Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात ‘या’ तारखेला तंत्रज्ञान अन् नवकल्पना परिषद; विविध प्रकल्प व उत्पादनांचे होणार सादरीकरण 

अत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, उद्योग आणि नवकल्पनांचा संगम घडवून आणणाऱ्या ‘AWTIS 2026’ तंत्रज्ञान व नवकल्पना परिषदेचे आयोजन १८ ,१९ व २० सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 27, 2026 | 01:57 PM
पुण्यात 'या' तारखेला तंत्रज्ञान अन् नवकल्पना परिषद; विविध प्रकल्प व उत्पादनांचे होणार सादरीकरण 

पुण्यात 'या' तारखेला तंत्रज्ञान अन् नवकल्पना परिषद; विविध प्रकल्प व उत्पादनांचे होणार सादरीकरण 

Follow Us
Follow Us:

पुणे : अत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, उद्योग आणि नवकल्पनांचा संगम घडवून आणणाऱ्या ‘AWTIS 2026’ तंत्रज्ञान व नवकल्पना परिषदेचे आयोजन १८ ,१९ व २० सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. पुण्यातील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये होणाऱ्या या तीन दिवसीय परिषदेत ‘आर्यन्स’च्या विविध अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांतील प्रकल्प, उत्पादने आणि नवकल्पनांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्यानेही होणार आहेत.

या परिषदेला ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’चे संचालक अजय जगताप, संजय शेंडगे, कामेश मोदी, हायड्रोजन विभाग प्रमुख डॉ. विकास शिंदे, सौरऊर्जा विभागप्रमुख भूषण देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत.

परिषदेत अर्धसंवाहक व सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, यंत्रमानव व स्वयंचलन, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ तंत्रज्ञान व उपग्रह, प्रक्षेपण वाहने व विमान-अंतराळ तंत्रज्ञान, संरक्षण तंत्रज्ञान, विद्युत दुचाकी व चारचाकी वाहने, हायड्रोजन अर्थव्यवस्था, क्वांटम तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा, डिजिटल पायाभूत सुविधा व डेटा सेंटर्स, माहिती तंत्रज्ञान व संगणक प्रणाली, कृषी तंत्रज्ञान, आरोग्य तंत्रज्ञान आणि ग्राफीन यांसह विविध क्षेत्रांचा समावेश असेल.

विविध तंत्रज्ञान क्षेत्रांतील पूर्ण विकसित उत्पादने प्रत्यक्ष सादर केली जाणार आहेत, हे या परिषदेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. यासोबतच काही निवडक उत्पादने व तंत्रज्ञान तांत्रिक कारणांमुळे प्रोटोटाइप स्वरूपात प्रदर्शित करण्यात येणार आहेत. उद्योग प्रतिनिधी, संशोधक, विद्यार्थी, तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहण्याची, त्याची कार्यपद्धती समजून घेण्याची आणि भविष्यातील उपयोगांविषयी माहिती जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.

स्टार्टअप पॅव्हिलियन, संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे दालन (डीआरडीओ पॅव्हिलियन) तसेच इंडस्ट्री अँड ॲकॅडेमिक पॅव्हिलियन ही या परिषदेची विशेष आकर्षणे ठरणार आहेत. संशोधन व विकास क्षेत्रातील उपक्रमांसोबतच प्रसारमाध्यमांनाही सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

परिषदेच्या तिन्ही दिवशी विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने आणि मार्गदर्शनपर सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. जैवऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ  डॉ. ज्येष्ठराज जोशी; इस्रोचे माजी शास्त्रज्ञ आणि ‘लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम्स’चे उपसंचालक डॉ. नवल किशोर गुप्ता; नामवंत लेखक, व्यवस्थापनतज्ज्ञ व विचारवंत अच्युत गोडबोले; ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’चे संदीप रायरीकर हे हायड्रोजन वाहनांसाठी नियामक आराखडा या विषयावर आपले विचार मांडणार आहेत.

हे सुद्धा वाचा : चाकणनंतर आता हिंजवडीत खराब रस्ते अन् वाहतूक कोंडी आयटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी

तज्ज्ञ सत्रांच्या माध्यमातून विद्यार्थी आणि संशोधकांना विविध क्षेत्रांतील अनुभवी तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन मिळणार आहे. त्याचबरोबर उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, नवउद्योजक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांना उदयोन्मुख तंत्रज्ञान, संशोधन, उद्योगांमधील बदल आणि भविष्यातील संधी यांविषयी माहिती मिळविण्याची तसेच परस्पर विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

Web Title: A technology and innovation conference has been organized in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • pune news
  • technology
  • technology news

संबंधित बातम्या

ANNAMAI : शेतीत AI क्रांती; आयआयटी रोपरचे शक्तिशाली एआय सांगणार पिकांना पाणी अन् खत देण्याची अचूक वेळ
1

ANNAMAI : शेतीत AI क्रांती; आयआयटी रोपरचे शक्तिशाली एआय सांगणार पिकांना पाणी अन् खत देण्याची अचूक वेळ

विषारी दारू प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; मुख्य आरोपीला थरारकरित्या पकडले
2

विषारी दारू प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; मुख्य आरोपीला थरारकरित्या पकडले

Maharashtra Breaking News Today 2026: औषध निरीक्षक भरती पेपरफुटी प्रकरणी अधिकारी आणि आरोपींवर धडक कारवाई
3

Maharashtra Breaking News Today 2026: औषध निरीक्षक भरती पेपरफुटी प्रकरणी अधिकारी आणि आरोपींवर धडक कारवाई

Tech News: वीज गेली तरी रात्रभर राहील गारवा! जाणून  घ्या १० तास चालणाऱ्या पंख्याची भन्नाट खासियत
4

Tech News: वीज गेली तरी रात्रभर राहील गारवा! जाणून घ्या १० तास चालणाऱ्या पंख्याची भन्नाट खासियत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.