युझवेंद्र चहल : इंडियन प्रीमियर लीगमध्ये युझवेंद्र चहल दमदार गोलंदाजी करून चाहत्यांची मनं जिंकत आहे. त्याचबरोबर T20 विश्वचषक 2024 च्या संघामध्ये सुद्धा स्थान मिळवले आहे. चहलला T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचा भाग बनवण्यात आले होते. याचदरम्यान युझवेंद्र चहलने नुकतीच एक सोशल मीडियावर मागणी केली आहे आणि ही त्याची सध्या चांगलीच चर्चेत आहे. युझवेंद्र चहलने सोशल मीडियावर कॉपीराइट हक्काची मागणी केली. चहलने एक्स मालक एलोन मस्क यांच्याकडे ही विनंती केली आहे. पण चहलला असे का करावे लागले? यामागचं नक्की कारण काय? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.
चहलची सोशल मीडिया पोस्ट
चहलने इंस्टाग्रामवर हर्षल पटेलचा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज त्याच मुद्रेत बसलेला दिसत आहे, जी चहलची आवडती पोज आहे. फोटो पोस्ट करत चहलने लिहिले, “प्रिय एलोन मस्क सर, हर्षल भाईवर कॉपीराइट लादला गेला पाहिजे.” चहलची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. यावर चाहते आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.
Dear @elonmusk paaji, Harshal bhai pe copyright lagana hai ?? pic.twitter.com/CUAeZd6uNa
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) May 1, 2024
जाणून घ्या पूर्ण प्रकरण
आयपीएल 2024 च्या 49 व्या सामन्यात हर्षल पटेलने युजवेंद्र चहलची शैली कॉपी केली होती. हा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात झाला. मॅचमध्ये कॅच घेतल्यानंतर हर्षल पटेलने चहलच्या सिग्नेचर स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले. त्यानंतर त्याची स्टाईल कॉपी होत असल्याचे पाहून चहलने त्याच्या मालकाकडे X वर कॉपीराइटची मागणी केली.