सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भीषण दुर्घटना; केबल कार अचानक थांबल्याने डझनभरहून लोक जखमी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मेक्सिकोत भीषण दुर्घटना! इमरजन्सी लँडिंगदरम्यान इमारतीवर कोसळले विमान ; ७ जणांचा मृत्यू , VIDEO
या घटनेमध्ये १४ लोक जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. तर उर्वरित १० जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरतील वाहतूक खोळंबली आहे. सॅन फ्रिन्सिको म्युनिसिपल ट्रान्सपोर्टेशन एजन्सी केबल कार अचानक बंद पडली.
यामागचे कारण सध्या अस्पष्ट असून घटनेची चौकशी केली जात आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, केबल कारमधील प्रवासी अनेकदा सीट बेल्ट घालत नाही. अशा वेळी कार हेवत उडत असताना अपघात घडला तर गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे.
सॅन फ्रान्सिस्कोमध्ये केबल कार हे पर्यटनाचे आकर्षण आहे. १८७० च्या दशकात सॅन फ्रान्सिस्कोमध्ये केबल कार पहिल्यांदा सुरु करण्यात आली होती. यानंतर १९६० मध्ये राष्ट्रीय ऐतिहासिक लँडमार्क म्हणून केबल कारला घोषित करण्यात आले. सध्या शहरात तीन केबल कार लाईन्स आहेत.
या अपघाताच्या चार दिवस आधी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये मोठा गॅस विस्फोट झाला होता. या दुर्घटनेत चार घरे आगीत जळून खाक झाली होती, तर सहाजण जखमी झाले होते. सॅन फ्रान्सिस्कोच्या अशलँड परिसरात ही घटना घडली होती. रस्ते दुरुस्तीदरम्यान लेव्हलिंग मशीननेमुळे जमिनीखाली उच्च दाबाची गॅस पाइपलाइन फुटली होती. ज्यामुळे हा अपघात घडला. या अपघातानंतर दोन तास पाइपलाइन बंद करण्यात आली होती. गॅस पाइप फुटल्यानंतर स्फोट एवढा भीषण झाला होता की, जवळपासची घरे हादरली होती. भितींवर वस्तू धडाधडा खाली पडत होत्या. तसेच चार घरे जळल्याने धूर आणि राखेचा ढिगारा अनेक फूटांपर्यंत उडाला होता.
14 people suffering minor injuries after a cable car came to an abrupt stop heading up California Street btw Hyde & Leavenworth in San Francisco SFFD tells us the crash took place just before 4pm and says the car stopped/did not hit anything or any other vehicles Panes of… pic.twitter.com/uPn6xr4mNj — Ken Duffy (@kenduffynews) December 16, 2025
Ans: केबल कार कॅलिफोर्नियाला निघालेली असताना हायड आणि लेव्हनवर्थ रस्त्यांदरम्यान वरच्या दिशेने जात असताना केबल कारचा अचानक थांबली, ज्यामुळे अपघात घडला.
Ans: सॅन फ्रान्सिस्कोच्या केबल कार अपघातात कोणाच्याही मृत्यूची नोंद झालेली नाही, पण १४ जण जखमी झाले आहे.
Ans: या अपघाताच्या चार दिवस आधी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये मोठा गॅस विस्फोट झाला होता
Ans: सॅन फ्रान्सिस्कोमध्ये मोठा गॅस विस्फोट झाला होता, ज्यात ४ घरे जळून खाक झाली होती, तर ६ जखमी झाले होते.






