Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फसव्या दिवाळी ऑफर्समुळे रिकामे होईल बँक अकाऊंट… WhatsApp चे हे फीचर्स वापरा अन् ओळखा खरे आणि खोटे मेसेज

स्कॅमर्स लोकांना डिस्काऊंट, फ्री गिफ्ट, कूपन किंवा खोट्या पार्सल डिलीवरीच्या जाळ्यात फसवतात. तर अनेकदा सरकारी ऑफीसर असल्याचा दावा करत यूजर्सकडून पैशांची मागणी केली जाते. अशा स्कॅम्सपासून सावध राहणं अत्यंत गरजेचं असतं, अन्यथा तुमचे बँक अकाऊंट क्षणात रिकामे होऊ शकते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 25, 2026 | 10:18 AM
फसव्या दिवाळी ऑफर्समुळे रिकामे होईल बँक अकाऊंट... WhatsApp चे हे फीचर्स वापरा अन् ओळखा खरे आणि खोटे मेसेज

फसव्या दिवाळी ऑफर्समुळे रिकामे होईल बँक अकाऊंट... WhatsApp चे हे फीचर्स वापरा अन् ओळखा खरे आणि खोटे मेसेज

Follow Us
Follow Us:
  • स्कॅम सहसा व्हॉट्सॲप मेसेजच्या माध्यमातून केले जातात
  • अनोळखी नंबरवरून येणाऱ्या व्हॉट्सॲप कॉल्सपासून सुरक्षित राहण्यासाठी साइलेंस अननोन कॉलर्स फीचर वापरा
  • टू-स्टेप वेरिफिकेशन फीचर यूजर्सना कोणत्याही प्रकारच्या चोरी आणि हॅकिंगपासून सुरक्षा देते
भारतात दिवाळी फेस्टिव्ह सीजन सुरु झाला आहे. म्हणजेच ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सवर ऑफर्स आणि डिस्काऊंटचा पाऊस पडत आहे. स्मार्टफोनपासून घरातील वस्तूंपर्यंत सर्वत्र ऑफर्स उपलब्ध आहेत. मात्र या ऑफर्सदरम्यान स्कॅमर्स देखील त्यांचा खेळ खेळत आहेत आणि लोकांची फसवणूक करण्यासाठी नवीन पद्धती शोधत आहेत. शॉपिंग प्लॅटफॉर्म्सच्या नावाने स्कॅमर्स यूजर्सना मेसेज पाठवतात आणि धोकादायक पेमेंट लिंक पाठवतात किंवा फोन हॅक करण्यासाठी फेक APK फाईल्सची मदत घेतली जाते. जेव्हा यूजर्स स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकतात, त्यांचे बँक अकाऊंट क्षणातच रिकामे होते.

WhatsApp वर इंस्टाग्राम रील्स शेअर करण्याचा अनुभव बदलणार! चॅटमध्ये लवकरच येणार नवीन पर्याय… कसं करणार काम? जाणून घ्या

अशा पद्धतीचे स्कॅम सहसा व्हॉट्सॲप मेसेजच्या माध्यमातून केले जातात. त्यामुळे व्हॉट्सॲप वापरणाऱ्या यूजर्सना कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेला मेसेज ओपन करण्यापूर्वी सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. आता आम्ही तुम्हाला व्हॉट्सॲपच्या 5 अशा फीचर्सबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही स्कॅमर्सपासून सुरक्षित राहू शकता.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

साइलेंस अननोन कॉलर्स फीचर

अनोळखी नंबरवरून येणाऱ्या व्हॉट्सॲप कॉल्सपासून सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही साइलेंस अननोन कॉलर्स फीचरचा वापर करू शकता. हे फीचर ऑन करताच तुम्हाला अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉल्सची रिंग ऐकू येणार नाही. अनोळखी नंबरवरून आलेले कॉल्स तुमच्या कॉल लिस्टमध्ये दिसणार आहे. तुम्ही कॉल रिसिव्ह केलाच नाही तर स्कॅमर्स तुमची फसवणूक करू शकणार नाहीत. यासाठी व्हॉट्सॲप सेटिंगमध्ये जा, प्रायव्हसी पर्याय ओपन करा आणि कॉल्स ऑप्शन निवडा. येथे तुम्हाला साइलेंस अननोन कॉलर्स फीचर दिसेल, ऑन करा.

अनोळखी कॉल उचलण्यापूर्वी दिसणार डिटेल्स

व्हॉट्सॲपने दावा केला आहे की, अँड्रॉईड यूजर्सना आता अशा नंबरची स्क्रीनवर जास्त माहिती दिसणार आहे, जे त्यांच्या फोनबुकमध्ये सेव्ह केलेले नाहीत. यामुळे स्पष्टपणे समजणार आहे की, नंबर कोणत्या कॉमन ग्रुपमध्ये सहभागी आहे की नाही आणि नंबर भारतातील आहे की नाही. संभाषण सुरू करण्यापूर्वीच, कॉल खरा आहे की बनावट, हे तुम्ही ओळखू शकाल.

टू-स्टेप वेरिफिकेशन चालू करा

व्हॉट्सॲपचे टू-स्टेप वेरिफिकेशन फीचर यूजर्सना कोणत्याही प्रकारच्या चोरी आणि हॅकिंगपासून सुरक्षा देते. यामध्ये जुन्या 6 अंकी पिनऐवजी एक मजबूत पासवर्ड सेट करण्याचा पर्याय मिळतो. ज्यामध्ये तुम्ही अक्षरं आणि स्पेशल कॅरेक्टर्सचा देखील वापर करू शकता.

कॉन्टेक्स्ट कार्ड

जर तुम्हाला एखाद्या अनोळखी यूजरकडून एखादा संशयास्पद मेसेज आला असेल, ज्यामध्ये भारी डिस्काऊंट किंवा ऑफर्सचा दावा करण्यात आला असेल, तर तुम्ही तो नंबर ब्लॉक आणि रिपोर्ट करू शकता. लक्षात ठेवा की, मेसेजमध्ये दिलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका आणि कोणतेही अटॅचमेंट डाऊनलोड करू नका. याव्यतिरिक्त, अशा चॅट्ससाठी ‘कॉन्टेक्स्ट कार्ड्स’ तुम्हाला विविध तपशील पुरवू शकतात. उदा. अकाऊंट अलीकडेच तयार केले गेले आहे का, त्या अनोळखी क्रमांकासोबत तुमचे काही कॉमन ग्रुप आहेत का, सिम कार्ड कोणत्या देशातील आहे, आणि बरेच काही.

1 जानेवारीपासून बदलणार मेसेजिंग ॲप्स वापरण्याची पद्धत! काय आहे नवा सिम बाइंडिंग नियम? जाणून घ्या सविस्तर

लिंक डिव्हाईसवर नजर ठेवा

अनेकदा, स्कॅमर्स तुम्हाला तुमचे व्हॉट्सॲप अकाऊंट दुसऱ्या सिस्टिमसोबत लिंक करून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतात. जर एखादे संशयास्पद डिव्हाईस व्हॉट्सॲपला लिंक करण्याचा प्रयत्न करत असेल, तर व्हॉट्सॲप तुम्हाला तात्काळ एक सूचना पाठवून हा एक स्कॅम असू शकतो असा इशारा देईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दिवाळी शॉपिंगदरम्यान व्हॉट्सॲपवर होणाऱ्या फसवणुकीपासून कसे वाचावे?

    Ans: अनोळखी नंबरवरून आलेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. तसेच, अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या APK फाइल्स डाउनलोड करणे टाळा.

  • Que: व्हॉट्सॲपमधील साइलेंस अननोन कॉलर्स फीचरचा उपयोग काय?

    Ans: या फीचरमुळे अनोळखी नंबरवरून येणारे कॉल सायलेंट करता येतात. हे फीचर सुरू करण्यासाठी Settings मधील Privacy आणि त्यानंतर Calls या पर्यायात जा.

  • Que: व्हॉट्सॲपवर टू-स्टेप व्हेरिफिकेशन का महत्त्वाचे आहे?

    Ans: टू-स्टेप व्हेरिफिकेशनमुळे व्हॉट्सॲप अकाउंटला सुरक्षेचा अतिरिक्त स्तर मिळतो आणि अकाउंटचा गैरवापर होण्याचा धोका कमी करण्यास मदत होते.

Web Title: 5 whatsapp features to protect yourself from diwali shopping scams hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 10:18 AM

Topics:  

  • tech updates
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

WhatsApp वर इंस्टाग्राम रील्स शेअर करण्याचा अनुभव बदलणार! चॅटमध्ये लवकरच येणार नवीन पर्याय… कसं करणार काम? जाणून घ्या
1

WhatsApp वर इंस्टाग्राम रील्स शेअर करण्याचा अनुभव बदलणार! चॅटमध्ये लवकरच येणार नवीन पर्याय… कसं करणार काम? जाणून घ्या

पासपोर्टसारखा लूक अन् कमाल फीचर्स… नव्या रुंद स्मार्टफोनची प्री-ऑर्डर सुरू, किंमत 15 हजारांहून कमी
2

पासपोर्टसारखा लूक अन् कमाल फीचर्स… नव्या रुंद स्मार्टफोनची प्री-ऑर्डर सुरू, किंमत 15 हजारांहून कमी

Airtel ग्राहकांसाठी खुशखबर! आता YouTube वर जाहिरातींचा त्रास संपणार, असा आहे 200 रुपयांचा ओटीटी टॉप-अप प्लॅन
3

Airtel ग्राहकांसाठी खुशखबर! आता YouTube वर जाहिरातींचा त्रास संपणार, असा आहे 200 रुपयांचा ओटीटी टॉप-अप प्लॅन

1 जानेवारीपासून बदलणार मेसेजिंग ॲप्स वापरण्याची पद्धत! काय आहे नवा सिम बाइंडिंग नियम? जाणून घ्या सविस्तर
4

1 जानेवारीपासून बदलणार मेसेजिंग ॲप्स वापरण्याची पद्धत! काय आहे नवा सिम बाइंडिंग नियम? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.