Zuckerberg आणि Musk झाले रोबोट डॉग! व्हायरल VIDEO ने घातला सोशल मीडियावर धुमाकूळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
त्यांनी यामध्ये मार्क झुकरबर्ग, एलॉन मस्क आणि जेफ बेझोस सारख्या अब्जाधीशांचे रोबोट कुत्र्यांच्या रुपात मांडले होते. हे रोबोट्स अगदी खरे असल्याचा भास होत होता. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली होती. ही कलाकृती अब्जाधीशांचा समाजावर कसा प्रभाव टाकते आणि जनमत कसे तयार होते हे दाखवणे याचा उद्देश होता. एकेकाळी समाजाच्या विचारसणीवर आणि समजुतीवर कलाकार प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत होते. पण आता फेसबुक, इन्स्टाग्राम आणि एक्स यांसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ही भूमिका बजावत आहेत. सध्या या रोबोट्समुळे मोठा वाद पेटला आहे. मात्र याच्या लोकप्रियतेत इतकी वाढ झाली आहे की, लोकांनी हे रोबोट्स खरेदी केले आहे. या रोबोट्सच्या प्रत्येक तुकड्याची किंमत ही सुमारे १ लाख डॉलर्स असल्याचे सांगण्यात आले आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अनेकांना या रोबोट्सवरी चेहऱ्यांनी आणि त्यांच्या कुत्र्याच्या रुपाने चकित केले आहे. त्यांनी बॅकफूट स्क्रॅपी डान्स करायला हवा असे एका यजरने मिश्कीलपणे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने मी हे प्रत्यक्षात पाहिले आहे आणि हे खूप वास्तवादी, खरे असल्याचा भास होतो. तर काही लोकांनी या कलाकृतीचे कौतुक केले आहे. अश्वीसनीय कलाकृती म्हटले आहे. अनेकांनी विनोदी स्वरुपात याची मज्जा घेतली आहे. हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.
पुणेकरांची लेवलच वेगळी! फुटपाथवरुन दुचाकी चालवणाऱ्यांची ताईनं काढली आरती ; VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळटीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






