सोलापूर महानगरपालिका निवडणुकी साठी भारतीय जनता पक्षाकडे इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसत असून, नगरसेवक पदासाठी १२๐० पेक्षा अधिक इच्छुकांनी भाजपकडून अर्ज घेतले आहेत. यावरून शहरात भाजपप्रती असलेला वाढता विश्वास स्पष्ट होत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. सोलापूर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त करताना गोरे म्हणाले की, “या निवडणुकीत भाजप ‘आपकी बार ७५’ या घोषणेसह मैदानात उतरणार आहे.” महापालिका निवडणुकीतील महायुतीसंदर्भातील निर्णय भाजपचे सोलापूरमधील तीनही आमदार घेतील, असे स्पष्ट करत त्यांनी स्थानिक नेतृत्वाला निर्णयस्वातंत्र्य देण्यात आल्याचे सांगितले. महायुतीबाबत बोलताना गोरे म्हणाले, “सोलापूरचे तिन्ही आमदार जो निर्णय घेतील, त्यावर आम्ही ठाम राहू. स्थानिक नेतृत्वाशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही.” त्यामुळे आगामी निवडणुकीत स्थानिक राजकारणाला अधिक महत्त्व दिले जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. दरम्यान, आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास अगोदर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शहरातील तब्बल १५४ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे सत्ताधारी भाजपने विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.