाडूंच्या रडारवर अभिषेक शर्मा! नेमकं कारण काय? वाचा सविस्तर
आशिया कप २०२५ च्या सुपर ४ सामन्यात पाकिस्तानविरुद्ध अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या भारतीय सलामीवीरांनी १०५ धावांची भागीदारी करून भारताचा विजय निश्चित केला. अभिषेक शर्मा हा आशिया कप स्पर्धेच्या चालू हंगामात सर्वाधिक धावा करणारा (१७३) फलंदाज आहे.