Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aadhaar Card हरवलंय किंवा डाऊनलोड होत नाहीये? मग चिंता करु नका, काही मिनिटांत अशाप्रकारे समस्येला करा दूर

आधार कार्ड ऑनलाइन डाउनलोड करताना अनेकांना अडचणी येतात. मात्र, या समस्यांमागे काही सामान्य कारणे असतात. ती ओळखली तर आधार सहज डाउनलोड करता येऊ शकतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 23, 2026 | 10:16 AM
Aadhaar Card हवलंयल किंवा डाऊनलोड होत नाहीये? मग चिंता करु नका, काही मिनिटांत अशाप्रकारे समस्येला करा दूर

Aadhaar Card हवलंयल किंवा डाऊनलोड होत नाहीये? मग चिंता करु नका, काही मिनिटांत अशाप्रकारे समस्येला करा दूर

Follow Us
Follow Us:
  • आधार डाउनलोड करताना चुकीचा Aadhaar क्रमांक, VID किंवा Enrollment ID टाकल्यास प्रक्रिया अडू शकते.
  • रजिस्टर्ड मोबाईलवर OTP न मिळणे किंवा मोबाईल नंबर लिंक नसणे हेही सामान्य कारण आहे.
  • UIDAI सर्व्हरवर जास्त लोड असल्यास डाउनलोडमध्ये अडथळा येऊ शकतो; काही वेळाने पुन्हा प्रयत्न करा.
आज आधार कार्ड आपल्या सर्वांसाठीच एक महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. बँकेचे खाते ओपन करण्यापासून ते मोबाईल सिमकार्ड खरेदी करण्यापर्यंत आधार कार्डची मदत अनेका कामांसाठी लागते. अशात जर कधी आपला आधार कार्ड हरवला तर आपल्याला फार चिंता वाटू लागते. यामुळे अनेका काम रखडू शकतात. पण आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. अनेकदा आधारकार्ड ऑनलाईन डाउनलोड करतानाही बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. अशात अनेकांना काय करावं ते सुचत नाही. खरंतर समस्या फार लहान असते फक्त ते सोडवण्याचे उत्तर आपल्याला माहिती नसते. चुकीचा आधार क्रमांक टाकणे, मोबाईल नंबरवर ओटीपी न मिळणे किंवा इंटरनेट कनेक्शन कमकुवत असणे यामुळे आधारकार्ड ऑनलाईन डाउनलोड करताना समस्या जाणवत असतात. याचबरोबर काहीदा कधीकधी, UIDAI सर्व्हरवरील हेवी ट्रॅफिकमुळेही आधार ऑनलाईन डाउनलोड करता येत नाही. चला हा प्राॅब्लेम कसा साॅल्व्ह करायचा ते जाणून घेऊया.

Tech News: गोबोल्टचे ANC सपोर्ट असलेले नवे ईअरबड्स लाँच! आवाजापासून मिळवा संपूर्ण मुक्तता, जाणून घ्या वैशिष्ट्य

Aadhaar Number, VID किंवा Enrollment ID चुकीचा भरणे

आधारकार्ड ऑनलाईन डाउनलोड न होण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे चुकीची माहिती भरणे. अनेकदा घाईगडबीत १२ अंकी नंबर, १६ अंकी Virtual ID आणि २८ अंकांचा Enrollment ID चुकीचा टाईप केला जातो. एक अंक जरी चुकला तरी UIDAI सिस्टीम मची माहिती सत्यापित करता येत नाही आणि डाउनलोड प्रक्रिया थांबते. यामुळेच माहिती भरताना ती योग्य भरली गेली आहे की नाही ते एकदा चांगलं तपासा.

Registered Mobile Number वर OTP न येणे

e-Aadhaar डाउनलोड करण्यासाठी UIDAI आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक वन-टाइम पासवर्ड (OTP) पाठवते. जर मोबाईल नंबर आधार कार्डसोबत लिंक नसेल किंवा नेटवर्क वीक असल्यास किंवा फोनला सिग्नल नसल्यास मोबाईल फोनवर OTP येण्यास समस्या निर्माण होते. अनेकदा नेटवर्क बिझी असल्याने OTP येण्यास काही मिनिटे देखील लागू शकतात. अशात घाबरु नका, काही वेळ वाट पाहा आणि पुन्हा एकदा OTP पाठवण्याच्या पर्यायावर क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर बदलला असल्यास आधारकार्डमध्ये तो अपडेट करणे फार गरजेचे आहे.

मुसळधार पावसात मुंबईकरांना ‘Vi’चा दिलासा; ‘वी’ स्टोअरमध्ये मिळणार सुरक्षित आसरा आणि मोबाईल चार्जिंगची सुविधा

UIDAI Server खूप लोड पडणे

अनेकदा समस्या आपल्यााकडून नाही तर UIDAI Server कडून होत असते. जेव्हा एकाच वेळी मोठ्या संख्येने वेबसाईवर लोक आधारकार्ड डाउनलोड करु लागतात तेव्हा सर्वरवर लोड पडू लागतो. अशावेळी वेबसाईट हळू चालू लागते ज्यामुळे आधारकार्ड डाउनलोड करण्यात समस्या निर्माण होतात. पुन्हा पुन्हा ट्राय करुनही जर समस्या निर्माण होत असेल तर काहीवेळाचा ब्रेक घ्या आणि मग पुन्हा प्रयत्न करा. पहाटे किंवा रात्री उशिरा रहदारी कमी असते.

 

Web Title: Aadhaar card online download problems reasons and easy solutions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • aadhar card
  • Aadhar Cards
  • Tech News

संबंधित बातम्या

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले
1

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले

5 Smart Fitness Gadgets:  Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!
2

5 Smart Fitness Gadgets: Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!

Jio Canva Offer : Jio ग्राहकांना मिळणार तुफानी फायदा! 4,000 रुपयांपर्यंत Canva Pro Free, ‘या’ रिचार्जवर मिळेल फायदा
3

Jio Canva Offer : Jio ग्राहकांना मिळणार तुफानी फायदा! 4,000 रुपयांपर्यंत Canva Pro Free, ‘या’ रिचार्जवर मिळेल फायदा

AI Photos: AI करून घेताय फोटो वेळीच व्हा सावध! चेहरा आणि व्यक्तिगत माहिती होईल चोरी
4

AI Photos: AI करून घेताय फोटो वेळीच व्हा सावध! चेहरा आणि व्यक्तिगत माहिती होईल चोरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.